Farm Mechanization

आजकालच्या काळामध्ये शेतकरी शेतीच्या विविध कामांमध्ये यंत्रांचा वापर करू लागला आहे. शेताची पूर्वतयारी असो की लागवड किंवा पिकाची काढणी यासाठी बऱ्याच प्रकारची यंत्रे विकसित करण्यात आली आहेत. शेतकरी अशा यंत्राचा वापर अधिकाधिक प्रमाणात करून वेळेत आणि खर्च देखील बचत करून उत्पादन वाढीचा टप्पा गाठत आहेत.

Updated on 29 July, 2022 4:43 PM IST

आजकालच्या काळामध्ये शेतकरी शेतीच्या विविध कामांमध्ये यंत्रांचा वापर करू लागला आहे. शेताची पूर्वतयारी असो की लागवड किंवा पिकाची काढणी यासाठी बऱ्याच प्रकारची यंत्रे विकसित करण्यात आली आहेत. शेतकरी अशा यंत्राचा वापर अधिकाधिक प्रमाणात करून वेळेत आणि खर्च देखील बचत करून उत्पादन वाढीचा टप्पा गाठत आहेत.

पिकांमध्ये विविध प्रकारचे काम करताना तणनियंत्रण ही एक प्रमुख समस्या असते. पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी पिकाला तणमुक्त ठेवणे खूप गरजेचे असते व आपल्याला माहित आहेच कि तणनियंत्रणासाठी मजुरांवर खूप मोठा खर्च येतो व वेळ देखील जास्त वाया जातो. अशा पार्श्वभूमीवर तणांच्या नियंत्रणासाठी एक यंत्र खूप उपयोगी पडते. या लेखात आपण त्या यंत्रांची माहीती घेऊ.

नक्की वाचा:Rice farming: अरे व्वा; आता भात लागवड होणार आणखी सोप्पी, यंत्रामुळे शेतकऱ्यांना दिलासा

 तणनियंत्रणासाठी 'पावर विडर' यंत्र

1- पावर विडर यंत्र-पिकांमध्ये  तण वाढतेच परंतु बांधांवर देखील मोठ्या प्रमाणात तणाची समस्या असते. हे तण काढणे खूप महत्त्वाचे असल्यामुळे आपण बऱ्याचदा बांधाच्या कडेला वाढणारे किंवा शेतातील गवत उपटून घेण्याचा प्रयत्न करतो किंवा उपटून घेतो. परंतु त्यामुळे जमिनीच्या वरच्या भागाचे माती मोकळी होऊन जमिनीची धूप होण्याची शक्‍यता दाट प्रमाणात वाढते.

त्यासोबतच पिकांमधील तण काढण्यासाठी आपण निंदनी करतो व निंदणीसाठी फार मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्‍यकता असते व  मजूर कामाला लावल्यानंतर साहजिकच उत्पादन खर्चात वाढ होते.

नक्की वाचा:तज्ज्ञांच्या मते या पिकांची काढणी यंत्राने नव्हे तर हाताने करावी; कारण...

त्यासोबतच बरेच शेतकरी तणनाशकांचा वापर करतात परंतु या तणनाशकांचा पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते व जमिनीच्या सुपीकतेवर देखील त्याचा दुष्परिणाम होतो. ह्या ज्या काही तण नियंत्रणाच्या बाबतीत शेतकऱ्यांसमोर समस्या आहेत,

त्या समस्या सोडवण्यासाठी पावर विडर हे यंत्र खूप महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल, यात शंकाच नाही. हे यंत्र आकाराने लहान व वजनाने हलके असून कपाशी, केळी, ऊस, संत्रा, डाळिंब सारखे विविध प्रकारचे फळबाग

तसेच दोन सरीमधील जास्त अंतर असलेल्या पिकांमध्ये वापरता येण्यासाठी खूप उपयुक्त आहे. पावर विडर यंत्राची कार्यक्षमता उच्च दर्जाचे असून ते बहूपयोगी आहे. शेतामधील ज्या नींदणीसाठी सात ते आठ मजूर दोन ते तीन दिवस काम करतील तेवढे काम पावर विडरच्या साह्याने एका दिवसात करणे शक्य आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचा पैसा तर वाचतोच परंतु वेळेची देखील बचत होते व वेळेत काम होते. जर बाजारपेठेचा विचार केला तर बाजारपेठेमध्ये तीन ते सहा अश्‍वशक्तीची पावर विडर यंत्र उपलब्ध आहेत.

नक्की वाचा:Top 5 Rotavator: 'या' पाच प्रकारचे रोटावेटर ठरतील शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी वरदान, जाणून घ्या त्यांची वैशिष्ट्ये आणि किंमत

English Summary: power weeder macine is useful for remove weed from crop
Published on: 29 July 2022, 04:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)