Farm Mechanization

देशाच्या जीडीपीच्या वाढी मध्ये कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे.यासह कोट्यावधी लोकांचे भूकही कृषी क्षेत्र भागवत असते.यामुळे चांगले उत्पन्न मिळावे त्याकरिता शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण लागवडीची माहिती मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. उत्पन्न अधिक मिळावी यासाठी शेतकरी भौगोलिक आणि हवामान संबंधित माहिती घेण्यास इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर शेती डिजिटल पद्धतीचा अवलंब करण्यात येत असून अलीकडच्या काळात डिजिटल पद्धतीला वेग आला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक सोपी, फायदेशीर, कार्यक्षम आणि अधिक सुरक्षित बनत आहे. अनेक प्रकारचे तंत्रज्ञान कृषी क्षेत्रात आले आहे. त्यातील काही तंत्रज्ञानाचा भाग व या विषयी माहिती घेऊ.

Updated on 23 June, 2021 12:05 PM IST

  • जी आय एस सॉफ्टवेअर आणि जीपीएस शेती
  • ड्रोन आणि इतर हवाई प्रतिमा
  • शेती सॉफ्टवेअर आणि ऑनलाइन डेटा
  • उपग्रह प्रतिमा
  • मर्जिन डेटा सेट

जी आय एस  सॉफ्टवेअर आणि जीपीएस शेती

 शेतीतील अचुकते  साठी  हे सॉफ्टवेअर फार फायदेशीर आहे. जे लोक पर्जन्यमान, तापमान, पिक उत्पन्न, वनस्पतींचे आरोग्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हे तंत्रज्ञान फार फायदेशीर आहे.

 उपग्रह प्रतिमा

 उपग्रह आणि ड्रोनद्वारे फोटो किंवा मौल्यवान डेटा संग्रह केला जातो. हा डेटा वनस्पती, मातीची स्थिती, हवामान विषयी अचूक अंदाज यातून घेता येतो. या तंत्रज्ञानाद्वारे पिकाच्या उत्पन्नाचा अंदाज सहजपणे घेता येतो. पिकाशी निगडीत विविध प्रकारचे धोक्याची कारणे शोधण्याचे उद्दिष्ट ठेवून रियल टाईम शेतात देखरेख देखील करता येते. पिकांवर या उपग्रहाच्या साह्याने नजर ठेवता येते. त्यातून आपल्या पुढील धोक्याविषयी माहिती मिळते आणि शेतातील पिकांवर कोणत्या प्रकारचे रोग आले आहेत याची माहिती मिळते.

 ड्रोन आणि इतर हवाई प्रतिमा

 यात ड्रोनच्या साह्याने शेतांचे फोटो घेतले जातात. पिकांचे बायोमास, पिकांची उंची, शेतातील पिकासाठी तन उपस्थिती सह पाण्याची संप्रुकता त्याच्या अचूक ते

विषयी  शेतकऱ्यांना अंदाज मिळतो. ड्रोन मार्फत घेण्यात आलेले फोटो हे उपग्रहांनी घेतलेल्या फोटो पेक्षा अधिक फायदेशीर असतात. फोनच्या माध्यमातून मिळालेली माहिती हे फायदेशीर असते. शिवाय कीटकांचा हल्ला झाल्यानंतर ड्रोनच्या मदतीने फवारणी केली जाते. यामुळे अखेरीस रासायनिक नियंत्रण पद्धती लागू होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे पिकाच्या वाढीवर किंवा उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो.

 शेती सॉफ्टवेअर आणि ऑनलाइन डेटा

 शेता वर आधारित सॉफ्टवेअर आहे. ज्यामध्ये उपग्रह प्रतिमा मधून प्राप्त पिकांच्या स्थिती वरील डेटा सह हवामानाचा डेटा चे विश्लेषण केले जाऊ शकते. त्याच्या मदतीने शेतकरी अचूकपणे सिंचन लागू करू शकतात. दव किंवा उष्णतेचे नुकसान रोखू शकतात.

 मर्जिन डेटा सेट्स

 हे पिकांच्या देखरेखीसाठी वापरले जाते. आपली शेती कशी आहे याची माहिती घेण्यासाठी याचा उपयोग केला जातो. जिल्ह्यातील इतर शेतांच्या  तुलनेत आपले शेत कसे आहे याची माहिती  मिळवण्यासाठीही उपयोगाचे आहे. हवामान संदर्भात माहिती देण्यासाठीही याचा उपयोग होत असतो. उदा. डेटा सिस्टम एखाद्या संशोधकास कमी तापमान बद्दल, हिवाळ्याच्या हंगामात पेरलेल्या पिकांसाठी हानीकारक सुचित करू शकते. वरती दिलेल्या तंत्रज्ञानाने आपल्या शेतीला नक्कीच फायदा होईल. शेती व्यवसायात डिजिटल चा उपयोग झाल्यास आपले उत्पन्न वाढण्यासही फायदा होईल.

English Summary: techniq in agri
Published on: 23 June 2021, 12:05 IST