सध्याच्या काळात शेतीकामांसाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ची आवश्यकता भासत आहे जे की आजच्या स्थितीला शेतकऱ्यांची ट्रॅक्टर ही एक गरज बनलेली आहे . ट्रॅक्टर च्या मदतीने शेतीची सर्व कामे झटपट होऊन जातात जे की ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांचा वेळ ही वाचतो तसेच कष्ट ही कमी होते. आज पाहायला गेले तर बाजारामध्ये ट्रॅक्टर चे अनेक ब्रँड्स आहेत जे की आपणास आज आम्ही टॉप १० ब्रँड ट्रॅक्टर विषयी माहिती देणार आहोत हे की योग्य निवडीनुसार तुम्ही ट्रॅक्टर घेऊ शकता.
१. महिंद्रा ट्रॅक्टर :-
जगात गाजलेला ट्रॅक्टर म्हणजे महिंद्रा ट्रॅक्टर. जो की शेतीकामांसाठी सुद्धा एक नंबर आणि टिकायला सुद्धा एकदम कडक. भारतात महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर सर्वात लोकप्रिय आहेत. 15 - 75 HP पर्यंत ३५ पेक्षा जास्त मॉडेल्स भारतात महिंद्रा ची आहेत. महिंद्रा युवो 575 डीआय, महिंद्रा युवो 415 डीआय आणि महिंद्रा जिव्हो 225 डीआय ही महिंद्रा ची लोकप्रिय मॉडेल्स आहेत. ट्रॅक्टर च्या किमतीबद्धल बोलायचे म्हणले तर सुरुवात २.५० लाख रुपये पासून ते १२.५० लाख रुपये पर्यंत ट्रॅक्टर आहेत.
२. मॅसी फर्ग्युसन लिमिटेड (TAFE) :-
मॅसी फर्ग्युसन लिमिटेड ही कंपनी एक बहुराष्ट्रीय ट्रॅक्टर ची कंपनी आहे. भारतामध्ये दोन नंबर या कंपनीचे ट्रॅक्टर विकतात. यामागे कारण म्हणजे ट्रॅक्टर चे इंजिन, पॉवर, मायलेज आणि साधा लूक यामुळे शेतकरी या ट्रॅक्टर ला पसंद करतात. 25 ते 75 HP च्या रेंज मध्ये २५ पेक्षा जास्त ट्रॅक्टर उपलब्ध आहेत. मॅसी फर्ग्युसन 241 डीआय महाशक्ती, मॅसी फर्ग्युसन 1035 डीआय आणि मॅसी फर्ग्युसन 7250 पॉवर अप हे मॉडेल्स कंपनीचे लोकप्रिय आहेत. ट्रॅक्टर च्या किमतीबद्धल बोलायचे तर ४.५० लाख ते १५.२० लाख रुपये दरम्यान ट्रॅक्टर ची किमंत आहे.
३. जॉन डीअर ट्रॅक्टर :-
भारतात जॉन डीअर ट्रॅक्टर सर्वात जास्त विक्री होणार ट्रॅक्टर आहे जे की आंतरराष्ट्रीय ट्रॅक्टर च्या ब्रँड मध्ये जॉन डीअर कंपनीचे नाव घेतले जाते. 28-120 HP रेंज ३५ पेक्षा जास्त मॉडेल्स बाजारात आहेत. जॉन डीअर 5105, जॉन डीअर 5050 डी, जॉन डीअर 5310 ही कंपनीची लोकप्रिय मॉडेल्स आहेत. या ट्रॅक्टर ची सुरुवात ४.७० लाख ते २९.२० लाख रुपये पर्यंत आहेत.
४. स्वराज्य ट्रॅक्टर :-
देशात सर्वात मोठी कंपनी म्हणून स्वराज्य ला ओळखले जाते. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा एक विभाग म्हणून स्वराज्य आहे. 15 HP ते 75 HP रेंज मध्ये २० पेक्षा जास्त मॉडेल्स या ट्रॅक्टर ची आहेत. स्वराज 735 FE, स्वराज 744 FE, स्वराज 855 FE ही कंपनीची लोकप्रिय मॉडेल्स आहेत. ट्रॅक्टर च्या किमतीबद्धल बोलायचे म्हणले तर सुरुवात २.६० लाखापासून ते ८.४० लाख रुपये पर्यंत आहे.
५. फार्मट्रॅक ट्रॅक्टर :-
आशिया खंडात सर्वात लोकप्रिय ब्रँड म्हणून फार्मट्रॅक ट्रॅक्टर कडे पाहिले जाते.
