Farm Mechanization

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी ५ हजार ट्रक्टर, ८ हजार टेलर्स आणि १२ हजार पेक्षा जास्तच शेती साठी लागणारी अवजारे बुक केली आहेत. यावेळी दसऱ्याला शेतीसाठी लागणारी जी अवजारे आहेत ती मोठ्या प्रमाणात विकली गेली आणि आता दिवाळी ला पुन्हा जोरदारपणे बुकिंग झाली आहे. मागील दोन वर्षे कोरोनाची महामारी तसेच महापूर एवढी संकटे असताना सुद्धा दसऱ्याला आणि दिवाळी ला मोठ्या प्रमाणात बुकिंग झाली आहे.

Updated on 24 October, 2021 5:58 PM IST

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी ५ हजार ट्रक्टर, ८ हजार टेलर्स आणि १२ हजार पेक्षा जास्तच शेती साठी लागणारी अवजारे  बुक केली  आहेत. यावेळी  दसऱ्याला  शेतीसाठी  लागणारी  जी अवजारे आहेत ती मोठ्या प्रमाणात विकली गेली आणि आता दिवाळी ला पुन्हा जोरदारपणे बुकिंग झाली आहे. मागील दोन वर्षे कोरोनाची महामारी तसेच महापूर एवढी संकटे असताना सुद्धा दसऱ्याला आणि दिवाळी ला मोठ्या प्रमाणात बुकिंग झाली आहे.

शेतीसाठी अवजारे घेण्यास शेतकरी उत्साहित:

महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात उसाचे पीक घेतले जाते. जे की मागील तीन वर्षांपासून चांगल्या प्रमाणत पाऊस झाला आहे त्यामुळे ऊस उत्पादकांना  चांगला  पैसा  सुद्धा  मिळाला  आहे. साखर कारखाना कडून उसाला प्रति टन २५०० रुपये दर मिळत आहे त्यामुळे शेतकरी वर्गाला चांगले पैसेही मिळत आहेत आणि शेतीसाठी अवजारे घेण्यास शेतकरी उत्साहित आहेत.ट्रॅक्टर आणि टेलर्स खरेदी कडे शेतकरी ओळत आहेत. सध्या उसाचा गळीप हंगाम सुरू आहे तर काही कारखाने दिवाळी ला गळीप हंगाम सुरू करणार आहेत.

शेतीसाठी लागणारे अवजारांची खरेदी दसऱ्याला च सुरू झाली आहे. शेतकऱ्यांची पल्टी फाळ नांगर आणि रोटाव्हेटरला मोठ्या प्रमाणत मागणी आहे तसेच हायड्रोलिक पल्टी, सिंगल पल्टी, डबल पल्टी, सरी रेझर, बांडगे याला सुद्धा शेतकऱ्यांनी पसंदी दिली आहे.मॅसी फर्ग्युसन, फार्म ट्रॅक, पाॅवर ट्रॅक,  स्वराज,  बलवान, जाॅन डिअर, न्यू हाॅलंड,  व्हीएसटी, महिंद्रा,  एस्काॅर्ट, सोनालिका, कुबोटा या सर्व कंपन्यांचे ट्रॅक्टर मार्केट मध्ये उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र राज्यात ट्रॅक्टर आणि टेलर्स बनवण्याच्या २ हजार पेक्षा जास्तच कंपन्या आहेत.दसऱ्याला तर मोठ्या प्रमाणात विक्री झालीच व आता दिवाळी तर ५  हजार  पेक्षा  जास्तच  ट्रॅक्टरची बुकिंग झालेली आहे.मागील दोन ते तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात राज्यात पाऊस पडला असल्याने यावेळी दिवाळी ला १२ हजार पेक्षा अवजारांची विक्री होईल असे सांगण्यात आलेले आहे. यंदाच्या दिवाळी ला शेतकऱ्यांनी शेतीसाठी लागणारे अवजारे खरेदी करण्यासाठी खूप पसंदी दिलेली आहे याव्यतिरिक्त कर्नाटक मधील शेतकऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात बुकिंग केल्या आहेत.

English Summary: On Diwali, there will be a huge demand for agricultural implements including tractors
Published on: 24 October 2021, 05:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)