Farm Mechanization

सध्या शेतीमध्ये विविध प्रकारच्या यंत्रांचा उपयोग विविध कामांसाठी होतो.अगदी लागवडीपूर्वी शेताची पूर्वमशागत असो कीपिकांची आंतरमशागत तसेच काढणीपर्यंत ची कामेही अनेक यंत्रांच्या साह्याने केले जातात.

Updated on 11 March, 2022 12:47 PM IST

सध्या शेतीमध्ये विविध प्रकारच्या यंत्रांचा उपयोग विविध कामांसाठी होतो.अगदी लागवडीपूर्वी शेताची पूर्वमशागत असो कीपिकांची आंतरमशागत तसेच काढणीपर्यंत ची कामेही अनेक यंत्रांच्या साह्याने केले जातात.

शेतीच्या कामासाठी वेगळ्या प्रकारची उपयुक्त यंत्र विकसित करण्यात आले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांची कामे सुसह्य होऊनवेळ आणि पैशांची देखील बचत होण्यास मदतहोते. या लेखामध्ये आपणगहू काढण्यासाठी उपयुक्त अश्या छोट्या कृषी यंत्राबद्दल जाणून घेणार आहोत.

 गहू काढण्यासाठी उपयुक्त रीपर कृषी यंत्र……

गहू हे रबी हंगामातील सगळ्यात महत्त्वाचे पीक आहे.जास्तीत जास्त लागवडीखालीलक्षेत्र हे रब्बी हंगामात गहू पिकाने व्यापलेले असते.आता काही दिवसांमध्ये गहू काढणीचा हंगाम सुरू होईल.तेव्हाचशेतकरी दादांना गव्हाचे पीककापणी करून ते हाताळल्यानंतर घरी नेणेखूप जिकिरीचे काम असते

जर आपण गहू काढणी यंत्राचा विचार केला तर मोठी यंत्रे खरेदी करणेआर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखे नाही.बाजारामध्ये अनेक उत्तम आणि नवीन तंत्रज्ञानाची कृषी यंत्र उपलब्ध आहेत.परंतु कापणी यंत्र हे गव्हाचे पीक करण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते.या छोट्याशा यंत्राच्या मदतीने शेतकरी आपले गहू सहज काढू शकतो. या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे हे यंत्र तुम्ही तुमच्या घरातील कमी जागेतही सहजपणे ठेऊ शकतात.या यंत्राच्या आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे यंत्र खासकरून लहान आणि मध्यम वर्गीय शेतकऱ्यांसाठी खास करून डिझाइन करण्यात आले आहे.

हे यंत्र गहू कापणी करताना पिकाच्या एक ते दोन इंच वर कापणी करते आणि एवढेच नाही तर या यंत्राचे वजन फक्त आठ ते दहा किलोच्या दरम्यान आहे.त्यामुळे त्याची सहज ने-आण करणे शक्य होते.त्याला लागणारे इंधन देखील कमी लागते. या यंत्राच्या साह्याने मका, धान, गहू,ज्वारी सारखी पिकांची काढणी करता येते.यारीपर यंत्राचे सहाय्यानेही कामे सहजरीत्या करता येतात. भारतीय बाजारात रिपर कृषी यंत्राची किंमत सुमारे 15 हजारापासून ते 40 हजार रुपयांपर्यंत आहे.

English Summary: small wheat riper machine is useful for wheat crop harvesting
Published on: 11 March 2022, 12:47 IST