फार्मट्रॅक 45, फार्मट्रॅक 60, फार्मट्रॅक 6055 क्लासिक टी20 हे मॉडेल्स कंपनीचे लोकप्रिय आहेत. तसेच या ट्रक्टर ची सुरुवात ५ लाख रुपये पासून सुरू होते तर शेवट १३.५० लाख।रुपये ला होतो.
६. आयशर ट्रॅक्टर :-
आयशर ट्रॅक्टर ही जगातील सर्वात जुनी कंपणी आहे जी शेतकऱ्यानं खूप लोकप्रिय कंपनी आहे त्याची लोकप्रियता अजूनही टिकून राहिली आहे. 18 HP ते 60 HP रेंज मध्ये १५ पेकह जास्त मॉडेल्स उपलब्ध आहेत. आयशर ३३३ सुपर डीआय, आयशर २४२, आयशर ३८० ही मॉडेल्स कंपनीची लोकप्रिय आहेत. आयशर 557 हे मॉडेल्स सर्वात महाग आहे जे 55 HP मध्ये येते जे की याची किमंत ६.९० लाख रुपये आहे.
७. सोनालिका ट्रॅक्टर ;-
भारतात आघाडीला ट्रॅक्टर म्हणून सोनलिका ट्रॅक्टर ला ओळखले जाते. या कंपनीचे ट्रॅक्टर 20 HP ते 90 HP मध्ये येतात. सोनालिका DI 745III, सोनालिका 35 DI सिकंदर आणि सोनालिका DI 60 ही मॉडेल्स कंपनीची लोकप्रिय मॉडेल्स आहेत. सोनलिका ट्रॅक्टर च्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर सुरुवात ३.२० लाख रुपये पासून ते २१.२० लाख रुपये शेवट आहे.
८. न्यू हॉलंड ट्रॅक्टर :-
न्यू हॉलंड ट्रॅक्टर ही एक अमेरिकन ट्रॅक्टर कंपनी आहे जी कृषी क्षेत्रात जागतिक स्तरावर आघाडीवर आहे. कृषी क्षेत्रामध्ये न्यू हॉलंड कंपनीचे ट्रॅक्टर, कम्बाइन हार्वेस्टर्स, बेलर्स, फीड हार्वेस्टर, स्वयं-चालित फवारणी, गवताची उपकरणे, बीजन उपकरणे, हॉबी ट्रॅक्टर, उपयुक्तता वाहने आणि उपकरणे आणि द्राक्ष कापणी इत्यादी यंत्रणा आहे. 35 ते 90 HP मध्ये २० पेक्षा जास्त मॉडेल्स या कंपनीचे आहेत. लोकप्रिय न्यू हॉलंड ट्रॅक्टर मॉडेल 3600-2 TX, 3630 TX, 3230 ही मॉडेल्स कंपनीची लोकप्रिय मॉडेल्स आहेत. ५.९० लाख रुपये ते २५.३० लाख रुपये पर्यंत कंपनीचे ट्रॅक्टर जातात.
९. पॉवरट्रॅक ट्रॅक्टर :-
भारतात पॉवरट्रॅक कंपनीचे ट्रॅक्टर उत्कृष्ट मानले जाते जे की टाकाऊ आणि टिकाऊ तसे ह शेतीकामांसाठी दमदार आहेत. 25 ते 60 HP मध्ये २० पेक्षा जास्त ट्रॅक्टर ची मॉडेल्स उपलब्ध आहेत. पॉवरट्रॅक युरो 50, पॉवरट्रॅक 439 प्लस, पॉवरट्रॅक 434 ही मॉडेल्स कंपनीची लोकप्रिय मॉडेल्स आहेत. या ट्रॅक्टर ची सुरुवात ३.३० लाख रुपये पासून ते ७.७५ लाख पर्यंत आहे.
१०. कुबोटा ट्रॅक्टर :-
21 ते 55 HP मध्ये १० पेक्षा जास्त मॉडेल्स या कंपनीची आहेत. कुबोटा निओस्टार बी2741, कुबोटा एमयू5501 आणि कुबोटा एमयू4501 ही मॉडेल्स कंपनीची लोकप्रिय मॉडेल्स आहेत. जर किंमतीबद्धल बोलायचे म्हणले तर सुरुवात ४.१५ लाख रुपये पासून ते शेवट १०.१२ लाख रुपये पर्यन्त आहे. शेतकऱ्यांना या कंपनीचा ट्रॅक्टर लोकप्रिय आहे जे की शेतीसाठी सुद्धा दमदार आहे.
Published on: 22 February 2022, 01:18 IST