Farm Mechanization

जगात बदलत्या काळानुसार शेती क्षेत्रात चांगला मोठा बदल बघायला मिळत आहे. देशात आधी शेतातील पूर्व मशागतीसाठी तसेच पेरणी करण्यासाठी बैलजोडीचा उपयोग केला जात असे त्यानंतर बैलजोडीची जागा ट्रॅक्टर ने घेतली. शेतकरी मित्रांनो आपण नांगरणी करण्यासाठी ज्या लोखंडी नागर चा उपयोग करतो त्या नांगरचे निर्माण जॉन डीअर नी 19 व्या शतकात केले होते. जॉन डीअर ने 1837 मध्ये भरभक्कम नांगरचे निर्माण करून शेती क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवून आणली होती. जॉन डीअरच्या नागरमुळे पुर्व मशागतीचे कामे शेतकऱ्यांसाठी अधिकच सोयीचे झालेले आहेत.

Updated on 06 January, 2022 4:26 PM IST

जगात बदलत्या काळानुसार शेती क्षेत्रात चांगला मोठा बदल बघायला मिळत आहे. देशात आधी शेतातील पूर्व मशागतीसाठी तसेच पेरणी करण्यासाठी बैलजोडीचा उपयोग केला जात असे त्यानंतर बैलजोडीची जागा ट्रॅक्टर ने घेतली. शेतकरी मित्रांनो आपण नांगरणी करण्यासाठी ज्या लोखंडी नागर चा उपयोग करतो त्या नांगरचे निर्माण जॉन डीअर नी 19 व्या शतकात केले होते. जॉन डीअर ने 1837 मध्ये भरभक्कम नांगरचे निर्माण करून शेती क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवून आणली होती. जॉन डीअरच्या नागरमुळे पुर्व मशागतीचे कामे शेतकऱ्यांसाठी अधिकच सोयीचे झालेले आहेत.

आता याच कंपनीने शेती क्षेत्रात आपले योगदान देताना एक अभूतपूर्व कारनामा केला आहे. शेतकरी मित्रांनो जॉन डियरने शेतीची पूर्व मशागत करण्यासाठी ऑटोनॉमस ट्रॅक्टरची निर्मिती करून शेती क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली आहे. यामुळेशेतीची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पुर्व मशागतीचे कार्य अगदी सुलभ रित्या पूर्ण केले जाऊ शकतात.शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की जॉन डियर नव्याने तयार केलेल्या या ऑटोनॉमस ट्रॅक्टर चे नाव 8R असे ठेवण्यात आले आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया जॉन डीअरच्या या नवीन ऑटोनॉमस ट्रॅक्टर विषयी सर्व काही.

ऑटोनॉमस ट्रॅक्टर विषयी महत्त्वपूर्ण माहिती

जॉन डीअर ने विकसित केलेल्या या ऑटोनॉमस ट्रॅक्टर मध्ये एकूण सहा कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेरा द्वारे हे ट्रॅक्टर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चा वापर करून आजूबाजूच्या परिस्थितीचा अनुमान लावण्यास सक्षम असते. या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चा वापर करून हे ट्रॅक्टर ऑटोमॅटिक नागरणी करू शकते तसेच पेरणी देखील करु शकते. पूर्वमशागत करताना अथवा पेरणी करताना या ट्रॅक्टरच्या मार्गात काही अडचण आली तर त्या अडचणी ला देखील ट्रॅक्टर ऑटोमॅटिक दूर करून देते. तसेच गरजेनुसार या ट्रॅक्टरला शेतकरी बांधव आपल्या सोयीने सूचना देखील देऊ शकता. म्हणजे शेतकरी बांधव सूचना देऊन या ट्रॅक्टरला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका शेतातून दुसऱ्या शेतात घेऊन जाऊ शकतात, तसेच पूर्व मशागतीचे कार्य किंवा पेरणी करत असताना या ट्रॅक्टर ला वापस घर देखील बोलाविले जाऊ शकते ते देखील केवळ एका सूचनेने. या ट्रॅक्टर ची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या ट्रॅक्टरला आपल्या मोबाईल वरुन म्हणजेच स्मार्टफोनवरून ऑपरेट करता येऊ शकते. असे असले तरी वर्तमान मध्ये अनेक ट्रॅक्टर असे आहेत जे ऑटोमॅटिक आहेत परंतु त्या ट्रॅक्टरसला या जॉन डीअर सारख्या फॅसिलिटीज देण्यात आलेल्या नाहीत.

किती आहे या ट्रॅक्‍टरची किंमत

जॉन डियर ने आपल्या या ऑटोनॉमस ट्रॅक्टरला अमेरिकेत प्रदर्शनी साठी ठेवले होते अजून हे ट्रॅक्टर ऑफिशियल रित्या विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेले नाही. या ट्रॅक्टरला अमेरिकेतील लॉस वेगास या शहरात कंजूमर इलेक्ट्रॉनिक शो 2022 मध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे. अद्याप पर्यंत जॉन डीयर कंपनी ने ऑफिशियल रित्या याची किंमत जाहीर केलेली नाही मात्र अनेक जाणकार लोक असे सांगत आहेत की, या ट्रॅक्‍टरची किंमत 8 लाख डॉलर एवढी असू शकते.

English Summary: now john deare companies tracktor can sowing and ploughing automatically
Published on: 06 January 2022, 04:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)