पारंपारिक पाठीवरील पंपा पासून अत्याधुनिक स्प्रेयर चा वापर शेतामध्ये वाढत आहे. अशा वेळी स्प्रेयर ची निवड कोणत्या निकषावर करावी, हा शेतकऱ्यांचा मोठा मोठा प्रश्न आहे. आपली आवश्यकतेनुसार योग्य तांत्रिक बाबी तपासाव्यात. फवारणी यंत्राच्या योग्य त्या सर्व चाचण्या झालेल्या असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. पारंपारिक शेतीमध्ये अद्याप नेपस्याक पंपा सारखे ठराविक प्रकार वापरले जातात. अलीकडे द्राक्ष डाळिंब बागायतदार अत्याधुनिक प्रकारच्या फवारणी यंत्राचा वापर करू लागला आहे. अशावेळी शेतकऱ्यांमध्ये फवारणी यंत्र कशाप्रकारे निवडावेत या विषयी अनेक शंका असल्याचे दिसून येते. या लेखात आपण या बाबतीत माहिती घेऊ.
फवारणी यंत्र खरेदी करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?
आपल्याकडील लागवडीचे क्षेत्र, दरवर्षी घेतली जाणारी पिके, फळबागांचे प्रकार यांचा अंदाज घ्यावा. आपल्याला फवारणीसाठी सध्या किती वेळ व मनुष्यबळ लागते याचे गणित करावे. यानुसार आपल्याला कोणत्या प्रकारचे पावर स्प्रेयरची आवश्यकता आहे, याचा अंदाज येऊ शकेल. त्यानुसार पोर्टेबल इंजिन पावर स्प्रेयर, नेपसेक इंजिन पावर स्प्रेयर, बॅकपॅक स्प्रेयर आणि मिस्ट ब्लोअर यामधून निवड करू शकता. एकदा प्रकार ठरल्यानंतर त्याची क्षमता आणि सामर्थ्य याची आवश्यकता तपासावी. त्यात प्रामुख्याने टाकीची क्षमता महत्त्वाची आहे. त्यानंतर त्यासाठी वापरली जाणारी ऊर्जा कोणती असावी याचा विचार करावा. आपल्याकडे प्राधान्याने ट्रॅक्टरच्या पी टी ओ च्या उर्जेवर म्हणजेच अंतिम चा डिझेल इंधनावर चालणाऱ्या फवारणी यंत्रांना प्राधान्य दिले जाते. विदेशात फवारणी यंत्र साठी विद्युत किंवा गॅस ऊर्जा वापरली जाते. अलीकडे या दोन्ही ऊर्जेचा एकत्रित वापर करणारी फवारणी यंत्रे तिथे उपलब्ध होत आहेत. त्याला इंग्रजीमध्ये हायब्रीड एनर्जी स्प्रेयर असे म्हणतात. यामध्ये दोन टाक्या असतात व मोटर द्वारे ऊर्जा दिले जाणारे स्प्रेयर ही उपलब्ध आहेत. आपल्याकडे नियमित उपलब्ध असलेल्या ऊर्जेचे यंत्रांना प्राधान्य द्यावे.
अत्याधुनिक फवारणी यंत्र यांच्या किमती अधिक असल्यामुळे अशा वेळी शेतकऱ्यांनी आर्थिक क्षमता हा महत्त्वाचा निकष त्याचा विचार करावा. आपली आर्थिक क्षमता आहे म्हणून वर उल्लेखलेल्या निकषांचा विचार न करता विनाकारण अधिक क्षमतेचे फवारणी यंत्र घेणे टाळावे.
फवारणी यंत्राच्या चाचणीच्या पद्धत
भारतामध्ये फवारणी यंत्राच्या चाचण्या या हिस्सार येथील मशिनरी ट्रेनिंग अँड टेस्टिंग इन्स्टिट्यूटमध्ये केल्या जातात. तिथे विक्री योग्य किंवा व्यावसायिक उत्पादनासाठी तयार करण्यात येणाऱ्या कोणत्याही यंत्राच्या चाचण्या केल्या जातात. त्यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर तसे प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र असलेली यंत्रे विक्री आणि पुढे शासकीय अनुदानासाठी पात्र ठरू शकतात.
फवारणी यंत्रांच्या चाचण्यांसाठी खालील टेस्ट कोड वापरले जातात.
- आईएस:11313:2007( हायड्रोलिक ऊर्जा फवारण्यासाठी तपशील)
यानुसार चाचणी वेळी पंपाची क्षमता प्रति शोषकाच्या किमान आठ हजार मिली प्रमाणात द्रावण बाहेर फेकण्याची क्षमता प्रतिमिनिट असावी लागते. हा पंप चाळीस पी.एस.आई. दाबाखाली व्यवस्थितपणे कार्य करण्यास सक्षम असल्याची तपासणी केली जाते. पिस्टन/प्लंजर प्रकारच्या पंपाचे आकारमानकार्यक्षमता कमीत कमी 80 टक्के असावे लागते. त्यातून तयार होणारा दाब हा उत्पादक द्वारे घोषित केलेला मूल्य पेक्षा कमी नसल्याची खात्री केली जाते. त्याचप्रमाणे इतरही गोष्टी तपासल्या जातात.
- आयएस:3652:1995( पीक संरक्षण उपकरणे – फवारणीसाठी वैशिष्ट्ये )
सॅम्पल प्रेयर थेट उत्पादक द्वारे संस्थेत चाचणीसाठी सादर केल्यानंतर त्यावर चाचणी करताना 540- 660 किलो पास्कल चा कार्यरत दाबावर जेट द्वारे फेकलेला फवारा हा त्याच्या टोकापासून सहा मीटर अंतरापर्यंत पोहोचला पाहिजे. स्प्रेगन चा डिस्चार्ज रेट, स्प्रे कोन, गळती अशा अनेक बाबी तपासल्या जातात.
टेस्ट कोड अनुसार नमुना स्प्रेयर चाचण्या होऊन, उत्तीर्ण झाल्यास त्याचा पूर्ण अहवाल दिला जातो. हा अहवाल यंत्राची विक्री व अनुदानासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. यासोबत खालील बाबींची तपासणी केली जाते.
1-फवारणी यंत्र चालतांना त्यातून कोणत्याही वेळी ठरवलेल्या किंवा कॅलिब्रेशन केलेल्या प्रमाणापेक्षा कमी किंवा अधिक द्रावण बाहेर फेकले जात नाही ना याची खात्री केली जाते.
- यंत्र चालते वेळी त्यापासून होणारे हादरे त्याच्या नियंत्रणामध्ये बाधा आणत नाही ना, हे पाहिले जाते.
- त्याचा आवाज, ऊर्जा वापर यातून होणारे प्रदूषण आणि पर्यावरणासाठी हानिकारकता यांचा विचार केला जातो.
- यंत्र चालवताना वापरकर्त्याच्या सुरक्षिततेचा आणि वाढण्याचा धोका लक्षात घेतला जातो.
Published on: 17 July 2021, 04:33 IST