Farm Mechanization

सध्या छोट्या-मोठ्या कामासाठी सध्या शेतीमध्ये यंत्रांचा वापर होऊ लागला आहे. शेताची पूर्वमशागत ते पिकांची काढणी इथपर्यंतचे कामे आता यंत्रामार्फत होऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या वेळेत आणि पैशामध्ये बऱ्यापैकी बचत होत आहे.

Updated on 21 April, 2023 9:53 AM IST

छोट्या-मोठ्या कामासाठी सध्या शेतीमध्ये यंत्रांचा वापर होऊ लागला आहे. शेताची पूर्वमशागत ते पिकांची काढणी इथपर्यंतचे कामे आता यंत्रामार्फत होऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या वेळेत आणि पैशामध्ये बऱ्यापैकी बचत होत आहे.

शेती करीत असताना बऱ्याचदा  शेतीमध्ये दगड आणि गोट्यांचे प्रमाण असल्यामुळे मशागत करण्यास खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होतात व हे दगडगोटे वेचून बाहेर काढणे फार जिकिरीचे काम असते. परंतु आता चिंता करण्याची गरज नसून यासाठी स्टोन पिकर  मशीन खूप उपयुक्त ठरत आहे. 

डोंगराळ भागात शेती करतात परंतु अशा ठिकाणी बऱ्याच प्रकारची दगड-गोटे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मशागत करण्यास अडचणी निर्माण होतात व यामुळे बियाण्याची उगवण क्षमता देखील प्रभावित होते.

देशात साखरेचं उत्पादनात घटलं, दर वाढण्याची शक्यता..

 दगडगोटे उचलणारी म्हणजेच स्टोन पिकर मशीन खूप उपयुक्त आहे. या यंत्राच्या साह्याने शेतातील बारीक दगड-गोटे देखील सहजपणे वेचून शेत व्यवस्थित स्वच्छ करता येते. या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे हे छोटे आणि मोठ्या आकाराचे सगळ्या प्रकारचे दगडगोटे एकाच वेळेस उचलून घेते.

या यंत्राला ऑपरेट करण्यासाठी ट्रॅक्टरची आवश्यकता असून एका एकर क्षेत्रातील दगड गोटे दोन तासात उचलून देण्याची त्याची क्षमता असते.

त्यामुळे शेतीची मशागत करणे सोपे होते व कमी कष्ट लागतात. छोटे-मोठे अशा सगळ्या प्रकारचे दगड गोटे यामुळे उचलता येणे शक्य आहे. शेतीची मशागत व्यवस्थित करता आल्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते. पिकांची गुणवत्ता देखील सुधारते व जमीन चांगली उत्पादनक्षम बनते.

एक हात मदतीचा! शेतकऱ्यांना राजपत्रित अधिकारी एक दिवसाचे वेतन देणार...
दिवसा वीज देण्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
शेतकऱ्यांनो तुमचे महत्त्वाचे हक्क तुम्हाला माहीत आहेत का? जाणून घ्या होईल फायदा

English Summary: Now the problem of stones in the field will be removed, stone picker will come to help, know..
Published on: 21 April 2023, 09:53 IST