Farm Mechanization

देशात कोरोना संकटात अनेक जणांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनाचा संसर्ग अधिक होऊ नये यासाठी सुरुवातीला देशात लॉकडाऊन करण्यात आला या काळात अनेकांचा रोजगार गेला. कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. नागरिकांना अधिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी सरकारने अनेक योजना लागू केल्या.

Updated on 11 July, 2020 6:29 PM IST


देशात कोरोना संकटात अनेक जणांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनाचा संसर्ग अधिक होऊ नये यासाठी सुरुवातीला देशात लॉकडाऊन करण्यात आला या काळात अनेकांचा रोजगार गेला. कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. नागरिकांना अधिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी सरकारने अनेक योजना लागू केल्या. तर काही कंपन्यांही जनतेच्या मदतीला धावल्या आहेत. टॅफे कंपनी शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी मोफत ट्रॅक्टर सेवा दिली होती. कारण आता शेतीची कामे ही ट्रॅक्टरनेच केली जातात.  

शेतकऱ्यांचे अनेक मुलभूत गरजा लक्षात घेत अनेक कंपन्यांनी बाजारात आपले ट्रॅक्टर आणले आहेत. यात सगळ्यात जास्त आकर्षक ठरले ते म्हणजे मिनी ट्रॅक्टर्स. हे ट्रॅक्टर्स शेतीच्या कामाला उपयोगी पडण्याबरोबर परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांच्या आकर्षणाचा बिंदू ठरले. यातील काही ट्रॅक्टर्सविषयी आपण माहिती घेऊ यात.

युवराज २१५ 215 NXT (Yuvraj -215 NXT)

हा भारताचा पहिला १५ पॉवर युनिट ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरचा रुप खूपच आकर्षक आहे. हा महिंद्रा मिनी ट्रॅक्टर १५ एसपी एक सिंगल - सिलेंडर कूल वर्टिकल इंजिन युक्त आहे. हा ट्रॅक्टर ८६३.५ सीसीएस इतकी पॉवर जनरेट करत असतो. परवडणाऱ्या किंमतीसह हा ट्रॅक्टर कामासाठी खूप उपयुक्त आहे.  याशिवाय आंतरगत मशागतीसाठी हा ट्रॅक्टर खूप फायदेशीर आहे. Mahindra Yuvraj-215 NXT मिनी ट्रॅक्टरला विशेषत : बटाटा, कांदा, कापाशी, ऊस, सफरचंद, आंबा, आणि संत्रेच्या शेतीसाठी तयार करण्यात आला आहे. याची किंमत ही २.५० ते २.७५ लाख रुपयांपर्यत आहे.

(Mahindra Jivo 245DI) महिन्द्रा जीवो 245DI हा ट्रॅक्टर सर्व प्रकराच्या शेतीच्या कामांसाठी उपयुक्त आहे. यात ८६ एनएमची उच्च प्रकारची टार्क असून दमदार ताकद यात आहे. आपल्या शेताकडील रस्ते हे कच्चे असतात, ओबडधोबड असतात त्या रस्त्यावर चालण्यासही हे ट्रॅक्टर सक्षम आहेत. साधरण ७५० किलो वजन हे पेलण्याची ताकद या ट्रॅक्टरमध्ये आहे. आपल्या श्रेणीतील इतर ट्रॅक्टरांच्या तुलनेत हे ट्रॅक्टरचे मायलेज अधिक आहे, आणि वाहतुकीसाठी हे शानदार ट्रॅक्टर आहे. याची किंमत ३.९० ते ४.५०लाख रुपयांपर्यत आहे.

स्वराज 717 (Swaraj 717) – हे स्वराज 717 मिनी ट्रॅक्टर खूप चांगले मॉडल आहे. स्वराज हे ट्रॅक्टर बनवणारी जुनी कंपनी आहे, आपल्या विश्वासासह वापरण्यास हे ट्रॅक्टर खूप सोपे आहे. स्वराज ७१७ मिनी ट्रॅक्टर १५ एचपी २३०० आरपीएमसह येतो. ड्राय डिस्क ब्रेक या ट्रॅक्टरची सर्वात मोठी विशेषता आहे.  साधरण ७८० किलोग्राम वजन पेलण्याची क्षमता या ट्रॅक्टरमध्ये आहे. तर व्हील ड्राइव्ह हे २ डब्ल्यूडी आहेत. स्वराज कॉम्पॅक्ट ट्रॅक्टरमध्ये ६ फॉरवर्ड प्लस ३ रिव्हर्स गिअर आहेत.  स्वराजच्या मिनी ट्रॅक्टरची किंमत ही परवडणारी आहे, साधरण २.६० लाख ते २.८५ लाख रुपयांपर्यत या ट्रॅक्टरची किंमत आहे.

English Summary: mini tractor more useful for farming , know price details
Published on: 11 July 2020, 06:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)