नवी दिल्ली- सर्व क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या (Agri technology) वापरामुळे माहितीची उपलब्धता, प्रसार आणि उपयोजन शक्य झाले आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी डिजिटल धोरणामुळे कृषी तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन दिले जात आहे.
शेतकरी आणि कृषी बाजारपेठ यासाठी उपयुक्त ठरणारे विविध अप केंद्र सरकारने लाँच केले आहे. नवीनतम बाजारातील ट्रेंड्स, उपकरणे, तंत्रज्ञान आणि वापराच्या पद्दती यांच्या विषयी सर्वंकष माहिती एका क्लिकवर शेतकऱ्यांना उपलब्ध होते. शेतकऱ्यांसाठीचे अँड्रॉईड अप संबंधित सरकारी वेबसाईट किंवा गूगल प्ले स्टोअर वरुन डाउनलोड करू शकतो.
केंद्र सरकारने लाँच केलेले विविध अप्सची माहिती जाणून घेऊया:
1. किसान सुविधा (Kisan Suvidha)
वर्तमान दिवस आणि पुढील 5 दिवसांच्या हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांना या अपद्वारे कळविला जातो. हवामानाच्या माहितीसोबत डीलर्स, बाजारभाव, कृषी सल्लागार, पीक संरक्षण, एकीकृत कीटक व्यवस्थापन याविषयी सर्व माहिती एका क्लिकवर शेतकऱ्यांना अपद्वारे उपलब्ध होतो.
2.पुसा कृषी (Pusa Krishi)
कीटक नियंत्रण हा पीक व्यवस्थापनचा महत्वाचा भाग आहे. बदलत्या हवामानामुळे पिकांवर विविध प्रकारचे रोग पडतात. पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होतो. शेतकऱ्यांना पिकांवरील विविध रोगांची माहिती व करावयाच्या उपाययोजना याविषयी माहिती एका क्लिकवर पुसा कृषी अपवर उपलब्ध आहे.
3.एम-किसान अप्लिकेशन (MKisan Application)
अँड्रॉईड अपद्वारे शेतकरी व भागधारकांना संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ व सरकारी अधिकारी यांच्याद्वारे उपलब्ध असलेली माहिती उपलब्ध होते. एम-किसान पोर्टलवर शेतकऱ्यांना विविध माहिती उपलब्ध आहे. मात्र, या पोर्टलवर लॉग-इन न करता देखील शेतकऱ्यांना या अपवर माहिती सहज उपलब्ध होते.
4.शेतकरी मासिक अँड्रॉईड अप (Shetkari Masik Android App)
शेतकरी मासिक डाउनलोड करण्यासाठी या अपचा वापर केला जाऊ शकतो आणि इंटरनेट कनेक्शन शिवाय शेतकरी वाचू शकतात. कृषी क्षेत्रात नावाजलेले “शेतकरी मासिक” प्रसिद्ध आहे. गेल्या साठ वर्षापासून शेतकऱ्यांना अधिकृत माहिती या मासिकाद्वारे उपलब्ध होते. महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाद्वारे मासिक प्रकाशित केले जाते.
5.फार्म-ओ-पीडिया अप (Farm-o-pedia App)
कृषी व्यवसायात कार्यरत प्रत्येकासाठी फार्म-ओ-पीडिया अप अत्यंत महत्वाचे मानले जाते. मातीचा पोत आणि हंगामानुसार सुसंगत पीक, पिकनिहाय माहिती, तुमच्या परिसरातील हंगामाची माहिती, पशुधनाची व्यवस्था या सर्वांची माहिती या अपवर उपलब्ध आहे.
6.क्रॉप इन्श्युरन्स अँड्रॉईड अप (Crop Insurance Android App)
क्रॉप इन्श्युरन्स मोबाईल अपद्वारे शेतकऱ्यांना क्रॉप इन्श्युरन्सची माहिती उपलब्ध होते. प्रीमियम तपशील, अनुदान रक्कम, इन्श्युर्ड रक्कम यासर्वांची माहिती अपद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध होते.
Published on: 01 September 2021, 01:30 IST