Farm Mechanization

सध्या शेतकरी आपल्या शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून चांगले उत्पादन घेत असतात. अलीकडे बरेच शेतकरी बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना नक्की फायदा कसा होतो? याविषयी जाणून घेऊया.

Updated on 19 October, 2022 11:04 AM IST

सध्या शेतकरी आपल्या शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून चांगले उत्पादन घेत असतात. अलीकडे बरेच शेतकरी बीबीएफ तंत्रज्ञानाचा (BBF technology) वापर करत आहेत. या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना नक्की फायदा कसा होतो? याविषयी जाणून घेऊया.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत (VNMKV) कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्रशक्ती विभागाचा या तंत्रज्ञान प्रसारात मोलाचे योगदान आहे. याच प्रसाराचा फायदा परभणी येथील महेश रामराव शेळके या शेतकऱ्याने शेतीमधील उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढविली आहे.

'बीबीएफ' तंत्राद्वारे शेती अशाप्रकारे केली

विद्यापीठाच्या यंत्रशक्ती योजनेअंतर्गत संशोधक अभियंता डॉ. स्मिता सोलंकी यांच्या मार्गदर्शनातून महेश यांनी २०१९ मध्ये दोन एकरांत 'बीबीएफ' तंत्राद्वारे सोयाबीन (BBF technology soyabean) पेरणी केली. दोन वर्षांपासून २५ ते २८ एकर सोयाबीनमध्ये त्याचा वापर ते करत आहेत. कीडनाशके व जिवाणू संर्वधकाची बीजप्रक्रिया करून पेरणी होते. दोन ओळींत १८ इंच अंतर ठेवून प्रत्येक पाच ओळींनंतर सरी ठेवली. 

दिलासादायक! आता 'भारत' ब्रॅन्डने होणार अनुदानित खतांची विक्री; शेतकऱ्यांना होणार 'असा' फायदा

'बीबीएफ' तंत्राचे फायदे

1) कृषी विद्यापीठाने बीबीएफ यंत्रात पेरणीसोबत उगवणीपूर्व तणनाशक फवारणीची सोयही केली आहे. त्यामुळे तणांचे वेळेवर नियंत्रण करणे व शेत तणविरहित ठेवणे शक्य झाले.

2) पारंपरिक पद्धतीत एकरी ३० किलो बियाणे लागायचे. बीबीएफ पद्धतीत (BBF methods) ते १८ ते २० किलोपर्यंत लागते. बियाणे बचतीसह त्यावरील खर्चही वाचला आहे.

3) दोन ओळी तसेच दोन रोपांतील अंतर कमी-अधिक करता येते. या पद्धतीने पाण्याचा चांगला निचरा होतो. यातून गेली कित्येक वर्ष लाखों रुपयांमध्ये उत्पादन घेत आहे. 

LIC ची नवीन योजना लाँच; फक्त एकाच गुंतवणुकीवर मिळणार १० पट संरक्षण कव्हर

या तंत्राद्वारे उत्पादन

बीबीएफ तंत्राला (BBF technology) अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाची जोड मिळाली. पूर्वी सोयाबीनचे एकरी सहा ते सात क्विंटल उत्पादन मिळत असायचे. आता ते १० ते १३ क्विंटलपर्यंत मिळू लागले आहे. यावर्षी तब्बल २२ एकरांत 'बीबीएफ' तंत्राद्वारे सोयाबीनची पेरणी केली आहे. विशेष म्हणजे प्रतिकूल स्थिती असूनही एकरी ८ ते ९ क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे.

जमिनीची धूप थांबणे शक्य झाले. सेंद्रिय घटकांचा वेळोवेळी वापर केल्याने जमिनीची प्रत चांगली तयार केली आहे. त्यामुळे तंत्राचा पुरेपूर फायदा होतो. संरक्षित पाणी देण्यासाठी सऱ्यांचा उपयोग होतो.

हरभऱ्यासारखे पीक असल्यास सऱ्यांमध्ये तुषार सिंचन संचाचे पाइप ठेवून पाणी देता येते. पीक लहान असताना सऱ्यांमधून ट्रॅक्टर (tractor) चलित पंपाद्वारे कीडनाशकाची फवारणी वा ट्रॅक्टरद्वारे कोळपणी सहज शक्य होते.

महत्वाच्या बातम्या 
सोयाबीन दर अजूनही स्थिर; बाजारभाव वाढणार का? जाणून घ्या आजचे दर
पुढचे 2 दिवस सूर्य 'या' राशीच्या लोकांचे नशीब उजळवणार; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य
महत्वाची बातमी! तब्बल 19 खतांच्या विक्रीवर राज्यात बंदी; खते खरेदी न करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

English Summary: Maximum farmer Income lakhs rupees through BBF technology
Published on: 19 October 2022, 11:00 IST