Farm Mechanization

कांदा उत्पादकांच्या (onion growers) अनेक समस्या असतात. सर्वात महत्वाची समस्या असते ती कांद्याच्या भावातील चढ उतार. शेतकरी कांद्याला (onion) मिळत असलेला दर पाहून साठवणुकीतला कांदा बाहेर काढत असतो.

Updated on 25 August, 2022 3:17 PM IST

कांदा उत्पादकांच्या (onion growers) अनेक समस्या असतात. सर्वात महत्वाची समस्या असते ती कांद्याच्या भावातील चढ उतार. शेतकरी कांद्याला (onion) मिळत असलेला दर पाहून साठवणुकीतला कांदा बाहेर काढत असतो.

मात्र साठवणूक केलेला कांदा चांगला राहिलंच याची शक्यता कमी असते. वातावरणामुळे चाळीत ठेवलेल्या कांद्यावर परिणाम कांद्याचे नुकसान होते. यावर खतरी उपाय नाशिकच्या युवा अभियंता असलेल्या कल्याणी शिंदे यांनी काढला आहे.

आता कांदा सडत असतानाच शेतक-यांना (farmers) कळणार आहे. सडणारा कांदा बाजुला ठेवून अन्य कांदा सडण्यापासून शेतकरी आता सहज वाचवू शकतील. याचे संशोधन लासलगावच्या शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या कल्याणीने केले आहे.

कांद्याचे भाव (onion rate) कधी वाढतील आणि कधी कोसळतील याचा अंदाज नसतो. चांगला भाव मिळेपर्यंत शेतकरी कांद्याची साठवणूक करतात. कांदा सहा ते आठ महिने गोदामांमध्ये साठवला जातो. त्याच ठिकाणी कांदा सडतो. कल्याणी शिंदे यांनी त्यावर तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

Maize Rate: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; मक्याचे दर तेजीत, मिळतोय 'इतका' दर

'आयओटी' उपकरण केले विकसित

तंत्रज्ञानामुळे सडलेल्या कांद्यातून बाहेर पडणारा गॅसची पूर्वकल्पना शेतकऱ्यांना देऊन सावध केले जात आहे. ८० टक्के शेतकऱ्यांकडे पारंपारीक साठवण गोदामे आहेत. हे विकसीत केलेले 'आयओटी' उपकरण (IoT device) बसवल्यास कांदा सडू लागला तर त्याची त्वरित कल्पना शेतकऱ्यांपर्यंत पोहचेल.

अशावेळी शेतकऱ्यांनी सडलेला कांदा बाहेर काढला तर नुकसान होणारे टळणार आहे. कांदा सडण्याच्या प्रमाणात २० ते २५ टक्के घट होते. हे संशोधन सिध्द केल्यानंतर लासलगावच्या बाहेर जाऊनही कल्याणीने शेतकऱ्यांना ही सेवा उपलब्ध करून दिली.

Poultry Farming: 250 अंडी देणारी प्लायमाउथ रॉक कोंबडी पाळा; कमी खर्चात मिळणार जास्त नफा

आतापर्यंत २५० डिव्हाइस त्यांनी लावले आहेत. आणि १५०० टन पेक्षा जास्त कांदा त्याद्वारे मॉनिटर (Monitor) केला जातो. विशेष म्हणजे माहितीनुसार कल्याणी यांच्या संशोधनाची दखल घेऊन डीओजीआर, एनएएफईडी आणि नाबार्ड या केंद्रशासनाच्या अंगीकृत संस्थांनी या तंत्रज्ञानासंदर्भात भागीदारी देखील केली आहे.

महत्वाच्या बातम्या 
Castor Crop: एरंड पिकाची लागवड करा आणि कमी खर्चात मिळवा आश्चर्यकारक नफा
Sweet Potato: रताळ्याचे सेवन केल्याने बीपी राहतो नियंत्रित; आणखी आहेत आश्चर्यकारक फायदे
Tur Market Price: तूर उत्पादकांसाठी महत्वाची बातमी; बाजारातील चित्र बदलले, मिळतोय 'हा' दर

English Summary: Onion Machine Now farmers avoided Launch device
Published on: 25 August 2022, 03:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)