Farm Mechanization

माती परीक्षण हेशेतीच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने खूपच उपयुक्त आहे.आपल्याला माहित आहेच की, माती परीक्षण केल्याने आपल्याला आपल्या शेतातील मातीत असलेले घटकव त्यांचे प्रमाण कळते.व त्या दृष्टीने आपल्याला खतांचे नियोजन करता येते.

Updated on 12 March, 2022 10:38 AM IST

माती परीक्षण हे शेतीच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने खूपच उपयुक्त आहे.आपल्याला माहित आहेच की, माती परीक्षण केल्याने आपल्याला आपल्या शेतातील मातीत असलेले घटकव त्यांचे प्रमाण कळते.व त्या दृष्टीने आपल्याला खतांचे नियोजन करता येते.

. परंतु आताची माती परीक्षणाचे प्रचलित पद्धतीचा विचार केला तर त्यामध्ये आपल्याला मातीचा नमुना घेऊन तो जवळपास असलेल्या शहराच्या ठिकाणी प्रयोगशाळेमध्ये न्यावा लागतो. त्यानंतर त्याचे निष्कर्ष मिळण्यासाठी दोन ते सात दिवसांचा कालावधी लागू शकतो. यामध्ये शेतकऱ्यांचा वेळ तर वाया जातोच परंतुपैसा देखील खर्च होतो. परंतु हेच माती परीक्षणाचे काम अगदी काही सेकंदात झाले तर किती छान होईल. तर असेच एक तंत्रज्ञान आयआयटी कानपूर येथील संस्थेच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे. या कृषी शास्त्रज्ञांनी एक निअर इन्फ्रारेडस्पेक्ट्रोमेट्रीतंत्रज्ञानावर आधारित एक किट बनवली असून या किटच्या साहाय्याने माती परीक्षणाचा निष्कर्ष मोबाईलवर त्वरीत मिळण्यासाठी भूक परिरक्षक ए मोबाईल ॲप तयार केले. हे मोबाईल ॲप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

परिक्षणाची पद्धत

  • या तंत्रज्ञानात पाच ग्रॅम मातीचा नमुना पाच सेंटीमीटर लांबीच्या परीक्षानळी सारख्या दिसणाऱ्या उपकरणामध्ये टाकायचा त्यानंतर हे उपक्रम ब्ल्यूटूथ द्वारे मोबाईलशीजोडायचे. याद्वारे माती विश्लेषणाचे प्रक्रिया नव्वद सेकंदामध्ये पार पडते. त्यानंतर मोबाईलच्या स्क्रीनवर भु परिरक्षक या ॲपमध्ये मातीच्या आरोग्याचा अहवाल एकमेव अशा आयडीक्रमांकासहत्वरित उपलब्ध होतो.
  • कीट च्या साह्याने मातीमधीलमुख्य अन्नद्रव्य जसे की नत्र,स्फुरद,पालाश इत्यादी घटकांचे प्रमाण देखील समजू शकते.इतकेच नाही तर माती मध्ये असलेले सेंद्रिय कर्बव इतर घटकांचे प्रमाण देखील समजते.
  • पिकांचा उल्लेख केलेला असल्यास त्या पिकासाठी शिफारशीत खत मात्रा आणि परीक्षणानुसार करायचे बदल नुसार आपल्या शेतीसाठीच्या खतशिफारसी सुचवले जातात. त्यानुसार आपल्याला पिकाचे खत व्यवस्थापन करणे सोपे होते.

तंत्रज्ञानाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य

  • हे उपकरण आकाराने अत्यंत लहान व वायरलेस असल्यामुळे कोणत्याही ठिकाणी ने आन करणे सोपे आहे.
  • अवघ्या नव्वद सेकंदामध्ये मातीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते.
  • या उपकरणाद्वारे एक लाखापर्यंत मातीचे नमुने तपासता येतात.
  • हे उपकरण आणि भू परिरक्षक ॲप वापरायला अत्यंत सोपे आहे. मोबाईल वापरणारा कुठलाही व्यक्ती सहजपणे हे वापरता येते.
English Summary: soil tesating kit develope by kanpur iit scientist that possible to soil testing in 90 second
Published on: 12 March 2022, 10:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)