Farm Mechanization

भारतातील बहुतेक राज्यांमध्ये खरीप हंगामाची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. शेतीमधील मशागत आणी लागवड इत्यादी शेती संबंधित कामे सोपे व्हावे यासाठी कृषी यंत्राची आवश्यकता असते केंद्र आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कृषी यंत्र योजना चालवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून अनुदाना च्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी यंत्र उपलब्ध केले जात आहेत. कारण या कृषी यंत्रांचा फायदा सीमांत अल्पभूधारक शेतकऱ्यांना होईल हा त्यामागचा उद्देश आहे. शेतीमध्ये कृषी यंत्रांचा वापर केल्यामुळे शेती संबंधित सगळी कामे करणे शेतकऱ्यांना सुलभ होते तसेच वेळ आणि पैशांची बचत होते. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मध्य प्रदेश सरकारच्या कृषी विभागाने वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून अनुदानावर केल्या जाणाऱ्या कृषी यंत्रांसाठी अर्ज मागवले आहेत. राज्यातील इच्छुक शेतकरी अनुदानावर मिळणाऱ्या कृषी यंत्रांसाठी अर्ज करू शकता.

Updated on 22 June, 2021 10:26 AM IST

 कोण कोणत्या यंत्रांवर सबसिडी दिली जाते?

 सन 2021-22 या वर्षात कृषी यंत्र या पोर्टल वर मध्य प्रदेश सरकारच्या कृषी अभियांत्रिकी संचालनालय द्वारा जयंत रान साठी जिल्हानिहाय लक्ष दारी केले गेले आहे. अशा यंत्रामुळे मिळणाऱ्या सबसिडीसाठी शेतकरी अर्ज करू शकतात.

  • सीड ड्रील
  • सीड कम फर्टीलायझर  ड्रिल
  • रोटावेटर
  • रैज्ड बेड प्लांटर/ रिझ फर्रो प्लांटर / मल्टी क्रॉप प्लांटर/रैज्ड बेड प्लांटर विथ इन्कलाइन्ड प्लॅट

मध्यप्रदेश मधील कृषी यंत्रांवर किती मिळते अनुदान?

 कृषि यंत्र अनुदान योजना च्या माध्यमातून मध्य प्रदेश राज्यातील शेतकऱ्यांना सरकारद्वारा 30 टक्के ते 50 टक्के पर्यंत सबसिडी दिली जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 40 हजार ते 60 हजार  रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. यामध्ये कृषी यंत्रांच्या एकूण किंमती वर आधारित आर्थिक मदत केली जाते. जर एक शेतकरी महिला असेल तर त्यासाठी  जास्त प्रमाणात लाभ दिला जातो.

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक च्या पहिल्या पानाची कॉपी.
  • बी 1ची प्रत
  • लाईट बिल झेरॉक्स
  • जात प्रमाणपत्र( केवळ अनुसूचित जाती आणि जमाती साठी)
  • अर्जदाराच्या मोबाईल नंबर
  • अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो

कृषी यंत्रांवर अनुदान प्राप्त करण्यासाठी अर्ज कसा करावा?

 मध्यप्रदेश राज्यातील शेतकरी दिल्या गेलेल्या कृषी यंत्रांसाठी ऑनलाईन अर्ज ई कृषि यंत्र अनुदान पोर्टल वर करू शकतात. यावर्षी कोविड महामारी मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पोर्टल वर अर्ज करण्यासाठी असलेल्या प्रक्रियेमध्ये  बदल करण्यात आला आहे.

ज्या अंतर्गत आधार प्रमाणित बायोमेट्रिक  प्रक्रियेच्या ऐवजी आता लाभार्थ्याच्या मोबाईल वर ओटीपी च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतात. शेतकरी कुठूनही आपला मोबाईल आता कम्प्युटरच्या माध्यमातून अर्ज दाखल करू शकतात. त्यामध्ये नमूद केलेल्या मोबाईल नंबर वर शेतकऱ्यांना एक ओटीपी प्राप्त होतो. या ओटीपी च्या  माध्यमातून तुमच्या अर्जाचे  ऑनलाईन रजिस्ट्रेशन होऊ शकते.

 या योजनेसाठी ची अंतिम मुदत

 मध्यप्रदेश राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जिल्हानिहाय लक्षाका नुसार अर्ज करण्याची दिनांक 16 जून 2021 दुपारी बारा वाजे पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 जून 2021 आहे. शेतकरी या योजनेसाठी या तारखेचे आत अर्ज  करू शकतात. या सगळ्या प्राप्त झालेल्या अर्जन मधून 25 जून 2019 रोजी लॉटरी  काढली जाईल. या लॉटरी द्वारे निवड झालेल्या शेतकऱ्यांची निवड आणि प्रतीक्षा यादी दुपारी तीन वाजता पोर्टलवर  प्रकाशित करण्यात येईल.

English Summary: SUBSIDY FOR FARM MACHINARY (1)
Published on: 22 June 2021, 10:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)