भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. भारतीय शेतकरी आता विविध तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीत चांगल्या प्रकारची प्रगती करून उत्कृष्ट उत्पन्न मिळवीत आहेत. शेती क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे तंत्रज्ञान येऊ घातले आहे त्यामुळे शेतकरी आता अशा तंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक पिके घेत आहेत.
तसेच बर्याच पिकांच्या उत्पादनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे म्हणून सरकारकडून विविध प्रकारचे मोबाईल ॲप्लिकेशन लॉंच करण्यात आले आहेत. या मोबाइल अँप्लिकेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संबंधी पिकांच्या बाबतीतली माहिती, हवामानानुसार करायचे नियोजन अशा प्रकारची बरीच माहिती मिळत असते. या लेखात आपण पुदिना लागवडीसाठी उपयुक्त अशा मेंथा ॲप तसेच पुदिना लागवडीचे फायदे जाणून घेणार आहोत.
पुदिना लागवडीशी संबंधित सुगंध मिशन योजना
भारतीय शेतकऱ्यांनी आता पारंपरिक पिके घेण्याला तिलांजली देत विविध प्रकारचे पिके घेण्याच्या बाबतीत शेतकरी जागरूक झाले आहेत. शेतकरी आता लेमनग्रास आणि पुदिना सारख्या पिकांची लागवड करून चांगला नफा कमवत आहेत.भारत सरकारच्या सुगंध मिशन अंतर्गत या पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. सुगंध मोहिमेचे संबंधित पिकांचे वैशिष्ट्य म्हणजे या पिकांची लागवड दुष्काळग्रस्त भागातही करता येते व त्यासाठीच्या देखभालीसाठी जास्तीचे कष्ट करावे लागत नाहीत. सुगंध मोहिमेची संबंधित पिकांच्या यादीत पुदिना या पिकाचा समावेश करण्यात आला आहे.
या पुदिना चा वापर हा औषधांमध्ये आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो.पुदिनाउत्पादनाच्या बाबतीत भारतप्रथम क्रमांकावर आहे. पुदिना लागवडीचा विचार केला तर भारतात उत्तर प्रदेश राज्य प्रथम क्रमांकावर आहे. पुदिना पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे हे पीक 90 दिवसात तयार होत असल्यामुळे शेतकरी कमी वेळात चांगला नफा मिळवूशकतात. तसेच या पिकाचा उत्पादन खर्च एकरी 20 ते 25 हजार रुपये इतका येतो. उत्पन्नाचा विचार केला तर शेतकरी बांधव सहजपणे एक लाखापर्यंत नफा कमवू शकतात.
मेंथा ॲप पुदिना साठी उपयुक्त
पुदिना पिकाच्या बाबतीत असलेले नवीन तंत्रज्ञान आणि या पिकाबद्दल ची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी CIMAP ने मेन्था मित्र नावाच्या ॲप लॉन्च केले आहे. या ॲपच्या मदतीने शेतकरी बांधव पुदिना च्या प्रगत जाती आणि त्या विषयाच्या तंत्राची माहिती मिळवू शकतात व आपले उत्पन्न वाढवू शकतात. हे ॲप हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध आहे. शेतकरी बांधवांनी हे ॲप गूगल प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून पुदिना विषयी उपलब्ध माहितीचा लाभ घ्यावा.
Published on: 07 September 2021, 12:49 IST