भन्नाट! शेळीपालणासाठी अँप्लिकेशन लाँच
शेळीपालन हा एक असा व्यवसाय आहे ज्यामध्ये तोटा होण्याची शक्यता फारच कमी आहे. शेळीचे दूध, मांस आणि त्यांच्या चमड्यापासून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात. बाजारात बोकडला नेहमीच मागणी असते. इतर शेतीच्या कामांसह शेतकरी शेळीपालन सुरू करू शकतात. भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली अंतर्गत केंद्रीय शेळी संशोधन संस्थेने एक मोबाईल अँप तयार केल आहे जिथे शेतकऱ्यांना शेळीपालनाशी संबंधित संपूर्ण माहिती मिळते जसे की,जाती, योजना इत्यादीची माहिती मिळते.
अलीकडे शेळीपालन हे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे मुख्य साधन बनत असल्याचे म्हटले जाते, कारण हे सुरू करण्यासाठी जास्त खर्च लागत नाही आणि शेतकरी इतर शेती कामांसह ते सुरू करू शकतात. सरकार आणि पशु शास्त्रज्ञही या दिशेने सतत काम करत आहेत. या दिशेने, केंद्रीय शेळी संशोधन संस्थेने (CIRG) शेळीपालन अँप तयार केले आहे. शेळीपालन सुरू करण्यासाठी हा मोबाईल अँप खूप महत्वपूर्ण ठरू शकतो.
भारतीय शेळीच्या जाती
या मोबाईल अँपमध्ये भारतीय शेळ्यांच्या जातींबद्दल खुप सारी माहिती देण्यात आली आहे. हे देखील सांगण्यात आले आहे की जर तुम्हाला शेळी फक्त मांसासाठी ठेवायच्या असतील तर तुम्ही कोणत्या जाती निवडाल किंवा कोणत्या जाती चमड्यासाठी आणि दुधासाठी अधिक चांगल्या असतील.
कृषी उपकरणे आणि चारा उत्पादन
शेळीपालनात कोणत्या कृषी उपकरणाची गरज आहे किंवा चारा कसा तयार करावा, याची माहिती शेळीपालन मोबाईल अँपमध्येही देण्यात आली आहे. चारा उत्पादन आणि शेत तयार करण्यासाठी कोणती उपकरणे आवश्यक आहेत याची माहिती देखील देण्यात आली आहे.
बकरीचे आरोग्यविषयी माहिती
अँपमध्ये तुम्ही शेळ्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्याल आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था कशी केली जाईल, हेही सांगण्यात आले आहे.
अँपद्वारे शेळीपालक शेतकरी शेळ्यांमध्ये होणाऱ्या सामान्य रोगांच्या लक्षणांविषयी माहिती मिळवू शकतात आणि त्यांना रोखण्यासाठी उपाययोजना करू शकतात.
शेळीपालन अँप्लिकेशन कसे आणि कुठे मिळवायचे
शेळीपालन अँपसाठी, प्रथम आपल्याला Google Play Store वर जावे लागेल. तिथे जाऊन CIRG Goat Farming असे टाईप करा,अँप्लिकेशन सापडेल. हे जवळपास 80 म्ब चे आहे. अँप्लिकेशन हिंदी, इंग्रजी, तमिळ आणि तेलगू भाषेत उपलब्ध आहे. अँप उघडताच भाषा निवडीचा पर्याय येतो.
Published on: 06 September 2021, 01:32 IST