मुंबई- केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे. पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर वार्षिक सहा हजार रुपये जमा केले जातात. यासोबतच कीटकनाशके आणि बियाणे यासाठी देखील अनुदान प्रदान केले जातात. सरकारद्वारे शेतीसाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी देखील अनुदान प्रदान केले जाते. ट्रॅक्टरसाठी देखील स्वतंत्र अनुदानाची तरतूद आहे.
प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजनेद्वारे ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान दिले जाते. गेल्या काही वर्षात ट्रॅक्टर हे सर्वात वापरले जाणारे उपकरण ठरले आहे. शेतीतील सर्व प्रकारची कामे कमी वेळेत पूर्ण होण्यासाठी ट्रॅक्टर अत्यंत मोलाचा ठरतो.
आर्थिक उत्पन्नाअभावी अनेक शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्वाची योजना हाती घेतली आहे. या योजनेद्वारे सरकार मार्फत शेतकऱ्यांना अर्ध्या किंमतीत ट्रॅक्टर उपलब्ध केले जातात.
गेल्या सात वर्षात शेतकऱ्याने ट्रॅक्टरची खरेदी केलेली नसावी
शेतकऱ्याची स्व-मालकीची जमीन असावी
शेतकऱ्याला केवळ एक ट्रॅक्टरसाठी अनुदान प्राप्त होईल
प्रत्येक घरातील केवळ एकच व्यक्ती या अनुदानासाठी पात्र असेल
योजना केवळ सीमांत शेतकरी आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठीच आहे
Published on: 21 October 2021, 10:40 IST