सोलापूर: शेती (Farming) क्षेत्रामध्ये आधुनिक बदल होत चालले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना श्रम कमी आणि वेळही वाचत आहेत. पूर्वीच्या शेतीपद्धतीमध्ये आणि आताच्या शेतीपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. नवनवीन तंत्रज्ञानामुळे (New technology) शेतीची मशागत करणेही सोपे झाले आहे. आता औषध मारण्यासाठी ड्रोन पद्धतीचा वापर (Use of drones) वाढायला लागला आहे.
ड्रोन पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसाही वाचत आहे. औरादच्या शेतकऱ्यांनी उसावर औषध फवारणीसाठी (Spraying drug on sugarcane) ड्रोन टेक्नॉलॉजीच्या वापर केला आहे. या टेक्नॉलॉजीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या उसावरही औषध मारणे शक्य झाले आहे. औराद येथील शेतकऱ्यांनी सांग लीहून ड्रोनची मशीन मागवली आहे.
एक एकर उसावर एका मजुराला औषध मारण्यासाठी किमान ३ तासांच्या वर कालावधी लागू शकतो. तसेच पैसेही जास्त खर्च होतात. मात्र ड्रोन टेक्नॉलॉजीमुळे (Drone Technology) अवघ्या ८ मिनिटांमध्ये एक एकर उसावर औषध मारणे शक्य झाले आहे. या मशीनद्वारे एक तासात तब्बल सहा ते सात एकर पिकांवर औषध मारणे शक्य झाले आहे.
आजच्या नवीन युगात शेतीसाठी अनेक यंत्र बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा पैसे आणि वेळ वाचत असल्यामुळे शेतकरी त्याचा अवलंब करत आहेत. औषध फवारणीसाठी आता इलेक्ट्रिक पापं बाजारात आल्यामुळे त्याद्वारेही शेतकरी झटपट औषध मारू शकतो. तसेच ऊस काढणीसाठी यंत्र आल्यामुळे मजुरांचा खर्च वाचत आहे.
औषध फवारणीसाठी नवीन ड्रोनचे नवीन तंत्र बाजारात उपलब्ध असल्यामुळे दक्षिण सोलापूर (Solapur) तालुक्यातील औराद येथील शेतकरी सुभाष वाले यांच्या शेतातील ऊसावर ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्यात आली आहे.
Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलचे नवीनतम दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर...
मजुरांद्वारे औषध फवारणीसाठी जास्त पाण्याची आणि औषधाची गरज भासते. तर ड्रोन टेक्नॉलॉजीमुळे फक्त ९ लिटर पाणी आणि १ लिटर औषध एक एकर फवारणीसाठी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पैशाची बचत होत आहे. तसेच मजुरांना लागणारा खर्च कमी होत आहे असे शेतकरी सुभाष वाले यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्रणाचा वापर करून शेती केल्यास फायदा होणार आहे. पारंपरिक शेती करण्यासाठी आता मोठ्या प्रमाणात खर्च येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही. आता ड्राेनद्वारे फवारणी करण्यासाठी कमी खर्च लागतो आणि बचतही होत आहे असे औरादचे कृषी सहायक बाशू राठोड यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या:
8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार नवा वेतन आयोग? जाणून घ्या किती असेल पगार...
संततधार पावसामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले; भाजीपाल्याची आवक घटल्याने दर कडाडले
Published on: 29 August 2022, 01:27 IST