Farm Mechanization

देशातील प्रमुख ट्रॅक्टर निर्माता कंपनी सोनालीका ट्रॅक्टर ने हिमाचल प्रदेश मधील अंब येथे एक नवीन प्लांट स्थापन करण्यासाठी 200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या प्लांटमध्ये उच्च तंत्रज्ञान युक्त कम्बाईन हार्वेस्टर यंत्राची निर्मिती केली जाणार आहे. याबाबतीत कंपनीने सांगितले की, कंपनीने हिमाचल प्रदेश मधील अंब येथे हार्वेस्टर निर्माण करण्यासाठी एक प्लांट ची स्थापना केली आहे त्यासाठी कंपनीने 200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

Updated on 23 July, 2021 5:27 PM IST

 देशातील प्रमुख ट्रॅक्टर निर्माता कंपनी सोनालीका ट्रॅक्टर ने हिमाचल प्रदेश मधील अंब येथे एक नवीन प्लांट स्थापन करण्यासाठी 200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या प्लांटमध्ये उच्च तंत्रज्ञान युक्‍त कम्बाईन हार्वेस्टर यंत्राची निर्मिती केली जाणार आहे. याबाबतीत कंपनीने सांगितले की, कंपनीने हिमाचल प्रदेश मधील अंब येथे  हार्वेस्टर निर्माण करण्यासाठी एक प्लांट ची स्थापना केली आहे त्यासाठी कंपनीने 200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

 अंब येथील कंपनीचा नवीन प्लांट 29 एकर क्षेत्रात आहे. या प्लांटला बहुस्तरीय सीईडी म्हणजेच केथोड इलेक्ट्रिक डीपॉझिशन पेंट प्रक्रिया द्वारे डिझाईन केले आहे. जास्त करून याचा वापर हा कार निर्माण प्लांटमध्ये केला जातो. सोनालिका कंपनीने या प्लांट मध्ये सीइडी पेंट प्रक्रिया साठी 18 करोड रुपये ची गुंतवणूक केली आहे. तसेच कंपनीने 25.5 लाख रुपयांच्या गुंतवणूकीतून सोनालिका सम्राट कम्बाईन हार्वेस्टर लॉन्च केला आहे त्याची निर्मिती अंब येथील प्लान्टमध्ये होता आहे.

 कम्बाईन हार्वेस्टर सोनालिका सम्राट चे वैशिष्ट्ये

1-सोनालिका सम्राट कम्बाईन हार्वेस्टर एक स्वयंचलित हार्वेस्टर आहे.याच्यामध्ये उच्च तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.

2- कम्बाईन हार्वेस्टर सोनालिका सम्राट पीक कापणीच्या वेळेस होणारे कष्ट कमी करेल तसेच ते वापरायला सोपे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना  त्याचा फायदा होऊन त्यांचे वेळेतही बचत होते.

3- सोनालिका कम्बाईन हार्वेस्टर पिकांच्या उत्पन्नामध्ये देखील वाढ करेल आणि गुणवत्ता मध्ये होणारी घट वाचवून पिकांचे नुकसान कमी करेल.

4- सोनालिका सम्राट कम्बाईन हार्वेस्टर कापनी, थ्रेशिंग सारखे कामे करण्याची सुविधा पुरवते.

5- सोनालिका कम्बाईन हार्वेस्टर गहू, तांदूळ, सोयाबीन, सूर्यफूल, हरभरा कापणीच्या वेळेस सोप्या पद्धतीने आणि आरामदायक रित्या  उत्पन्न मिळावे यादृष्टीने डिझाईन केले गेले आहे.

6-

हे हार्वेस्टर प्रोजेक्टर हेडलाइट्स, एलईडी टेल लॅम्प, शेतकऱ्यांसाठी जास्त वेळ काम करू शकतील अशी आरामदायक बैठक तसेच ऍडजेस्ट टेबल एअरगो स्टेरिंग यासारख्या आधुनिक सुविधा पुरवते.

7- याचा पावर पॅक डिझेल इंजन 2200 आरपीएमवर 101 एचपी पावर जनरेटर करते.तसेच व्यवस्थित संचालनासाठी 5 स्पीड कॉन्टेस्ट मेश गिअर बॉक्स जोडले आहे.

8- हार्वेस्टर डिस्पॅच करण्याच्या अगोदर विविध गुणवत्ता मानक जसे स्पीड, ब्रेकिंग तसेच कठीण परीक्षण करून यालटेस्ट केले जाते.

9-सोनालिका सम्राट कम्बाईन हार्वेस्टर दोन डब्ल्यू डी, चार डब्ल्यू डी पर्याय सोबत शेतकऱ्यांच्या आवश्यकता नुसार वेगवेगळ्या अटॅचमेंट सोबत उपलब्ध आहे.

English Summary: sonalika establish plant to making harvestor
Published on: 23 July 2021, 05:27 IST