Farm Mechanization

गेल्या काही दिवसांपुर्वी केंद्रीय मोटर वाहन (सीएमवीआर ) १९८९ च्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. याचप्रमाणे सरकारने अजून एक बदल केला असून बदल कृषी यंत्रांमध्ये केला आहे. सध्या शेतीची कामे मोठ्या प्रमाणात यंत्राच्या साहाय्याने केली जाते. मशागत ते पेरणी पर्यंतची कामे ही यंत्रांनी केली जातात.

Updated on 12 August, 2020 5:31 PM IST


गेल्या काही दिवसांपुर्वी केंद्रीय मोटर वाहन  (सीएमवीआर ) १९८९ च्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. याच प्रमाणे सरकारने अजून एक बदल केला असून बदल कृषी यंत्रांमध्ये केला आहे. सध्या शेतीची कामे मोठ्या  प्रमाणात यंत्राच्या साहाय्याने केली जाते.  मशागत ते पेरणी पर्यंतची कामे ही यंत्रांनी केली जातात.

दरम्यान सरकारने कृषी यंत्रे आणि निर्माण उपकरण वाहनांसाठी वेगळ्या प्रमाणे उत्सर्जन नियमांवर सूचना जारी करण्यात आली आहे. यानुसार, उत्सर्जन नियम आणि याच्या नामावलीला बदलण्यात येईल.  देशात चालणारे वाहन आणि यंत्रांसाठी एक उत्सर्जन मानक असते.  याला सरकार निश्चित करत असते.  याचा उद्देश हा वाहनांद्ववारे उत्सर्जित होणारे प्रदूषण नियंत्रण केले जाते.  दरम्यान देशात सध्या  बीएस ६ उत्सर्जन मानक लागू करण्यात आले आहे. आता सरकारने कृषी यंत्रांवर (ट्रॅक्टर, पावर टिलर, आणि कम्बाइंड हार्वेस्टर) आणिन निर्माण उपकरण वाहनांसाठी  वेगळे उत्सर्जन नियम लावण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

 


यासह कृषी ट्रॅक्टर आणि अन्य उपकरणांसाठी उत्सर्जन नियमांची नामावलीलाही बदलण्याचा प्रस्ताव आहे. दरम्यान केंद्र सरकार, शेतीतील यंत्रामुळे होणारे कार्बनचे उत्सर्जन मोजण्यासाठी वेगळे निकष लावणार आहे. शेतीत लागणारी  वाहने आता भारत स्टेज मापकांमध्ये नो मोजता आता वेगळ्या पदतीने  मोजले जाणार असल्याचे माहिती सरकारने दिली आहे. 

त्यासाठी सरकारने  जनतेतून आणि  तज्ञ लोकांकडून सूचना मागण्यास सुरुवात  केली आहे. अनेकवेळा  उत्सर्जनाचे नियम लावताना साधी वाहने आणि शेतीतील वाहने  यामध्ये संभ्रम  निर्माण होतो.  भारत स्टेज, , २ च्या धर्तीवर हे असे मॉडेल असणार आहे.  यामुळे शेतीतील वाहनाचा फायदा होणार आहे.  भारत सतेज फोरच्या धर्तीवर टर्म १, , ३ आणि ४ अशी रचना  असणार आहे.  साधारपणे  टर्म स्टेज-४ ची अंबलबजावणी १ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.  वाहनांमुळे होणारे कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण कमी  करण्यासाठी सरकारने वाहनाच्या इंजिनांमध्ये सुधारणा आणण्याचे ठरवले आहे. आता शेतीतील यंत्रे, वाहने यांच्यासाठी  ही  नवीन प्रणाली सरकार आणत आहे.

English Summary: Modi government changed the rules of agriculture machines with tractors, find out what is the reason
Published on: 12 August 2020, 05:29 IST