Farm Mechanization

शेतीच्या कामासाठी यंत्रांचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यंत्रांच्या साहाय्याने शेतीची मशागत करणे सोपे जाते. डोंगराळ आणि कठिण जमिनीवरही शेती करण्यास आपल्याला सोपे होत असते. डोंगरळ भागात किंवा जेथे खडकाळ प्रदेश आहे, अशा ठिकाणी शेतीची मशागत करणे फार अवघड असते.

Updated on 12 April, 2021 2:05 PM IST

शेतीच्या कामासाठी यंत्रांचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यंत्रांच्या साहाय्याने शेतीची मशागत करणे सोपे जाते. डोंगराळ आणि कठिण जमिनीवरही शेती करण्यास आपल्याला सोपे होत असते. डोंगरळ भागात किंवा जेथे खडकाळ प्रदेश आहे, अशा ठिकाणी शेतीची मशागत करणे फार अवघड असते.

कारण शेत तयार करताना  मोठे कष्ट घ्यावे लागतात. यामुळे येथील शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेता आम्ही तुम्हाला एका मशीनची माहिती देत आहोत. या मशीनच्या साहाय्याने तुम्ही तेथील दगड- गोटे बाजूला करु शकणार आहात.

डोंगराळ भागातील शेतकऱ्यांसाठी आहे उपयुक्त(Farming Equipment for Hill Region Farmers)

 

शेती हा व्यवसाय पावसावर अवलंबून असतो, पण पेरणीच्या आधी आपल्याला शेती जमिनीची मशागत करावी लागते. त्यात आपली जमीन ही खडकाळ आणि डोंगराळ भागात असली तर मोठी मेहनत घ्यावी लागते. बऱ्याच शेतात खडे, छोटे दगड असल्याने तेथील पीकांची रोपे उमलण्यावर परिणाम होत असतो. यासाठी अशा क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी एक मशीन विकसित करण्यात आले आहे. याच्या मदतीने आपण आपली शेतजमीन चांगली साफ करु शकता. या यंत्राचे नाव आहे स्टोन पिकर.

स्टोन पिकर मशीन (Stone picker machine)

स्टोन पिकर मशीन – डोंगराळ परिसरातील शेतकऱ्यांसाठी हे कृषी यंत्र खुप उपयोगी आहे. स्टोन पिकरमुळे शेतातील अनेक कामे सोपी होतात. या यंत्राच्या साहाय्याने आपण शेतातील छोटे-मोठे दगड आणि खडे बाहेर काढू शकतो. विशेष म्हणजे याची किंमत आपल्याला परडवणारी आहे.  या यंत्राला मशीनला चालविण्यासाठी एका ट्रॅक्टरची गरज लागते. कोणत्याही प्रकारच्या ट्रॅक्टरवरहे मशीन चालू शकते. एका एकरातील खडे, दगड, केवळ दोन तासात बाजूला करण्याची क्षमता या यंत्रात आहे.

 

मशीनविषयीची अधिकची माहिती आपणांस https://www.indiamart.com/proddetail/stone-picker-machine-15065341762.html या लिंकवर मिळेल.

English Summary: Stone picker machine will set aside field stones in two hours
Published on: 11 February 2021, 11:07 IST