Farm Mechanization

शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची कामे करत असतो. ट्रॅक्टरमुळे शेतीची कामे अधिक जलदगतीने पुर्ण होतात असतात. मशागतीपासून ते कापणी पर्यंतची कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जातात. शेतीच्या कामात ट्रॅक्टरची मोठी मदत होत असल्याने अनेक शेतकरी ट्रॅक्टर घेण्यासाठी आग्रही असतात.

Updated on 09 May, 2020 1:51 PM IST


शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची कामे करत असतो. ट्रॅक्टरमुळे शेतीची कामे अधिक जलदगतीने पुर्ण होतात असतात. मशागतीपासून ते कापणी पर्यंतची कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जातात. शेतीच्या कामात ट्रॅक्टरची मोठी मदत होत असल्याने अनेक शेतकरी ट्रॅक्टर घेण्यासाठी आग्रही असतात. परंतु ट्रॅक्टर घेताना काही गोष्टींची दक्षता घ्यावी लागते. आज आपण त्याचविषयी माहिती घेणार आहोत.  आज बाजारात बरेच स्वदेशी आणि विदेशी ब्रॅण्डचे ट्रॅक्टर आहेत, जे सर्व प्रकारच्या शेतीशी संबंधित कामे पार पाडण्यास सक्षम आहेत. वेळोवेळी सर्व कंपन्या शेतकऱ्यांच्या गरजा पाहून त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये नवीन वैशिष्ट्ये जोडत असतात. अशा परिस्थितीत योग्य ट्रॅक्टर निवडणे फार महत्वाचे असते. जर आपण ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर खरेदी करताना आपल्याला पॉवरविषयी विशेष  माहिती असणे आवश्यक आहे.

ट्रॅक्टरच्या पॉवरबद्दल माहिती ठेवा, कारण

ट्रॅक्टरच्या पॉवरविषयी आपण माहिती ठेवणे आवश्यक असते. कारण शेतीसंबंधिची कामे सहज पद्धतीने करण्याचे सामर्थ्य ट्रॅक्टरमध्ये असते. पॉवरच सुनिश्चित करत असते की, शेतीची कामे करण्यास ट्रॅक्टर योग्य आहे किंवा नाही. पॉवर जास्त असली तर इंधनाची बचत होत असते. 

ट्रॅक्टरमध्ये उपयुक्त शक्ती काय आहे?

ट्रॅक्टरला देण्यात आलेली पॉवर ही विविध भागांमध्ये ऊर्जा प्रदान करत असते. जसे की, रेडिएटर पंखा चालविण्यासाठी, अल्टरनेटर चालविण्यासाठी, गिअर बॉक्स चलाविण्यासाठी या ठिकाणी ऊर्जा प्रदान केल्यानंतर जी पॉवर वाचते ती आपल्यासाठी उपयोगी असते. याच पॉवरच्या साहाय्याने आपण विविध उपकरणे चालवत असतो. यामुळे ही  पॉवर अधिक असली तर ट्रॅक्टर इतकेच क्रियाशील असते. आपल्याला पीटीओ हॉर्सपॉवर आणि ड्रॉबार हॉर्सपॉवरच्या रुपात ही पॉवर मिळते. यासाठी पीटीओ हॉर्सपॉवर तपासले पाहिजे.

नियमानुसार प्रत्येक ट्रॅक्टरवर दिली पाहिजे पीटीओ पॉवर PTO power

भारत सरकारच्या नियमानुसार, प्रत्येकत ट्रॅक्टरवर पीटीओ पॉवरची माहिती दिली गेली पाहिजे. यामुळे ग्राहकांना त्या ट्रॅक्टरच्या क्षमतेविषयी माहिती होण्यास मदत होते.  ज्या कंपनीच्या ट्रॅक्टरची पॉवर अधिक असेल तो ट्रॅक्टर अधिक पॉवरफूल असतो. म्हणूनच, जेव्हा जेव्हा तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करायला जाणार.  तेव्हा त्याची पीटीओ शक्ती निश्चितपणे तपासून घ्या. जेणेकरुन ट्रॅक्टरच्या क्षमतेविषयी आपणांस निश्चिती कळेल.

ट्रॅक्टरवर पीटीओ पॉवर कोठे असते?

सर्व ट्रॅक्टर उत्पादक कंपन्या ट्रॅक्टरवर प्लेट ठेवतात, ज्यावर इंजिन क्रमांक, चेसिस क्रमांक, ट्रॅक्टर बनविण्याची तारीख आणि इतर संबंधित तपशील दिले जातात.  त्याच प्लेटवर पीटीओ आणि केडब्ल्यू  किंवा एचपीची माहिती दिलेली असते. जर त्यात दिलेली नसेल तर आपण शोरुममधून याविषयीची माहिती घेऊ शकता.

English Summary: PTO is important to know the capacity of tractor
Published on: 09 May 2020, 12:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)