Farm Mechanization

नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या भारताचं अमृत महोत्सवी वर्ष आहे.तसेच आपलं शासन ह शेतकरी यांना प्राथमिकता देत शेतकरी हा मालक असला पाहिजे तो आपला शेती मधलं उत्पादन हे स्वताच्या मर्जी ने विकले पाहिजे.

Updated on 28 April, 2022 10:17 PM IST

नमस्कार शेतकरी बांधवांनो  आपल्या भारताचं अमृत महोत्सवी वर्ष आहे.तसेच आपलं शासन ह शेतकरी यांना प्राथमिकता देत शेतकरी हा मालक असला पाहिजे तो आपला शेती मधलं उत्पादन हे स्वताच्या मर्जी ने विकले पाहिजे.

.त्याच बरोबर काळानुसार शेतकरी हा  आधुनिक तंत्रज्ञान वापर करणे महत्त्वाचे जसे कृषी यांत्रिकीकरण आहे वर्ग अजून ही आपन शेती मधे कृषी तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे परंतु जेव्हा कृषी कार्यात पारंपारिक मार्गांसह मशीन्स वापरली जातात तेव्हा यांत्रिकीकरण अर्धवट असते. विकसित देशांमध्ये मजुरांचा पुरवठा कमी होत असल्याने ते शेतीच्या पूर्ण यांत्रिकीकरणासाठी जातात तसेच आपल्या कडे शेतीच्या यांत्रिकीकरण विरूद्ध अडथळे निर्माण करणारे घटक म्हणजे जमिनीची तुकडा पद्धती आणि शेतकर्यांमधील अज्ञान आहे.आपन या गोष्टी पहात आहे तसेच तंत्रज्ञान हे कृषी उत्पादनांच्या गुणवत्तेत आणि मूल्यवर्धनात सुधारणा केली तर   अधिक पीक देणारी दुसरी पीक किंवा बहु पिके घेण्यास शेतकरीना मदत होते.आपल्या शेती यांत्रिकीकरणामध्ये वापरल्या जाणाऱ्या मशीन्स चा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या मात्रा मध्ये व्हावा. वेग वेगळ्या प्रकारच्या कृषी उपकरणाच्या वापर शेतकरी पिकाची वाढ व्हावी म्हणून करतो. उदा- शेतकरी पिकावर हात पंपाने स्प्रेईंग करतात आता ति जागा यंत्राने घेतली आहे नविन नविन उपकरणाचा शोध चालू आहे व वापर ही होतो.शेती साठी ट्रॅक्टर स्प्रे मशीन चा वापर करून शेतकरी बागायती पिकांना कुठल्याहि घातक प्रकारच्या इन्फेकशन पासून कमी वेळात सुखरूप वाचू शकतो.

विशेष गोष्ट अशी कि या सर्वच बदल आणि प्रगतीचे जनक शेतकरी म्हणजेच तुम्ही आहात. जागतिकीकरणाचा रेटा आहे आपल्याला माहीत असेल की निसर्गाचा लहरीपणा इत्यादी आव्हानांना पेलणारा दुसरा तिसरा कुणीही नसून शेतकरीच आहे.आताच्या युगात मोबाईल व इंटरनेट च्या  माहितीचे आदानप्रदान अतिशय जलद होते आणि तरुण पिढीचा शेतीत असणारा पुढाकार निश्चितच काही दिवसात शेतीला यशस्वीतेच्या शिखरावर नेल्या शिवाय राहणार नाही. शेतीमध्ये होत गेलेल्या सुधारणा नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची वृत्ती तरुणांकडे जास्त असल्यामुळे विकासाचा वेग अतिशय चांगला आहे. त्याच बरोबर आमचं कृषी विज्ञान केंद्र हे  काम करत आहे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यपातळीवर विकसित झालेल्या संशोधनांची उपयुक्तता पडताळणी पाहून त्या भागातील भौगोलिक परिस्थिती चा अभ्यास करून शेतकरी यांना यांना मार्गदर्शन करत रहाणे हा कृषी विज्ञान केंद्र यांचा मुख्य हेतू आहे.शेती बाबत निदान तसेच समिक्षा व शेती उत्पादनात प्रयोग करून नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न के व्ही के करत असतं तसेच आमच्या कृषी विज्ञान केंद्र घातखेड याच एकच उद्दिष्ट कि कृषी उत्पादन वाढीसाठी नवी तंत्रज्ञान,बीयाणे आणि नविन पेरणी पद्धती, मातीचे परीक्षण करणे.

शेतांवर विविध पिक, पशुपालन आणि इतर कृषी उद्योगांवर आधारित त्यांच्या उत्पादन क्षमता सिद्ध करण्यासाठी कृषी प्रदर्शन आयोजित करणे आणि जिल्हा कृषी विस्तार व तंत्रज्ञान यांचा वापर व प्रसार कार्य करणं.आधुनिक कृषी उद्योगासाठी शेतकर्याचे ज्ञान व कौशल्य वाढवण्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण घेणे ही आमची प्राथमिक आहे.बियाण्याची नवनवीन वान येत आहे त्या बियाण्यांचे प्रात्यक्षिक आम्ही आमच्या कृषी विज्ञान केंद्र घातखेड च्या प्रक्षेत्रावर पिक उत्पादन आणि सीड हब आणि ग्रामीण बिजोत्पादन कार्यक्रमाच्या माध्यमातुन शेतकरी यांना शेतांवर उत्पादनाची माहिती दिली जाते.शेती विषयक माहिती व वेळोवेळी वेबिनार घेऊन शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन आम्ही करत असतोकृषी प्रसार करणे ही आमच्या कृषी विज्ञान केंद्र घातखेड ची प्राथमिकता आहे त्याच बरोबर विविध उपक्रम जसे शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शन, तंत्रज्ञान शेतकरी चर्चा सत्र त्याच बरोबर सेमिनार या बाबत आम्ही उपक्रम राबवीत असतो.

आम्हाला या गोष्टी अभिमान आहे की आम्ही शेती व शेतकरी यांच्या समस्याच निरसण करत आहे....

धन्यवाद

*श्री डाॅ अतुल पु कळसकर सर वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख*

*कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती१*

*7020956095*

हि माहिती सरांच्या मार्गदर्शनाखाली घेतली आहे.

माहीती संकलण

मिलिंद जि गोदे

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:भारतात -स्कूटर वादाच्या भोवऱ्यात;गेल्या महिन्यात घडल्या आग लागण्याच्या सातपेक्षा अधिक घटना, वाचा यामागील कारण

नक्की वाचा:वनौषधी आहेत निसर्गाची महत्त्वाचे देण; जाणून घेऊ विविध वनौषधींची आरोग्याला होणारे फायदे

नक्की वाचा:खूपच महत्वाचे! फळे भाजीपाला जास्त काळ टिकवायचे असेल करा या पद्धतीचा अवलंब, होईल फायदा

English Summary: modern technology is important in farming so give first preferance to farmer
Published on: 28 April 2022, 10:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)