Farm Mechanization

शेती मध्ये मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरणाचा वापर होतो. तसाच तो फळबागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे बऱ्याच प्रमाणात जमीन दबली जाते त्यामुळे एकंदरीत संपूर्ण मातीची रचना बिघडते. त्यामुळे जमिनीची रचना सुधारायचे असेल तर व्हायब्रेटिंग सबसॉयलरचा वापर फायद्याचा ठरतो. त्याबद्दल या लेखात माहिती घेऊ.

Updated on 31 July, 2022 1:02 PM IST

 शेती मध्ये मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरणाचा वापर होतो. तसाच तो फळबागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे बऱ्याच प्रमाणात जमीन दबली जाते त्यामुळे एकंदरीत संपूर्ण मातीची रचना बिघडते. त्यामुळे जमिनीची रचना सुधारायचे असेल तर व्हायब्रेटिंग सबसॉयलरचा वापर फायद्याचा ठरतो. त्याबद्दल या लेखात माहिती  घेऊ.

 सबसॉयलरची माहिती

1- सबसॉयलर या जमिनीच्या पृष्ठभागाखाली दीड ते दोन फूट चालतो त्यामुळे याच्या तडी फोडणाऱ्या टोकदार फळामुळे जमिनीत जाणारी मांडी ही अडीच फुटाची असते. कारण याचा  फाळ टोकदार असतो. त्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागाखाली जो काही  घट्ट थर तयार झालेला असतो, तो थर फोडण्यासाठी सबसॉयलरचा वापर करतात.

नक्की वाचा:प्रीत 4049 ट्रॅक्टर: कमी डिझेलमध्ये शेतात करते जास्तीचे काम, वाचतो शेतकऱ्यांचा खर्च

2- जमीन हलकी किंवा कमी खोलीच्या असेल तर अशा जमिनीत दीड फूट खोलीपर्यंत सबसॉयलर चालवावा. जमीन जर खोल किंवा भारी असेल तर अशा जमिनीत दीड ते दोन फूट खोलीपर्यंत सबसॉयलर चालतो.

नांगरणी करण्यापूर्वी पाच फूट अंतरावर सबसॉयलर चालवावा. सबसॉयलर च्या साह्याने ट्रॅक्टरच्या शक्तीनुसार दीड ते दोन फूट खोलीपर्यंत नांगरट करून जमीन मोकळी केली जाते.

3- जमिनीच्या पृष्ठभागाखाली जो काही घट्ट थर फोडला जातो त्यामुळे जमिनीत हवा भरते व माती मोकळी होण्यास मदत होते व तसेच जमीन भुसभुशीत होते. त्यामुळे जमिनीत वाफसा लवकर येतो व हवा खेळती राहते. त्यामुळे जमिनीची चांगली खोल वर मशागत करता येते.

नक्की वाचा:Machinary: शेतामधील तण आणि बांधावरचे गवताची नका करू काळजी, वापरा 'हे'यंत्र अन समस्या लावा मार्गी

4- सबसॉयलर मुळे जमिनीतील जे काही जास्तीचे पाणी व क्षार असतात त्यांचा योग्य निचरा होतो. जमिनीची जैविक, रासायनिक व भौतिक सुपीकता वाढविण्यास मदत होते व पिकाच्या मुळांची वाढ चांगली होऊन पीक लोळण्याचे प्रमाण कमी होते.

5- सबसॉयलर चालवण्यासाठी डिसेंबर ते एप्रिल महिन्याचा कालावधी उत्तम असून जमिनीमध्ये असणारी पाण्याची पाईप लाईन आणि विजेची वायर असलेल्या ठिकाणी मार्किंग करून घ्यावी व ती तुटणार नाही याची काळजी घ्यावी.

6- सबसॉईलरचा वापर दोन-तीन वर्षातून एकदा करावा व वापर केलेली जमीन आठ ते पंधरा दिवस पुन्हा मध्ये तापवून त्यानंतरच पुढील मशागत करावी.

7- द्राक्ष बागा किंवा अन्य फळबागांमध्ये यांत्रिकीकरणामुळे कमी-अधिक प्रमाणात जमीन तापली जाते व मातीची रचना खराब होते व पाण्याचा निचरा होण्यास अडथळे येतात.यासाठी फळबागेतील जमीन सुधारण्यासाठी वाइब्रेटिंग सबसॉयलरचा वापर करणे गरजेचे असते. त्यामुळे जमिनीतील घट्ट झालेला मातीचा थर फोडला जातो व जमीन मोकळी होते.

नक्की वाचा:'नंदी ब्लोअर' ची कमाल, आता ट्रॅक्टरचे काम बैलजोडीच्या माध्यमातून, अनोख्या जुगाडाची राज्यात चर्चा..

English Summary: subsoiler is useful for improve water drainage system of land
Published on: 31 July 2022, 01:02 IST