Farm Mechanization

शेतीमध्ये सध्या आधुनिकतेचे वारे वाहत आहेत. शेतकरी आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विविध प्रकारच्या यंत्रांचा वापर करून शेतीची कामे सुसह्य बनवत आहे. शेतीमध्ये यंत्रांचा वापर केला तर वेळेची आणि पैशांची बचत तर होतेच परंतु उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होते. या लेखामध्ये आपण भात शेती साठी लागणारी काही आवश्यक यंत्रांच्या बद्दल जाणून घेणार आहोत.

Updated on 25 June, 2021 5:04 PM IST

 शेतीमध्ये सध्या आधुनिकतेचे वारे वाहत आहेत. शेतकरी आता अत्याधुनिक  तंत्रज्ञान आणि विविध प्रकारच्या यंत्रांचा वापर करून शेतीची कामे सुसह्य बनवत आहे. शेतीमध्ये यंत्रांचा वापर केला तर वेळेची आणि पैशांची  बचत तर होतेच परंतु उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होते. या लेखामध्ये आपण भात शेती साठी लागणारी  काही आवश्यक यंत्रांच्या बद्दल जाणून घेणार आहोत.

  • स्वयंचलित भात कापणी यंत्र ( रिपर ) या यंत्रामध्ये भात कापण्यासाठी कटर बसवले असून स्टार व्हील आणि बेल्ट मुळे कापणी चालू असताना पीक एका बाजूला टाकले जाते. कापले जाणारे पीक एका ओळीत पडत असल्याने बांधणीचे काम सोपे होते. यंत्राचा इंजिनचा विचार केला तर या यंत्रावर 3.5 अश्वशक्ती चे पेट्रोल इंजिन असून हे इंजिन यंत्राला व त्यातील चाकाला गिअरबॉक्स द्वारे शक्ती संक्रमण होते. या यंत्राचे वजन 225 किलो असून त्याच्या कटर बार ची रुंदी 1.2 मीटर असते. यंत्र भाताची कापणी करीत असताना अकरा सेंटीमीटर उंची पासून करते. जर जमीन ओली असेल तर यंत्राला चालणे सुलभ व्हावे यासाठी केज विल बसविता येतात. या यंत्राचा ताशी वेग अडीच किमी आहे. जर पेट्रोल लागत चा  विचार केला तर प्रति तास एक लिटर पेट्रोल लागते.
  • स्वयंचलित भात लागवड यंत्र

चटई  पद्धतीने तयार केलेल्या एक दिवसाच्या भात रोपांची लागवड या यंत्राद्वारे कमी वेळात करता येते. लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ एक टक्का क्षेत्र चटई रोपवाटिकेसाठी पुरेसे  असते. जर 1 एकर क्षेत्राचा विचार केला तर दहा मीटर बाय एक मीटर आकाराचे तीन गादीवाफे जर केले तर एवढे रोप एक एकर क्षेत्राला पुरते. रोपवाटिकेमध्ये दहा बाय एक मीटरच्या गादी वाफ्यासाठी  पाच किलो बियाणे लागते. तसेच रोपवाटिकेसाठी लागणारी माती दोन मी मी च्या  चाळणीमधून चाळून घ्यावी. या यंत्राचा वापर करताना कमी खोलाची चिखलणी करून शेतातील मातीच्या प्रकारानुसार चिखल बसू देणे आवश्यक असते. तसेच भात खाचरात तीन ते चार सेंटीमीटर खोल पाणी असणे आवश्यक असते. या यंत्रावर यंत्र चालवणाऱ्या साठी बसण्याची जागा आहे.

चटई रोपवाटिके मधून आवश्यक आकाराचे काप करून यंत्राच्या ट्रेमध्ये ठेवता येतात. शेतात पेरणी करीत असताना एका चुडात  भाताची तीन ते चार रोपांचे आठ ओळीत 14 ते 17 सेंटिमीटर अंतर लागवड करता येते. या यंत्राच्या इंजिनचा विचार केला तर साडेचार अश्वशक्ति चे डिझेल इंजन आहे व एक लिटर डिझेल प्रति तास  लागते. या यंत्राच्या मदतीने केवळ दोन ते चार मजुरांद्वारे दिवसभरात  अडीच ते चार एकर क्षेत्रावर लागवड केली जाते.

  • कोनो विडर – या यंत्राच्या मदतीने भात पिकातील दोन ओळींतील तण काढून चिखलात गाडले जाते. या यंत्राचे वजन 5.6 किलो ग्रॅम असून त्याची रुंदी 130 मी मी आहे. हे यंत्र वापरायला अत्यंत सोपे असून  हैदरा वापरताना खाचरांमध्ये पाच ते सहा मी पाण्याची पातळी असणे आवश्यक असते. या यंत्राची काम करण्याची कार्यक्षमता पाहता एका तासात सात ते दहा गुंठे शेतीमधील तण काढले जाते. आणि कार्यक्षमतेचा विचार केला तर या यंत्राची कार्यक्षमता 64.5 टक्के व तन काढण्याची क्षमता 80 टक्के आहे. या यंत्राच्या वापराने जवळजवळ 50 ते 60 टक्के वेळ आणि खर्चात बचत होते.

स्त्रोत - ग्रोवन

 

English Summary: paddy cultivation machinary
Published on: 25 June 2021, 05:04 IST