महिंद्रा समूहाचे ट्रॅक्टर नेहमी शेतकऱ्यांच्या अडचणी उभे असतात जे की दमदार आणि शेतीसाठी अगदी योग्य. पण अत्ता छोट्या छोट्या शेतकऱ्यांसाठी स्वराज्य समूह हायर व लोअर हॉर्स पॉवर चे ट्रॅक्टर लाँच करणार आहे असा त्यांचा प्लॅन आहे.मंगळवारी त्यांच्या समूहातील लोकांनी एका मुलाखतीत सांगितले आहे की आंध्रप्रदेश व तेलंगणा मध्ये धान्य यंत्रणा मध्ये अनेक उपक्रम सुरू केले आहेत
स्वराज्य समूहाने नुकताच त्यांचा स्वराज्य 742XT हे मॉडेल लाँच केले आहे, हा ट्रॅक्टर तांदूळ यांत्रिकीकरणासाठी विकसित केला होता ज्याचे हॉर्स पावर 45HP आहे या ट्रॅक्टर चे यश संपादन झाले आहे.आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यामध्ये प्रामुख्याने भात या पिकाची शेती केली जाते त्यामुळे आम्ही आपल्या शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची ओळख करून स्वराज्य समूहात एक नवीन दमदार आणि बळकट असा ब्रँड बनवणार आहे असे स्वराज्य समूहाचे मुख्य अधिकारी हरीश चव्हाण यांनी सांगितले आहे.
हेही वाचा:पॅडी ट्रान्सप्लांटरच्या मदतीने होऊ शकते कमी वेळात व कमी खर्चात भाताची लागवड
हरीश चव्हाण यांनी असेही सांगितले की या प्रदेशामध्ये भात पिकासाठी शेतकऱ्यांना अनेक यंत्राची गरज लागते ती यंत्रे आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत जेणे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन भेटेल.छोट्या छोट्या शेतकऱ्यांना त्यांच्या कामात मदत व्हावी म्हणून आम्ही फोर व्हीलर ट्रॅक्टर हायर पावर तसेच लोअर पावर मध्ये घेऊन येत आहोत. ज्यामध्ये कमी वेळ आणि कमी कष्टमध्ये तुमची कामे होतील यामध्ये प्रत्येक यंत्रणात बदल केलेला असेल ज्याने शेतकरी अगदी सहजपणे चालवू शकेल.
मागील पाच वर्षांमध्ये स्वराज्य समुहातील ट्रॅक्टर ची विक्री दुपटीने झाली आहे त्यामुळे राज्य सरकारचे सुद्धा पाठबळ असल्याने इतर परिस्तिथी मध्ये धान्य उत्पादन मध्ये वाढ झालेली आहे.तसेच त्यांनी हेही सांगितले की ज्यांची शेती एकर असेल किंवा त्यापेक्षा छोटी असेल तर त्या उत्पादकांसाठी धान्य कमी होण्याकरिता ओल्या भात व कोरडा भात धान्य पिकवण्याचे समाधान दिले जात आहे. स्वराज्य समूह 15 HP ते 65 HP चे ट्रॅक्टर तयार करतो आणि त्यासह शेतीसाठी पूर्ण सोल्युशन सुद्धा देतो.
Published on: 15 July 2021, 02:11 IST