सध्या मजुरांची टंचाई शेती व्यवसायातील सर्वात मोठी समस्या आहे. मजुरांच्या टंचाईमुळे पिके काढण्याचे काम वेळेवर होत नाही. परिणामी बऱ्याच प्रमाणात पिकांचे नुकसान होते. जर आपण पीक काढणीच्या पारंपरिक पद्धतीचा विचार केला तर एका एकराला दहा ते बारा मजूर सहजपणे लागतात.
त्यामुळे आता हार्वेस्टर मशीन चा उपयोग सर्रासपणे होताना दिसत आहे.परंतु हार्वेस्टर मशीन प्रत्येक वेळी उपलब्ध होते असे नसते. म्हणून याला उत्तम पर्याय आहे रिपर बाईंडर. गव्हाच्या किंवा इतर पिकांच्या कापणीसाठी रिपर बाईंडर हा एक चांगला पर्याय आहे. रिपर बाईंडर या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे हे यंत्र पीक कापणी तर करते परंतु कापलेल्या पिकाच्यापेंध्याबांधण्याचे कामही करते आणि बांधलेल्या गड्या एका ओळीत सोडते. म्हणून याचा फायदा असा होतो की कापलेली पीक गोळा करताना पिकाच्या काड्या गळणे,धान्य जमिनीवर सांडणेयासारखे नुकसान टळते.
रिपर बाईंडर यंत्राची रचना(Structure of riper binder)
यंत्रामध्ये एक फ्रेमकटर बार, क्लच आणि ब्रेक सह बसवलेले हँडल, ड्रायव्हर साठी शीट, दोन ड्राईव्ह व्हिल्स, पीक गोळा करणारे घटक आणि कापलेली पीक बांधण्यासाठी सुतळी असते या यंत्राच्या कटिंग युनिट हे डिस्क प्रकाराचे किंवा कटर बार प्रकारातील असते. या यंत्रातील कटर बार द्वारे पिकांची कापणी केली जाते. पीक कापणी केल्यानंतर एका बाजूला असलेल्या बांधणाऱ्या यंत्रणेने सुतळीने कापलेल्या पिकाची गड्डी बांधली जाते.या गड्या बांधल्यानंतर एका मागोमाग ओळीत पडतात. या यंत्राचे स्वयंचलित प्रारूप उपलब्ध आहे. जर खरीप मधील तांदूळ आणि रब्बी मधील गहू पिकाचा विचार केला तर या पिकांच्या काढण्यासाठी रिपर बाईंडर हे यंत्र खूप उपयुक्त ठरते.
रिपर बाईंडर यंत्राचे वैशिष्ट्य(Feature of ripper binder)
- पिकाची काढणी व बांधणी एकाच वेळी होते.
- लहान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे.
- गहू, तांदूळ आणि चारा पिकासाठी उपयुक्त
- एक लिटर डिझेल मध्ये एका एकरातील शेतातील कापणी व बांधणी होते.
- पिकाची काढणी व बांधणी साठी लागणारा वेळ आणि खर्च यांची बचत होते. ( स्त्रोत - ॲग्रोवन)
Published on: 20 November 2021, 01:27 IST