Farm Mechanization

आयशर हे ट्रॅक्टर उद्योगातील सर्वात जुन्या नावांपैकी एक नाव आहे. आयशर ट्रॅक्टर शेतकर्यांमध्ये खूप लोकप्रिय असून कंपनी 18 ते 60 एचपीच्या रेंजमध्ये पंधरापेक्षा जास्त ट्रॅक्टरची श्रेणी ऑफर करते. आयशर 330 एक 30 एचपीचा ट्रॅक्टर लॉन्च झाल्यापासून शेतकऱ्यांमध्ये लोकप्रियता मिळवत आहे.

Updated on 16 July, 2022 7:32 PM IST

आयशर हे ट्रॅक्टर उद्योगातील सर्वात जुन्या नावांपैकी एक नाव आहे. आयशर ट्रॅक्टर शेतकर्‍यांमध्ये खूप लोकप्रिय असून कंपनी 18 ते 60 एचपीच्या रेंजमध्ये पंधरापेक्षा जास्त ट्रॅक्टरची श्रेणी ऑफर करते. आयशर 330 एक 30 एचपीचा ट्रॅक्टर लॉन्च झाल्यापासून शेतकऱ्यांमध्ये लोकप्रियता मिळवत आहे. 

हा ट्रॅक्टर लहान क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी आहे. या ट्रॅक्टर च्या मदतीने शेती संबंधित अनेक उपकरणे चालवता येतात.

आयशर 330 ट्रॅक्टरचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची किंमत देखील शेतकऱ्यांच्या अगदी बजेटमध्ये आहे. खरीप हंगामात खरेदीसाठी या ट्रॅक्टरवर विशेष ऑफर देखील सुरू आहे. या लेखात आपण आयशर 330 ट्रॅक्टर ची वैशिष्ट्ये आणि किंमत याविषयी माहिती घेऊ.

नक्की वाचा:Tractor Information: शेतकऱ्यांसाठी फायदेशीर राहील 'हे'40 HP श्रेणीतील सर्वात पावरफूल ट्रॅक्टर, वाचा माहिती

 'आयशर 330' ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

1- इंजिन-हा ट्रॅक्टर तीन सिलेंडर, तीस हॉर्स पावर आणि 2272 सीसी पावरफुल इंजिनसह येतो. या ट्रॅक्टर मध्ये इनलाइन इंधन पंप देण्यात आला आहे.

सिम्पसन कंपनीने हे इंजिन दिले आहे. कुलींगसाठी  वाटर कुलिंग सिस्टिम देण्यात आले आहे. यासोबतच हे ट्रॅक्टर कॉस्टंट मॅश आणि स्लाइडिंग मॅशच्या संयोजनासह सेंटर शिफ्ट प्रकार ट्रान्समिशन सोबत जोडलेला आहे.

या ट्रॅक्टर ला आठ फॉरवर्ड आणि दोन रिव्हर्स गिअर देण्यात आले आहेत. हे ट्रॅक्टर कमाल 29.83 किमी प्रति तास वेगाने काम करू शकते तसेच सिंगल क्लचसह येते. कंपनीने या ट्रकमध्ये बारा वॅट आणि 75ah बॅटरी दिली आहे.

नक्की वाचा:Mini Tractors: बाजारात उपलब्ध असलेले स्वस्त दरातील मिनी ट्रॅक्टर, वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या

2- ब्रेक आणि स्टीयरिंग- आयशर 330 ट्रॅक्टर ऑइल इमरस्ड ब्रेकसह येते. हे ब्रेक जास्त काळ टिकतात आणि मजबूत पकड देतात. कंपनीने या ट्रॅक्टर मध्ये मेकॅनिकल पावर स्टेरिंग दिले आहे.

3- पिटीओ आणि हायड्रॉलिक्स- आयशर 330 ट्रॅक्टर मध्ये लाइव्ह पिटीओ दिलेला आहे आणि हा पीटीओ 1000rpm वर चालतो.

या ट्रॅक्टर मध्ये तीन पॉईंट लिंकेजसह ADDC प्रकारातील हायड्रॉलिक्स देण्यात आले आहेत. या हायड्रोलिकची उचलण्याची क्षमता बाराशे किलो आहे. तीस एचपी श्रेणीतील ट्रॅक्टर मध्ये उचलण्याची क्षमता खूप चांगली मानली जाते.

4- आयशर 330 ट्रॅक्टरची किंमत-आयशर 330 ट्रॅक्टर ची किंमत चार लाख 84 हजार 330 रुपये आहे.ही किंमत एक्स शोरूम आहे.या ट्रॅक्टर वर खरीप हंगामात आकर्षक ऑफर्स देण्यात येत आहेत.

नक्की वाचा:ट्रॅक्टर कट्टा: YM3 ट्रॅक्टर आहे शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी वरदान,जाणून घेऊ त्याची वैशिष्ट्ये

English Summary: so many important features in eicher 330 tractor that useful for farming
Published on: 16 July 2022, 07:32 IST