शेतकऱ्यांनी जर ट्रॅक्टर घ्यायचे ठरवले आणि त्यांच्या बजेटप्रमाणे जर त्यांना उत्तम प्रकारचा ट्रॅक्टर मिळाला तर त्यांना शेतीत फायदा तर होतोच परंतु कमी खर्चात लाईफ टाईम शेतीचे कामे करायला मदत होते.
तसे पाहायला गेले तर भारतामध्ये अनेक ट्रॅक्टर्स ब्रँड आहेत. परंतु यामध्ये देखील देशातील नंबर वन निर्यात ब्रँड आणि देशातील आघाडीच्या ट्रॅक्टर उत्पादकांका पैकी एक इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडने सोलीस यानमार ब्रँड पोर्टफोलिओ मागे काही दिवसांपूर्वी लॉन्च करून त्याची नवीन YM3 ट्रॅक्टर सिरीज लॉन्च केली. या लेखामध्ये आपण या सोलीस यानमार YM3 ट्रॅक्टर सिरीजचे वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत.
भारतीय शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन खास डिझाईन केले
1- तुमच्या माहितीसाठी सांगतो की सोलीस यानमारने याआधी दोन नवीन ट्रॅक्टर सादर केले आहेत. त्यापैकी पहिले म्हणजे YM342A आणि दुसरे म्हणजे YM348Aहे होय.
2- यामाहा च्या 110 वर्ष जुन्या डिझेल इंजिनवर कार्यक्षमतेने तयार करण्यात आलेली नवीन YM3 मालिका पूर्णपणे भारतीय शेतकऱ्यांच्या गरजा लक्षातघेऊन व त्या पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.ती भारतीय परिस्थितीत शेतीसाठी कठोरपणे तयार करण्यात आली आहे.
YM3 ट्रॅक्टर ची वैशिष्ट्ये
1-YM3 सिरीजच्या या ट्रॅक्टर मध्ये जागतिक दर्जाची इंजिन,फुल सिंनक्रोमेश गिअर, पुष बटन वर चालणारे पीटीओ यासारखे संपूर्ण सीलबंद वैशिष्ट्ये आहेत.
2- शेतकऱ्यांच्या तसेच शेतीच्या विशेष अवजारांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी हे ट्रॅक्टर एक उत्तम पर्याय आहे.
3- या ट्रॅक्टर चे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे भारतात लॉंच होण्यापूर्वी YM3 ट्रॅक्टर रेंजने थायलंड,आग्नेय आशियाई देश,युरोप,ब्राझील तसेच युएस मार्केटमध्ये निर्यात करून जगभरात आपला ठसा उमटवला आहे.
4- यानमार YM3 मालिकेमध्ये शेतकऱ्यांच्या सोयीसाठी अग्रोनोमीकली डिझाईन केलेल्या चार-वे ॲडजेस्टबल सीट आणि पावर स्टेरिंग सह हिरो डायनामिक होर्नेट डिझाईन आहे.
5- या ट्रॅक्टरचा केंद्रस्थानी प्रसिद्ध जपानी इंजिन तंत्रज्ञान आहे जे इष्टतम काम साध्यकरण्यासाठी तयार केले गेले आहे.
6- ट्रॅक्टर पावर हाउस हे मोनो प्लांटर FIP आणि फेदर टच 8F+8R शटल शिफ्ट ट्रान्समिशनसह चार सिलेंडर इंजिन आहे. चांगला कार्यक्षमतेसाठी आवाज आणि कंपन दूर करण्यासाठी बॅलेन्सर शाफ्टसह एकत्रित केले आहे.
Published on: 02 June 2022, 12:01 IST