Farm Mechanization

शेतीमधून जास्त उत्पादन मिळवायचे असेल तर शेतीचे कामे योग्य वेळी करावी. बदलते हवामान तसेच पावसाची अनियमितता असल्याने काही वेळा दुबार पेरणी करावी लागते आणि उत्पादन खर्चही वाढतो त्यामुळे शेतीमध्ये वेळेची बचत व्हावी आणि कष्ट कमी असावे म्हणून विकसित यंत्रे वापरणे सोयीचे ठरते. सुधारीत यंत्रामुळे शेतीचे कामे लवकर होतात आणि वेळही होतो.बियाणे योग्य अंतरावर पेरावी तसेच खत आणि पाण्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करावी. हेक्टरी रोपांची संख्या योग्य ठेवली जाते त्यामुळे रोपांची जास्त गर्दी होत नाही आणि त्यांना योग्य प्रकारे सूर्यप्रकाश सुद्धा भेटतो.

Updated on 23 November, 2021 3:55 PM IST

हस्तचलित टोकण यंत्र :-

शेतामध्ये नवीन यंत्रकीकरण येण्याच्या आधी पेरणीसाठी बैलचलीत पाभर चा उपयोग केला जायचा. परंतु पाभरमुळे दोन ओळींच्यामधील अंतर ठेवणे शक्य नसायचे त्यामुळे विरळणी आणि पुनर्लागवडीची कामे नंतर करावी लागत होती.

१. टोकन यंत्राच्या साहाय्याने जर पेरणी केली तर रोपांच्या मधील अंतर योग्य राखायला येते.
२. टोकन पद्धतीने बियाणांची लागवड करताना मजुरांच्या साहाय्याने एकसमान तसेच योग्य अंतर ठेवून बियाणे खोचावे.

एक नळीच्या साहाय्याने बियाणे टोकन करणारे जे यंत्र आहे त्या यंत्राच्या खालच्या बाजूस उघडझाप करणारी एक पहार जोडलेली असते.क्लचच्या साहाय्याने उघडझाप केली असते. या उघडझापमुळे एकामागून एक असे बियाणे पडतात.

ट्रॅक्टरचलित फुले बहुपीक टोकण यंत्र:-

१. शेतीमधील कामांसाठी आपल्याकडे १२ ते २५ हॉर्सपावर असणाऱ्या ट्रक्टरचा वापर केला जातो.
२. या यंत्राद्वारे ऊस तसेच फळबागांमधील आंतरमशागतीची व पेरणी केली जाते.

वैशिष्ट्ये:-

१. १२ हॉर्सपावर किंवा त्यापेक्षा जास्त हॉर्सपावर असणाऱ्या ट्रक्टरच्या साहाय्याने ओढता येते आणि त्यात मजुरी, वेळ आणि कष्टाची बचतही होते.
२. हे यंत्र ज्वारी, सोयाबीन, हरभरा, मका, भुईमूग, सूर्यफूल, गहू या पिकांचे टोकन करण्यासाठी अतिशय उपयुक्त.
३. पारंपरिक पद्धतीने जेवढा खर्च येत होता त्यापेक्षा ४० ते ५० टक्के या यंत्राद्वारे बचत होते आणि निम्यापेक्षा जास्त वेळ वाचतो.

English Summary: Multiple token machine, including tractor, Learn feature
Published on: 23 November 2021, 03:54 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)