Farm Mechanization

यंदाच्या हंगामात शेतकऱ्याला सर्वात भेडसावणारा प्रश्न होता तो मजुराचा. पीक काढणीला आले असतानाही मजूरच मिळत नव्हते. अनेक शेतकऱ्यांनी तर सोयाबीन काढलेच नाही.

Updated on 27 October, 2021 8:24 PM IST

आगोदरच पावसाने नुकसान, त्यात एकरी ५ हजाराचा काढणी खर्च त्यामुळे सोयाबीन हे अद्यापही शेतातच आहे. पण कापूस वेचणीसाठी अद्यावत यंत्र आले आहे. ज्याच्या माध्यमातून शेतकरी स्वता: ८ तासामध्ये चक्क ८० किलो कापसाची वेचणी करु शकणार आहे. त्यामुळे वेळेचीही बचत होणार आहे आणि मजुरांवरही खर्च होणार नाही.  दिवसें दिवस कापसाचे क्षेत्र हे घटत आहे. मजूर मिळत नसल्यानेच ही अवस्था झाली आहे. मात्र, आता यंत्राच्या सहाय्याने कापूस वेचणी अगदी सुलभ होणार आहे.

एका कंपनीने हे मशीन तयार केले आहे. कपाशी क्षेत्राचा विचार केला तर मजूर टंचाईच्या समस्येने दरवर्षी कपाशीचे क्षेत्र कमी होत आहे.  एकट्या मराठवाड्याचा विचार केला तर पाच वर्षांपूर्वी कपाशी लागवडी खालील क्षेत्र हे १७ लाख हेक्‍टर होते. यावर्षी अवघ्या साडेबारा लाख हेक्‍टरवर कपाशीची लागवड आहे.  यामागे प्रमुख कारण म्हणजे, मजुरीचे वाढलेले दर आणि वेळेत वेचणीला मजूर मिळत नसल्यामुळे क्षेत्र कमी होण्यास सुरुवात झाली आहे.  शेती कामाकडे मजुर हे पाठ फिरवत आहेत. शिवाय यंदा पावसामुळे कापूस हा चिखलातच होता. त्यामुळे कापसाची वेचणी रखडली परिणामी उत्पादन घटले आहे.

कसे करते यंत्र काम ?

या मशीनच्या मागच्या बाजूला म्हणजे पाठीमागे एक मोठी बॅग लावलेली आहे. तसेच यंत्राला दोन प्लास्टिकच्या दाते बसवण्यात आले आहेत.  हे यंत्र नुसते कपाशीच्या बोंडा जवळ नेले असता एक कापूस ओढून मागे लावलेल्या पिशवी मध्ये ऑटोमॅटिक टाकते. कापसा बरोबर दुसरा कोणताही भाग ते गोळा करीत नाही हे विशेष.हे वजनाने हलके असल्यामुळे सहजतेने हाताळता येते. त्याला एक वरच्या बाजूला बटण असून ते बटन चालू केले असता मशीन बोंडा जवळ नेले असता कापूस आत मध्ये खेचला जातो.

 या मशीन चे वैशिष्ट्य म्हणजे या मशीनच्या सहाय्याने कापूस वेचणी केले असता कापसा मध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा अथवा घाण खेचली जात नाही. कापूस हा स्वच्छ आणि दर्जेदार येतो. 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

सौजन्य : लेट्स अप

English Summary: No more labor worries, more sales of cotton.
Published on: 27 October 2021, 08:24 IST