देशातील इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना कृषी यांत्रिकीकरणाच्या दिशेने प्रवाहित करण्यासाठी स्वराज्य ट्रॅक्टर कडून मेरा स्वराज्य एज्युकेशन सपोर्ट प्रोग्राम लॉन्च करण्यात आला आहे. या प्रोग्रामच्या माध्यमातून इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना आपल्या करिअरच्या दिशा ठरवण्याच्या कामी मदत होईल तसेच करियर ठरवण्याची संधी मिळेल.मेरा स्वराज्य एज्युकेशन सपोर्ट प्रोग्राम देशातील इंजीनियरिंग च्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण प्रोग्राम असून या प्रोग्रामच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या सुरुवातीच्या काळातच स्वतःच्या करिअरची दिशा ठरवण्यासाठी ची संधी मिळेल.
कोणत्या इंजिनियरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मिळेल संधी
मेरा स्वराज्य एज्युकेशन सपोर्ट प्रोग्राम अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आला आहे की प्रथम वर्ष इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना दीर्घकाळासाठी करिअर विकासासाठी आवश्यक, महत्वपूर्ण आणि उद्योग क्षेत्रातील समग्र अनुभव त्यांना मिळू शकेल. या कार्यक्रमाद्वारे ॲग्री इंजीनियरिंगचा अभ्यासक्रम करणाऱ्या टॉप इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा जास्त होईल. या योजनेच्या पहिल्या वर्षी स्वराज ट्रॅक्टर्स ने देशातील आठ इंजिनिअरिंग कॉलेजमधील जवळ जवळ 36 विद्यार्थ्यांना इंटरंशिप साठी निवडले आहे. या विद्यार्थ्यांना स्वराज्यच्या अंतिम नियुक्ती प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाईल.
असे विद्यार्थी त्यांच्या इंटरंशिप चा एक हिस्सा म्हणून संबंधित उद्योगातील तज्ञांचा सल्ल्याने लाईव्ह कृषी मशीन करण योजने वर सुद्धा काम करतील.
स्वराज ट्रॅक्टर चे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हरीश चव्हाण यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना लवकरात लवकर त्यांच्या करिअरच्या दिशेने कार्यप्रवृत्त करणे आणि या युगातील शेतीसाठी येणाऱ्या नवनवीन मशिनी करण निर्मितीप्रक्रियेत समाविष्ट होण्याची संधी देणे हा हेतू आहे. या योजनेच्या माध्यमातून भविष्यकाळात इंजिनीयर यांचा एक सक्षम प्लॅटफॉर्म तयार करता येऊ शकेल.
त्यांनी बोलताना सांगितले की मेरा स्वराज्य एज्युकेशन सपोर्ट प्रोग्रामच्या माध्यमातून इंजिनीअरिंगची शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्योगांमधील व्यावहारिक प्रदर्शनाच्या माध्यमातून आधुनिक उपकरणे आणि टेक्नॉलॉजी यांच्यासोबत अशा विद्यार्थ्यांना परिचित करणे हा एक महत्वाचा उद्देश आहे.हरीश चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार मेरा स्वराज एज्युकेशन सपोर्ट प्रोग्रामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चार वर्षापर्यंत आर्थिक मदत केली जाईल. यावर्षी या कार्यक्रमाच्या माध्यमातूननिवड झालेल्या विद्यार्थ्यांना निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना शेतीची पार्श्वभूमी आहे जे स्वराज च्या यूएसपी शेतकऱ्यांना द्वारे आणि शेतकऱ्यांसाठी अनुरूप आहे.
Published on: 20 June 2021, 07:28 IST