Farm Mechanization

कृषी क्षेत्रात यंत्राचा वापर अधिक होत आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीची कामे जलद गतीने पुर्ण होत असतात. बटाट्याची लागवडही जलद गतीने व्हावी यासाठी महिंद्रा महिंद्रा कंपनीने शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची वार्ता आणली आहे.

Updated on 15 September, 2020 10:24 AM IST


कृषी क्षेत्रात यंत्राचा वापर अधिक होत आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीची कामे जलद गतीने पुर्ण होत असतात. बटाट्याची लागवडही जलद गतीने व्हावी यासाठी महिंद्रा  महिंद्रा कंपनीने शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची वार्ता आणली आहे. कंपनीने  बटाटे लागवडीसाठी एक नवी मशीन बनवली असून बुधवारी मंहिद्रा  अँण्ड महिंद्रा कंपनीने लॉन्च केली आहे. या मशीनचे नाव  प्लांटिंगमास्टर पोटॅटो असे ठेवण्यात आले आहे.

(Agriculture Equipmemt) या कृषी यंत्राला कंपनीने युरोप मध्ये स्थित असलेली डेवुल सोबत मिळून तयार केली आहे. ही मशीन भारतीय कृषीच्या परिस्थितीनुसार बनविण्यात आले असून जी अधिक उत्पन्न आणि उच्च गुणवत्तेसाठी मदत करते, असे सांगण्यात आले आहे. 

छोट्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल सोलर स्प्रेअर  

महिंद्रा आणि डेवुल्फने मागील वर्षी पंजाबमधील  प्रगतीशील शेतकऱ्यांशी मिळून  बटाटे लागवडीची तंत्रावर काम केले होते.  बटाटे उत्पन्नात २० ते २५ टक्क्यापर्यंत वाढ नोंदविण्यात आली होती.  दरम्यान बटाटे लागवड करण्याची मशीन ही भाडे तत्वावरही उपलब्ध आहे. या मशीनला खरेदीसाठी एक सहज सोप्या पद्धतीने  वित्तपुरवठा केला जाणार आहे.  दरम्यान  प्लांटिगमास्टर मशीनची विक्रीसाठी पंजाबमध्ये उपलब्ध आहे. तर उत्तर प्रदेशात विक्री आणि भाडोत्री पद्धतीवरही उपलब्ध असेल. गुजरातमध्येही ही मशीन भाडोत्री पद्धतीवर उपलब्ध असेल.

English Summary: Now potato planting will be faster, Mahindra company has launched potato planting machine
Published on: 10 September 2020, 06:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)