Farm Mechanization

भारतामध्ये गहू या पिकानंतर खाद्यान्न पिकांमध्ये सगळ्यात जास्त लागवड ही भात पिकाची केली जाते. भारताचा भात उत्पादनात जगात दुसरा क्रमांक लागतो. भारतातील एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी जवळजवळ 34 टक्के क्षेत्रावर भात लागवड केली जाते. असे असून सुद्धा शेतकऱ्यांना भातशेती करणे अडचणीचे ठरत आहे. कारण भात लागवडीसाठी जास्त मजुरांची आवश्यकता असते. त्यामुळे लागवडीसाठी फार मोठा खर्च येतो. शेतकऱ्यांच्या या दोन समस्यांचे समाधान पॅडी ट्रान्सप्लांटर करू शकते. याच्या मदतीने शेतकरी शेतात भाताची लागवड अगदी सोप्या पद्धतीने करू शकतात. त्यामुळे कमी वेळात व कमी खर्चात भाताचे उत्पादन आणि उत्पन्न यामध्ये वाढ होऊ शकते. या लेखात आपण या विषयी माहिती घेऊ.

Updated on 14 July, 2021 1:55 PM IST

 भारतामध्ये गहू या पिकानंतर खाद्यान्न पिकांमध्ये सगळ्यात जास्त लागवड ही भात पिकाची केली जाते. भारताचा  भात उत्पादनात जगात दुसरा क्रमांक लागतो. भारतातील एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी जवळजवळ 34 टक्के क्षेत्रावर भात लागवड केली जाते. असे असून सुद्धा शेतकऱ्यांना भातशेती करणे अडचणीचे ठरत आहे. कारण भात लागवडीसाठी जास्त मजुरांची आवश्यकता असते. त्यामुळे लागवडीसाठी फार मोठा खर्च येतो. शेतकऱ्यांच्या या दोन समस्यांचे समाधान पॅडी ट्रान्सप्लांटर  करू शकते. याच्या मदतीने शेतकरी शेतात भाताची लागवड अगदी सोप्या पद्धतीने करू शकतात. त्यामुळे कमी वेळात व कमी खर्चात भाताचे उत्पादन आणि उत्पन्न यामध्ये वाढ होऊ शकते. या लेखात आपण या विषयी माहिती घेऊ.

 काय आहे पेडि ट्रान्सप्लांटर?

 या यंत्राच्या सहाय्याने भाताच्या रोपांची लागवड केली जाते. या यंत्राद्वारे दोन तासात जवळ-जवळ एक एकर क्षेत्रांमध्ये भाताची लागवड केली जाऊ शकते. या मशीन चे विविध प्रकारचे मॉडेल आहेत. ज्याच्या सहाय्याने चार, सहा, आठ रांगेमध्ये भाताची लागवड करता येते. या मशिनच्या साह्याने लागवड केल्याने वेळेची बचत होते तसेच भात रोपे समान अंतरावर लावले जातात व एका रांगेत येतात

या यंत्राची किती प्रकार आहेत?

 पेडी ट्रान्सप्लांटर चे बाजारात दोन प्रकार आहेत. हाताने ऑपरेट करता येणारे आणि दुसरे म्हणजे ऑटोमॅटिक राईस ट्रान्सप्लांटर मशीन

या यंत्राचे मुख्य भाग

 या यंत्राचे प्रमुख तीन भाग आहेत. त्यामध्ये सीडलिंग ट्रे, पिक अप असेंबली आणि सीडलिंग ट्रे शिफ्टर हे होय.

 पेडी ट्रान्सप्लांटर मशीन ची वैशिष्ट्ये

1-या यंत्राच्या साहाय्याने शेतकरी सोप्या पद्धतीने भाताची लागवड करू शकता. यामध्ये भाताची रोपे ट्रेमध्ये ठेवणे, दोन रोपांतील अंतर निश्चित करणे, तसेच रोपांची लागवड जमिनीत किती खोलीवर करावी  इत्यादी गोष्टी समाविष्ट आहेत.

2- वेगवेगळ्या क्षमतेनुसार मोठ्या मशीनच्या सहाय्याने एका दिवसात दहा ते पंचवीस एकर पर्यंत जमिनीत भात लागवड करता येते.

3- या मशिनच्या साह्याने दोन, चार आणि आठ रंगीत एका वेळेस लागवड करता येते. हे यंत्र दोन ते आठ रंगे  मध्ये व्यवस्थित पद्धतीने भाताची लागवड करते.

4- हे मशीन स्वयंचलित पद्धतीने काम करते. या यंत्रात हायड्रोलिक सिस्टम काम करते. जी लिव्हर च्या मदतीने वेगवेगळ्या पर्याय असतात त्याच्या साह्याने ऑपरेट करुन भाताची वेगवेगळ्या पद्धतीत लागवड करते.

5- हे स्वयंचलित मशीन अशाप्रकारे निर्मित केले गेले आहे की यामध्ये तीन, चार, पाच.. पासून 15 एचपी पर्यंत पावर इंजन असतात.जे या यंत्राच्या पूर्ण सिस्टीमला ऑपरेट करतात.

6-

या मशिनच्या साह्याने ऑपरेटरला आरामदायक काम करण्याची सुविधा मिळते. कारण या मशीनचे बरीचशी कामे ऑटोमॅटिक पद्धतीने होतात.

7- दोन रोपातील अंतर आणि रांगेतील अंतर हे यंत्र सोयीनुसार ऍडजेस्ट करू शकते.

8- या यंत्रामुळे रोपांची बचत होऊन उत्पादन क्षमता वाढते.

 

या यंत्राची किंमत, अनुदान आणि प्रशिक्षण

 मध्यप्रदेश सरकारने पेडी ट्रान्सप्लांटर यंत्राची किंमत अडीच लाख ते पावणेतीन लाख रुपये पर्यंत आहे. यामध्ये राज्य सरकार 40 टक्के अनुदान देते. छत्तीसगड राज्य सरकारने नवीन फसल प्रदर्शन योजनेद्वारे या यंत्राच्या साह्याने लागवड करण्यासाठी सरकार कडून शेतकऱ्यांना प्रति एकर तीन हजार रुपये अनुदान दिले जात आहे. तसेच शेतकरी आपल्या जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र मधून पेडी ट्रान्सप्लांटर यंत्राच्या साह्याने लागवड कशी केली जाते याबद्दल प्रशिक्षण घेऊ शकता. तसेच कृषी अभियांत्रिकी आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या यंत्राच्या बाबतीत योग्य मार्गदर्शन प्राप्त होते.

English Summary: paddy transplanter machine useful for paddy cultivation
Published on: 14 July 2021, 01:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)