Farm Mechanization

शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करणे हे शासनाचे लक्ष्य आहे. त्या दृष्टीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारे शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना आणत आहे. या योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत केली जाते.

Updated on 14 February, 2022 4:49 PM IST

शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करणे हे शासनाचे लक्ष्य आहे. त्या दृष्टीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारे शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना आणत आहे. या योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत केली जाते.

सध्या शेतीमध्ये देखील यांत्रिकीकरणाचे वारे वाहू लागल्याने अगदी शेताची पूर्वतयारी ते पिकांच्या काढणीपर्यंत यंत्रांचा वापर केला जातो. शेती कामांमध्ये वापरण्यात येणाऱ्या यंत्रामध्ये ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांची अगदी जवळचे नाते ठेवून आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करणे सोपे व्हावे यासाठी केंद्र सरकार पी एम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान देत आहे.बऱ्याच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करणे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी शासनाची ही योजना अत्यंत उपयुक्त ठरू शकेल.या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर 50 टक्के अनुदान दिले जाते.

.या योजनेच्या माध्यमातून शेतकरी कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर अर्ध्या किमतीत खरेदी करू शकतात. उरलेली अर्धी रक्कम सरकार अनुदान म्हणून देते. यामध्ये केंद्र सरकारच नाहीतर अनेक राज्य सरकार देखील त्यांच्या त्यांच्या स्तरावर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर 20 ते 50 टक्‍क्‍यांपर्यंत सबसिडी देतात.

 अशा पद्धतीने या योजनेचा लाभ घ्यावा

 या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फक्त एक ट्रॅक्‍टर खरेदीवर अनुदान दिले जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड,जमिनीचे कागदपत्र, संबंधित शेतकऱ्याचा बँकेचा तपशील तसेच पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर शेतकरी कोणत्याही जवळच्या कॉमन सर्विस सेंटरला भेट देऊन ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात.

English Summary: pm kisaan tractor scheme give fifty percent subsidy on tractor purchasing
Published on: 14 February 2022, 04:49 IST