सध्या शेतीमध्ये यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात होत असून पिकांची लागवड ते काढणीपर्यंतची बरीचशी कामे यंत्राच्या साहाय्याने केली जातात. यंत्राचा वापर केल्यामुळे वेळ आणि खर्चात बचत तर होतेच परंतु काम देखील कष्टदायक न राहता सुखप्रद होते.
तसे पाहायला गेले तर शेती मध्ये वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे आली असून यामध्ये सीड ड्रिल मशीन हेदेखील एक उपयुक्त यंत्र आहे. भातशेतीसाठी जर या यंत्राचा वापर केला तर कमी श्रम व कमी वेळेत भात लागवड शक्य आहे. या लेखात आपण सीड ड्रिल मशीन विषयी माहिती घेऊ.
नेमकी काय आहे सीड ड्रिल मशीन?
एक प्रभावी कृषी यंत्र असून पिकांची पेरणी साठी याचा वापर केला जातो. या यंत्राच्या साहाय्याने अगदी समान पद्धतीने बियाण्यांची वितरण एका विशिष्ट खोलीत जमिनीत केले जाते. तसेच सारख्या पद्धतीने बियाण्यावर माती झाकण्यासाठीची देखील काम करते.
या यंत्राच्या साह्याने तुम्ही भात,बाजरी, भुईमूग, गहू, मका, वाटाणे, सोयाबीन, बटाटा, कांदा, कापूस आणि अजून बऱ्याच पिकांची सहजरीत्या पेरणी करता येते. या यंत्राच्या साह्याने पेरणी केल्यास बियाणे फुटत नाही व संपूर्ण शेतामध्ये एक सारखी लागवड करता येते.
एवढेच नाही तर बियाणे लागवडीनंतर व्यवस्थित पद्धतीने माती देखील लावता येते. तसेच या सीड ड्रिल मशीन द्वारे खते देखील देता येतात.
या यंत्राचे प्रकार
याचे दोन प्रकार असून एक म्हणजे मॅन्युअल सीड ड्रिल मशीन आणि दुसरे म्हणजे ऑटोमॅटिक सिड ड्रिल मशिन होय. पहिल्या प्रकारात प्रत्येक गोष्ट हाताने सेट करावी लागते तर दुसऱ्या प्रकारात जास्त सेटिंग ची आवश्यकता भासत नाही.
या यंत्राची बाजारातील किंमत
जर तुम्हाला मॅन्युअल सीड ड्रील मशीन विकत घ्यायची असेल तर त्यासाठी अंदाजे 40 त्या 90 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो व तुम्हाला आटोमॅटिक सीड ड्रील मशीन घ्यायची असेल तर त्याची किंमत 50 हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत असू शकते.
नक्की वाचा:प्रीत 4049 ट्रॅक्टर: कमी डिझेलमध्ये शेतात करते जास्तीचे काम, वाचतो शेतकऱ्यांचा खर्च
Published on: 12 August 2022, 12:51 IST