Farm Mechanization

या लेखामध्ये आपण ज्या ट्रॅक्टर बद्दल माहिती घेणार आहोत ते एक अतिशय खास वैशिष्ट्यपूर्ण ट्रॅक्टर असून त्याची लांबी, उंची आणि आकर्षक डिझाईन मुळे ते शेतकऱ्यांना आकर्षित करते. हा बहुउद्देशीय ट्रॅक्टर मॅसे फरगुशन 1035 डी आय सुपर प्लस असून शेतीकामासाठी आणि मालवाहतुकीसाठी उत्कृष्ट असा आहे.

Updated on 15 July, 2022 3:20 PM IST

 या लेखामध्ये आपण ज्या ट्रॅक्टर बद्दल माहिती घेणार आहोत ते एक अतिशय खास वैशिष्ट्यपूर्ण ट्रॅक्‍टर असून त्याची लांबी, उंची आणि आकर्षक डिझाईन मुळे ते शेतकऱ्यांना आकर्षित करते. हा बहुउद्देशीय ट्रॅक्टर मॅसे फरगुशन 1035 डी आय सुपर प्लस असून शेतीकामासाठी आणि मालवाहतुकीसाठी उत्कृष्ट असा आहे.

या ट्रॅक्‍टरला अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली असून जे इतर ट्रॅक्टर पेक्षा वेगळे आहे. या ट्रॅक्टर मध्ये लोडर आणि डोजर च्या कामासाठी स्वतंत्र पॉइंट देण्यात आले आहेत. या लेखामध्ये आपण इतर काही माहिती पाहू.

 'मॅसी फर्गुशन 1035' डि आय सुपर प्लस ट्रॅक्टर

1- इंजिन- च्या ट्रॅक्टर मध्ये 2400 सीसी सिम्पसन इंजन तीन सिलेंडर आणि 40 एचपी पावर सह येतो. इंजिन मध्ये heavy-duty पिस्टन वापरण्यात आले आहेत. जे इंजिनला पावरफुल बनवतात. इंधन इंजेक्शन पंपला इनलाइन प्रकार देण्यात आला आहे.

जो बॉश कंपनीचा आहे. ट्रॅक्टर तीन स्टेज ओईल बाथ प्रकार प्री क्लिनर एअर फिल्टरसह येतो. कूलिंग साठी  वाटर कुलिंग सिस्टिम देण्यात आली आहे.पिटीओ पावर 34 एचपी आहे. या ट्रॅक्टरला स्लाइडिंग मॅश आणि 80 कॉन्स्टंट मॅश प्रकार ट्रान्समिशन पर्याय मिळतो.

या ट्रॅक्टर ला आठ फॉरवर्ड आणि दोन रिवर्स गियर आहेत. तसेच या ट्रॅक्टरला डुएल क्लच आहे. हे ट्रॅक्टर कमाल 30.6 किमी प्रति तास वेगाने धावू शकतो व यामध्ये बॅटरी बारा वॅट 75AH देण्यात आली आहे.

नक्की वाचा:Mini Tractors: बाजारात उपलब्ध असलेले स्वस्त दरातील मिनी ट्रॅक्टर, वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या

- स्टेरिंग आणि ब्रेक- हा ट्रॅक्टर मॅन्युअल स्टेरिंग सोबत येतो. तसेच तुम्हाला पावर स्टेरिंग चा पर्याय देखील मिळेल. तुम्हाला कशाची आवड आहे त्यानुसार तुम्ही निवड करू शकतात. तसेच हा ट्रॅक्टर एमडीएसएस प्रकारच्या ब्रेक सह येतो.

जी खूप चांगली ब्रेकिंग सिस्टीम आहे. तसेच शेतात आणि रस्त्यावर चांगले काम करण्यासाठी उपयोगी पडते. या ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला ऑइल इमर्सड ब्रेक चा पर्याय मिळतो.

हे ब्रेक तेलात बुडवलेल्या ब्रेक पेक्षा अधिक शक्तिशाली आणि टिकाऊ असतात. या ट्रॅक्टरच्या मागील दोन्ही टायर ला ब्रेक लावण्यासाठी कंपनीने पाच पाच डिस्क दिले आहेत. तसेच या ट्रॅक्टरची पीटीओ पावर 36.5 एचपी असून जे चाळीस एचपी श्रेणीतील सर्वात जास्त आहे.

नक्की वाचा:Tractor Information:'हे' मिनी ट्रॅक्टर शेतीची कामे करतील सोपी,वाचेल शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा

3- हायड्रोलिक क्षमता- या ट्रॅक्टरची वजन उचलण्याची क्षमता 1 हजार 100 किलोग्राम असून ते 40 एचपी ट्रॅक्टरनुसार योग्य आहे. या ट्रॅक्टरला तीन पॉइंट लिंकेज असलेली लिफ्ट आहे. या लिफ्टमध्ये मसुदा, स्थिती आणि प्रतिसाद प्रणाली उपलब्ध आहे. लिफ्ट लॉक ची व्यवस्था आहे. लिफ्ट लॉक असताना अवजारे पडत नाहीत. ट्रॅक्टर मध्ये हीच आणि हूक खूप मजबूत असतात.

4- टायर- या ट्रॅक्टरचा पुढचा टायर 6×16 आणि मागचा टायर 13.6×28आकारात येतो.हा ट्रॅक्टर 2 व्हील ड्राईव्ह मध्ये येतो.तुम्हाला चार व्हील ड्राईव्हचा पर्याय मिळत नाही. के ट्रॅक्टर मध्ये 47 लिटरची डिझेल टाकी देण्यात आले आहे.

या ट्रॅक्टर ची लांबी 3320 ते 3340 मी मी असून रुंदी 1675 मिमी आहे.उंची दोन हजार मिमी आहे. या ट्रॅक्टर चे एकूण वजन एक हजार 770 किलो आहे.

5- किंमत-मॅसी फर्ग्युसन 1035 डीआय ट्रॅक्टरची किंमत पाच लाख 75 हजार ते सहा लाख दहा हजार रुपये आहे. ही किंमत एक्स शोरूम आहे. तसेच काही राज्यानुसार आणि शहरानुसार किमतीत बदल होऊ शकतो.

नक्की वाचा:शेतातील मातीच्या मशागतीसाठी'डिस्क हॅरो' यंत्र आहे शेती क्षेत्रातील हिरो, जाणून घेऊ त्याची वैशिष्ट्ये

English Summary: masy fergusion 1035 di tractor is so useful for farmer for farming
Published on: 15 July 2022, 03:20 IST