Farm Mechanization

पिकांवर होणाऱ्या विविध प्रकारच्या रोगांचा आणि किटकांचा प्रादुर्भावामुळे पिकांच्या उत्पादनात लक्षणीय घट होते.त्यामुळे अशा रोगांना अटकाव करण्यासाठीबळीराजा विविध प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर करीत असतात. या विषारी असलेल्या किटकनाशकांची पिकांवर फवारणी करून किड व रोग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. हे कीटकनाशक विषारी असल्याने त्याचा दुष्परिणाम हा फवारणी करणार्याठच्या आरोग्यावर देखील विपरीत होऊ शकतो. त्यामुळे या लेखात आपण फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी तसेच फवारणी झाल्यानंतर कोणती काळजी घ्यावी तसेच फवारणी करण्याची योग्य वेळ याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Updated on 24 August, 2021 2:51 PM IST

पिकांवर होणाऱ्या विविध प्रकारच्या रोगांचा आणि किटकांचा प्रादुर्भावामुळे पिकांच्या उत्पादनात लक्षणीय घट होते.त्यामुळे अशा रोगांना अटकाव करण्यासाठीबळीराजा विविध प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर करीत असतात. या विषारी असलेल्या किटकनाशकांची पिकांवर फवारणी करून किड व रोग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. हे कीटकनाशक विषारी असल्याने त्याचा दुष्परिणाम हा फवारणी करणार्‍याच्या आरोग्यावर देखील विपरीत होऊ शकतो. त्यामुळे या लेखात आपण  फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी तसेच फवारणी झाल्यानंतर कोणती काळजी घ्यावी तसेच फवारणी करण्याची योग्य वेळ याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

 फवारणी करताना घ्यायची काळजी

 जेव्हा आपण रोगांच्या नियंत्रणासाठी रसायने वापरतो ही सगळी रसायने हे विषारी असतात.अशावेळी फवारणी करताना फवारणी करणाऱ्या च्याशरीरात अशी विषारी रसायने जाऊन त्याचा विपरीत परिणामसंबंधिताच्या आरोग्यावर होऊ नयेयासाठी विशेष प्रकारची काळजी घेणे आवश्यक असते. अशा विषारी रसायनांचा अधिक अंश  शरीरात गेल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. जर एखाद्या वेळी चुकीने विषारी रसायन शरीरात गेली तर डोळे जळजळणे,उलट्या होणे,शरीराची आग होणे, डोक्यात दुखणे उन्हात फवारणी करत असल्यास चक्कर येणे इत्यादी लक्षणे दिसतात. फवारणी करताना विषारी रसायने हाताळताना विशेष काळजी घेतली पाहिजे. यामध्ये द्रावण तयार करताना किंवा प्रत्यक्ष फवारणी जेव्हा करतो तेव्हा  आणि फवारणी झाल्यानंतर शिल्लक रसायनांचा रिकाम्या बाटल्या त्यांची योग्य विल्हेवाट लावणेअशा सगळ्या पातळ्यांवर व्यवस्थित काळजी घेणे आवश्यक असते.

 

कीटकनाशकाचे द्रावण तयार करताना लहान मूल किंवा अनावश्यक व्यक्तींना दूर ठेवावे. स्वतः फवारणी करणाऱ्या व्यक्तीने आपले डोळे,त्वचा आणि तोंड याचा बचाव करण्यासाठी गॉगल,शरीराचे भाग  व्यवस्थित झाकला जाईल अशा पद्धतीचेकपडे,मास्क  आणि बूट यांचा वापर करावा. नेहमी फवारणी करताना ती वार्‍याच्या विरुद्ध दिशेने करावी. जर उन्हाची तीव्रता जास्त असेल किंवा वेगाचे वारे वाहत असतील तेव्हा फवारणी करणे टाळावे. कीटकनाशक मिसळताना किंवा ते हाताळतांना तंबाखू,गुटखा तसेच अन्य तत्सम पदार्थ खाऊ नये.

फवारणी नंतर घ्यायची काळजी

 फवारणी झाल्यानंतर उरलेले किड नाशक व तन नाशक यांचे द्रावणाची  व्यवस्थित विल्हेवाट लावावी. जमिनीत खड्डा करून त्यामध्ये उरलेले द्रावण ओतूनद्यावे. तसेच नदी, तलाव, कालवे इत्यादींमध्ये फवारणी यंत्र धुऊ नये.तसेच कीडनाशकांच्या रिकाम्या बाटल्या, खोकी जमिनीत खड्डा करुन पुरुन द्याव्यात.

फवारणी झाल्यानंतर लगेच शेतामध्ये कोणालाही फिरू देऊ नये तसेच जनावरे फवारणी शेताकडे फिरकणार नाहीत याची काळजी घ्यावी.फवारणी यंत्र स्वच्छ धुऊन घ्यावे.

 फवारणी करण्याची आवश्यकता केव्हा असते?

  • पिकामध्ये व्यवस्थित सर्वेक्षण करून फवारणीची गरज आहे का? याचा विचार करावा.जर गरज असेल तरच फवारणीचा निर्णय घ्यावा.
  • पाहणी नुसार प्रमाणे आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक असेल तरच फवारणीचा निर्णय घ्यावा.अन्यथा फवारणी करणे टाळावे. अगदीच आवश्यक असेल तर सेंद्रिय किंवा वनस्पतिजन्य घटकांची फवारणी करावी.
  • कीड किंवा रोगाचे योग्य निदान करून त्यानुसार शिफारस केलेले कीटकनाशक निवडावे.
  • फवारणी यंत्राची योग्यरीत्या चाचणी करून घ्यावी. फवारणी यंत्राची पाईप किंवा टाकी गळत तर नाही ना याची खात्री करावी.

 

English Summary: precaution in the sprey on the crop
Published on: 24 August 2021, 02:50 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)