शेतामध्ये विविधयंत्रांचा वापर होतो.शेतामध्ये बहुसंख्य प्रमाणात ट्रॅक्टरचा वापर केला जातो.आपल्याला माहित आहेच कि जेव्हा आपण नांगरणी करतो तेव्हा आपण रोटाव्हेटरच्या साह्याने जमीन भुसभुशीत करतो.
रोटावेटर हे अत्यंत उपयोगी असे यंत्र आहे. परंतु बऱ्याचदा आपण फक्त त्याचा वापर करतो परंतु त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष करतो.त्यामुळेरोटावेटर मध्ये समस्या निर्माण होऊन त्याची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे वेळोवेळी त्याची देखभाल करणे फार गरजेचे आहे. याबाबत आपण या लेखात थोडक्यात माहिती घेऊ.
अशा पद्धतीने करा रोटावेटरची देखभाल
रोटाव्हेटरच्या फिरणाऱ्या दात्यासाठीज्यादा शक्तीची गरज असते. या शक्तीचा उपयोग रोटावेटर चा रोटर फिरवण्यासाठी तसेच ट्रॅक्टरला योग्य गती देण्यासाठी तसेच खोलवर मशागत होऊन माती मिसळण्यासाठी आवश्यक असतं. त्यासाठी आवश्यक अश्वशक्तीचा ट्रॅक्टरची निवड करणे गरजेचे असते. त्यामुळे रोटावेटर चे आयुष्य वाढविण्यासाठी व इतर अडचणी कमी करण्यासाठी ट्रॅक्टरचा पिटीओशाप्टसरळ रेषेत कार्यरत राहील याची काळजी घ्यावी.
ट्रॅक्टर व रोटावेटर ला जोडणाऱ्या प्रोपेलर शाफ्ट ची लांबी योग्य प्रमाणामध्ये ठेवा.जेव्हा रोटावेटर उचललेला असेल तेव्हा युनिव्हर्सल जॉईंट चा कोण 40 अंश पेक्षा जास्त नसावा. पी टी ओ शाफ्टलायोग्य प्रकारे वंगण द्यावे. वंगना अभावी ट्रॅक्टरच्या पीटीओ शाप्टवंगना अभावी ट्रॅक्टरच्या p.t.o. शाप्ट मधील हानी रोटाव्हेटरच्या गिअर बॉक्स मधील बेरिंग आणि सिल खराब होणार नाहीत.
दररोज करायची देखभाल
संपूर्ण मशीनला वंगण द्यावे व सर्व ग्रीसिंग पॉईंट्सला ग्रीस लावावे. रोटाव्हेटरच्या गिअर बॉक्स मधील वंगण तेलाची पातळी तपासावी व गरज असेल तर योग्य पातळीपर्यंत वंगण तेल भरावे. रोटाव्हेटरच्या रोटावरची नांग्या ची पाती ढिली झालेले नाहीत,तसेच वाकलेली किंवा मोडलेली नाहीत याची खात्री करून घ्यावी. त्यासोबतच नांग्याच्या पुढच्या कडांची झीज तपासावे. मशीनचे सर्व नट-बोल्ट घट्ट आवळून बसवावेत.रोटरीच्या बेरिंग मध्ये काडीकचरा किंवा तारगुंडाळलेले नाहीत ना याची खात्री करून घ्यावी.
कालांतराने करायची देखभाल
रोटर वरील नांग्याची तपासणी करावी.पाती वाकलेली असल्यास हुक आणि पाना वापरून सरळ करावे. नांग्या खराब झाले असल्यास बदलून घ्याव्यात. रोटावेटर च्या गिअर बॉक्स मधील वंगण तेलाची पातळी तपासावी तसेच सर्व वंगण तेल बाहेर काढून गिअर बॉक्स स्वच्छ करावा व नवीन वंगन तेलाने भरावा. रोटावेटर चे चैन कव्हर काढून चैन पॉकेट व चाकाची झीज तपासावे. तसेच चेनचा तान तपासावा व चेनलला वंगण द्यावे. सर्व बेरिंग तपासाव्यात व त्यांना वंगण द्यावे.
Published on: 06 March 2022, 03:19 IST