भातशेती लागवड शेतकऱ्यांसाठी दिवसेंदिवस बिकट समस्या होत चालली आहे. शेतकरी (farmers) भात शेतीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे यावर मात करण्यासाठी यांत्रिक पद्धतीने भात लागवड केली जावी असे धोरण कृषी विभागाने (Department of Agriculture) स्वीकारले आहे.
शेतीत यांत्रिकीकरणाचा आभाव, अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या अधिक असणे ही या मागील प्रमुख कारणे आहेत. जिल्ह्यात १ लाख १८ हजार हेक्टर एवढे पडीक क्षेत्र आहे. त्याशिवाय जिल्ह्यात सिंचनाच्या फारशा सुविधा उपलब्ध नाहीत. सिंचन क्षेत्र हे केवळ ७ हजार हेक्टर एवढे आहे.
यातील ४० टक्के क्षेत्र हे विहिरींच्या पाण्यावर अवलंबून आहे. अशा विविध कारणांमुळे भात शेतीपासून शेतकरी दुरावत असल्याचे दिसून येत आहे. ही बाब लक्षात घेऊन कृषी विभागाने शेतकऱ्यांना शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी प्रोत्साहित करण्याचे धोरण स्वीकारले आहे.
हे ही वाचा
Today Horoscope: 'या' ५ राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
कृषी विभागाच्या वतीने रायगड जिल्हातील खालापूर व रोहा येथील शेतकरी व शेतकरी गटांना यंत्राच्या साहाय्याने भात लावणीचे महत्त्व पटवून देण्यात आले. यांत्रिकीकरण पद्धतीत मजूर कमी लागतात व रोपवाटिकेचा खर्च सुद्धा कमी होतो.
भात शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन जिल्ह्यामध्ये करण्यात आले असून यामध्ये चारसूत्री पद्धतीने भात लागवड, एसआरटी पद्धतीने भात लागवड, ड्रम सीडरद्वारे भात लागवड व यांत्रिक पद्धतीने भात लागवड यांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांचा कल यंत्राद्वारे भातशेतीकडे वाढविण्यासाठी जिल्ह्यातील खालापूर व रोहा येथील शेतकरी व शेतकरी गटांच्या माध्यमातून यंत्राद्वारे यशस्वीरित्या भात लावणी करण्यात आली. या यांत्रिक पद्धतीतून शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे.
हे ही वाचा
Petrol-Diesel: पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठे बदल; जाणून घ्या आजचे नवीन दर
यांत्रिक भात लागवड
1) यंत्राद्वारे लागवड करण्यासाठी सर्वप्रथम रोपवाटिका तयार करण्यासाठी शेतातील माती चाळून घ्या.
2) एक हेक्टर क्षेत्राच्या रोपवाटिकेसाठी लागणारी माती चाळण्याचे काम एक मजूर एक दिवसात करतो.
3) मॅट रोपवाटिका तयार करण्यासाठी प्लास्टिक ट्रे २७.५ २१.५ सें.मी.चे २ याप्रमाणे ३०० ट्रे लागतात.
4) ते साधारण तीन हजार रुपये किंमतीचे होतात.
5) प्रत्येक ट्रेमध्ये साधारणपणे ८० ते ९० ग्रॅम बियाणे प्रति ट्रे प्रमाणे २५ किलो बियाणे प्रति हेक्टर लागते.
6) ते पारंपरिक पद्धतीपेक्षा १५ किलोने कमी लागते.
7) रोपवाटिका तयार करताना सुरुवातीला ६० ते ७० % ट्रे मातीने भरून घेऊन त्यामध्ये २० ग्रॅम प्रति ट्रे प्रमाणे १५:१५:१५ हे खत मातीत मिसळून त्याच्यावर एकसमान बियाणे पसरवावे लागते. त्यानंतर वरून चाळणीने मातीचा थर द्यावा लागतो.
8) त्यावर भाताचा पेंडा झाकून सकाळ व संध्याकाळी फवारणी पंपाच्या साहाय्याने पाणी द्यावे लागते, जेणेकरुन बी बाहेर पडणार नाही. ही रोपवाटिका १८ ते २१ दिवसात तयार होते.
महत्वाच्या बातम्या
Eknath Shinde: चक्क एकनाथ शिंदेंनीच केला मोदींचा निर्णय रद्द; आवास योजनेला दिली स्थगिती
Farmer Scheme: शेतकऱ्यांसाठी मनसे मैदानात, केली मोठी घोषणा..
Planting vegetables! शेतकरी मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात करा 'या' भाज्यांची लागवड; मिळेल भरघोस उत्पन्न
Published on: 26 July 2022, 01:52 IST