ट्रॅक्टर आणि शेतकरी सोबत शेती यांचे एकमेकांशी अगदी घनिष्ठ व जिव्हाळ्याचे नाते आहे. सध्या शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा जास्त प्रमाणात वापर होत असल्यामुळे शेतीच्या पूर्व मशागतीसाठी ट्रॅक्टर चा उपयोग फार मोठ्या प्रमाणात केला जातो.
नांगरणी, जमीनीला रोटावेटर यासाठी ट्रॅक्टर चा उपयोगमोठ्या प्रमाणात केला जातो. जसे बैल आणि शेतकरी यांचे जीवाभावाचे नाते होते किंबहुना अजूनही आहे. तसेच माती ट्रॅक्टर आणि शेतकऱ्यांचे आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आता भारतीय बाजारपेठेमध्ये ट्रॅक्टरच्या बऱ्याच कंपन्या कार्यरत आहेत. हे आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, सोनालिका, जॉन डियर या कंपन्यांची नावे अग्रस्थानी घेतले जातात. परंतु या ट्रॅक्टर कंपन्यांच्या भाऊगर्दीतभारतीय बाजारपेठेत एका अनोळख्या कंपनीने आपल्या उत्पादनाची सुरुवात केली होती. या कंपनीचे नाव आहे सोलीस यानमार हे होय.
नक्की वाचा:येणारा काळ आपलाच, फक्त करा या फुलांची शेती आणि मिळवा महिन्याला लाखो रुपये
जगातील आघाडीच्या ट्रॅक्टर ब्रँड पैकी एक आहे. सोलीस यानमार या ट्रॅक्टरने भारतीय बाजारपेठेमध्ये आपल्या उत्पादनाचा श्री गणेशा दोन वर्षापूर्वी केला आणि पाहता पाहता या दोनच वर्षांमध्ये तब्बल तेरा हजार ट्रॅक्टर विक्रीचा विक्रमी टप्पा कंपनीने गाठला आहे. या कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजेही कंपनी ग्राहकांच्यापरिपूर्ण समाधानासाठीअग्रणी आणि अपडेटेड तंत्रज्ञान प्रदान करते. सोलीस यानमार ट्रॅक्टर मध्ये कठोरता, टिकाऊपणा तसेच उच्च कार्यक्षमता ठासून भरलेली आहे.
सोलीस यानमार ब्रांड ची माहिती
इंटरनॅशनल ट्रॅक्टर लिमिटेडचा फ्लॅगशिप ब्रँडने त्याच्या स्थापनेपासून शंभर वर्ष पुढे राहण्यासाठी शंभर वर्षाच्या जपानी तंत्रज्ञानाचे भांडवल करणे सुरू ठेवले आहे. प्रगत कृषी बाजारपेठेमध्ये आपले वर्चस्व वाढवण्यासाठी कायम प्रयत्नशील आहे. सोलीस यानमार ट्रॅक्टर ब्रँड हा सात युरोपियन देशांमध्ये नंबर एक ब्रँड आहे. सॉलिस यानमारणे प्रसिद्ध वायएम 3 ट्रॅक्टर श्रेणी सादर केली आहे. तसेच 250 पेक्षा अधिक डीलरशिप पर्यंत नेटवर्क मजबूत केल्या असून भारतातील पहिल्या हायब्रीड ट्रॅक्टर आणि इतर अनेक प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज ट्रॅक्टर लाँच केले आहेत.
भारतीय बाजारपेठेमध्ये अवघ्या दोनच वर्षात तेरा हजार ट्रॅक्टर्स विक्रीचा टप्पा कंपनीने गाठला असून यानमार सोबतचा आमचा संयुक्त उपक्रम फलदायी ठरत आहे. आम्ही जपानी तंत्रज्ञानाच्या शंभर वर्षाच्या फायदा घेण्यासाठी चांगल्या स्थितीत आहोत. पुढील शंभर वर्षा साठी आम्ही नवीन काम करत राहू असे सोलीस यानमारचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक रमण मित्तल म्हणाले.(स्त्रोत-महाराष्ट्र लोकमंच)
Published on: 13 April 2022, 09:27 IST