Farm Mechanization

आजच्या आधुनिक युगात प्रत्येक क्षेत्रात मशिन्सचा खुप मोठा मोलाचा वाटा आहे. मग ते कुठलेही क्षेत्र असो, कृषी क्षेत्रात देखील मशीन्सचे खुप मोठे योगदान आहे. परंतु अल्पभूधारक शेतकरी व भादेतत्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, टिलर, रोटर, इत्यादी शेतीचे साहित्य विकत घेणे परवडणारी गोष्ट नाहीय आणि त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे उत्पादन खुप कमी होऊन जाते.परंतु चिंता करण्याचे काही कारण नाही,शेतकरी बांधवांनो आता तुम्ही शेतीच्या कामासाठी तुम्हाला लागणारे यंत्र आता भाड्याने घेऊ शकतात.

Updated on 07 October, 2021 8:13 PM IST

आजच्या आधुनिक युगात प्रत्येक क्षेत्रात मशिन्सचा खुप मोठा मोलाचा वाटा आहे. मग ते कुठलेही क्षेत्र असो, कृषी क्षेत्रात देखील मशीन्सचे खुप मोठे योगदान आहे. परंतु अल्पभूधारक शेतकरी व भादेतत्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, टिलर, रोटर, इत्यादी शेतीचे साहित्य विकत घेणे परवडणारी गोष्ट नाहीय आणि त्यामुळे अशा शेतकऱ्यांचे उत्पादन खुप कमी होऊन जाते.परंतु चिंता करण्याचे काही कारण नाही,शेतकरी बांधवांनो आता तुम्ही शेतीच्या कामासाठी तुम्हाला लागणारे यंत्र आता भाड्याने घेऊ शकतात.

 तुम्ही विचार करत असाल ह्यात काय आलं नवल! बरोबर ना पण तुम्ही तुम्हाला लागणारे यंत्र हे तुमच्या मोबाईलने ऑनलाईन एका अँप्लिकेशन द्वारे बुकिंग करू शकता, हो खरंच! आहे ना नवल. एवढेच नाही जर तुमच्याकडेही एखादे कृषी यंत्र असेल तर ते तुम्ही ह्या अँप्लिकेशशी जोडून तुमचे यंत्र भाड्यावर देऊ शकता. चला तर मग जाणुन घेऊया नेमकी कोणती आहे हे अँप्लिकेशन आणि कशी आहे बुकिंग करण्याची पद्धत.

 काय आहे नेमका हा अँप्लिकेशनचा माजरा

भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने (Ministry of Agriculture and Farmers Welfare) एक असे मोबाईल अँप तयार केले आहे, ज्याद्वारे तुम्ही शेती आणि शेती यंत्रणा संबंधित सर्व नवीनतम माहिती मिळवू शकता. ह्या अँप्लिकेशनद्वारे तुम्ही  ट्रॅक्टर, टिलर, रोटाव्हेटर्स इत्यादी यंत्रणासंबंधी माहिती मिळवू शकता.

कृषी मंत्रालयाने "FARMS-Farm Machinery Solutions" नावाचे एक मोबाईल अँप तयार केले आहे. या मोबाईल अँपद्वारे शेतकरी घरबसल्या शेतीची उपकरणे आणि मशीन भाड्याने कामासाठी लावू शकतात आणि आपले शेतीचे काम करू शकतात.

 कुठून करणार अँप्लिकेशन डाउनलोड

आपण जर अँड्रॉइड मोबाईल (Android Mobile) वापरत असाल तर आपल्या मोबाईल मध्ये वेगवेगळ्या अँप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी गूगल प्ले स्टोर असते (Google Play Store). ह्या गूगल प्ले स्टोर वर जाऊन आपण “FARMS-Farm Machinery Solutions” हे मोबाईल अँप्लिकेशन (Mobile Application) सहजरीत्या डाउनलोड करू शकता.

 कस वापरणार अँप्लिकेशन

“FARMS-Farm Machinery Solutions” हे अँप वापरण्यासाठी तुम्हाला सर्व्यात आधी ह्या अँप्लिकेशनवर स्वतःला रजिस्टर करावे लागेल. ह्या अँप्लिकेशनवर रेजिस्ट्रेशन (Registration)दोन प्रकारे केली जाते. जर शेतकर्‍यांना कृषी यंत्रे आणि मशिन भाड्याने घ्यायच्या असतील तर ते वापरकर्ता श्रेणीत म्हणजे युजर श्रेणीत नोंदणी करू शकतात आणि जर आपल्याला यंत्रे भाड्याने दुसऱ्यांना द्यायच्या असतील तर आपण सर्विस प्रोवायडर (Service Provider) श्रेणीमध्ये जाऊन नोंदणी करू शकतात.

 

हे अँप्लिकेशन डाऊनलोड (Application Download)केल्यानंतर तुम्हाला भाषा निवडण्याचा पर्याय मिळेल. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीची भाषा निवडू शकता. यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून पासवर्ड तयार करावा लागेल. पासवर्ड वापरून, तुम्ही या अँपवर तुमच्या आवडीच्या यंत्रसामग्रीची माहिती गोळा करू शकता आणि जर आपणांस यंत्रसाधने भाड्याने लागत असतील तर भाड्याने देखील घेऊ शकता.

 हे मोबाईल अँप्लिकेशन (Mobile Application)डाऊनलोड केल्यानंतर शेतकऱ्याला त्याची संपूर्ण माहिती भरावी लागते. उदाहरणार्थ, त्यात राज्य, जिल्हा, तहसील, ब्लॉक आणि गावाचे नाव टाकावे लागते. याशिवाय शेतकऱ्याकडे किती शेतजमीन आहे, याचा तपशीलही भरावा लागतो.

ही सर्व माहिती प्रविष्ट केल्यानंतर, शेतकरी ट्रॅक्टर किंवा इतर कृषी यंत्रे भाड्याने घेऊ शकतात. हे अँप्लिकेशन वापरण्यासाठी सोपे बनवण्यात आले आहे आणि जवळपास 12 क्षेत्रीय भाषांमध्ये हे अँप वापरण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

 कृषी यंत्रे आणि इतर मशीनची संपूर्ण माहिती आणि भाडे ह्या अँपवर पाहिले जाऊ शकते. तुम्ही तुम्हाला हवे असणारे यंत्राचे भाडे बघून ते यंत्र बुक करू शकता आणि आपले शेतीचे कार्य करू शकता.

 Source News18

English Summary: now you can take farm machinary on rental by app
Published on: 07 October 2021, 08:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)