Farm Mechanization

जर शेतीमधील आपण यांत्रिकीकरणाचा विचार केला तर ट्रॅक्टरचा वापर शेतकरी जास्त करून करतात. कारण शेताची पूर्व मशागतीपासून ते काढणीपर्यंतचे सगळ्या कामे ट्रॅक्टरच्या साह्याने होऊ लागली आहेत. त्यासोबतच महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतीमध्ये ट्रॅक्टर व्यतिरिक्त जी काही यंत्रे आहेत ते देखील ट्रॅक्टरच्या साह्याने चालवली जातात. ट्रॅक्टर हे शेतीसाठी खूप महत्त्वाचे यंत्र आहे.

Updated on 15 October, 2022 3:10 PM IST

जर शेतीमधील आपण यांत्रिकीकरणाचा विचार केला तर ट्रॅक्टरचा वापर शेतकरी जास्त करून करतात. कारण शेताची पूर्व मशागतीपासून ते काढणीपर्यंतचे सगळ्या कामे ट्रॅक्‍टरच्या साह्याने होऊ लागली आहेत. त्यासोबतच महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतीमध्ये ट्रॅक्टर व्यतिरिक्त जी काही यंत्रे आहेत ते देखील ट्रॅक्‍टरच्या साह्याने चालवली जातात. ट्रॅक्टर हे शेतीसाठी खूप महत्त्वाचे यंत्र आहे.

त्यामुळे शेतकरी बंधू जेव्हा ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करतात तेव्हा त्याची क्षमता, परवडण्याजोगी किंमत आणि मेन्टेनन्स कमी इत्यादी गोष्टी पाहूनच खरेदी करतात. त्यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी या लेखामध्ये आपण अशाच उपयुक्त एका ट्रॅक्टरची माहिती घेणार आहोत जे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरेल.

नक्की वाचा:Tractor News: शेतीसाठी सणासुदीच्या मुहूर्तावर मिनी ट्रॅक्टर घ्यायचा प्लान असेल तर उत्कृष्ट ठरतील 'हे'2 ट्रॅक्टर, वाचा डिटेल्स

 शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ट्रॅक्टर 

 मॅसी फर्ग्युसन 241 डीआय डायनाट्रॅक ट्रॅक्टर- हा ट्रॅक्टर 42 एचपी क्षमतेचा असून यामध्ये तीन सिलेंडर आणि 2500 सीसीचे इंजिन आहे.जे शेती कामासाठी खूप महत्त्वाची कामगिरी पार पाडते. जर आपण या ट्रॅक्टरच्या पीटीओ पावरचा विचार केला तर ती 38 एचपी आहे.

या ट्रॅक्टरचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पाणी थंड करण्यासाठी वॉटर कोल्ड प्रकार आणि एअर फिल्टरसाठी वेट टाईप देण्यात आले असून जे ट्रॅक्टरला सुरक्षित ठेवतात. त्यासोबतच या ट्रॅक्टरमध्ये डुएल क्लच आणि बारा फॉरवर्ड आणि बारा रिव्हर्स गिअर देण्यात आले आहेत.

नक्की वाचा:Tractor News: 'या' कंपनीचे 'हे'दोन ट्रॅक्टर ठरतील शेती आणि शेतकऱ्यांसाठी वरदान, वाचा किंमत आणि आकर्षक वैशिष्ट्ये

या ट्रॅक्टरमध्ये ऑइल इमरस्ड डीस्क ब्रेक देण्यात आले असून जे शेतीतील कामासाठी कमी करण्यास मदत करतात तसेच या ट्रॅक्टरमध्ये पावर स्टेरिंग देण्यात आली आहे. या ट्रॅक्‍टरची डिझेल टाकीची क्षमता ही 47 लिटरची असून या ट्रॅक्टर मध्ये  12v 75AH क्षमतेची बॅटरी आहे.

तसेच या ट्रॅक्टरला अधिक आयुष्यासाठी 4 व्हील ड्राईव्ह देण्यात आले आहेत. या ट्रॅक्टरचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मॅसी ट्रॅक्टर कंपनी प्रत्येक ग्राहकास मॅसी फरगुशन 241 डीआय डायनाट्रॅक ट्रॅक्टरच्या मॉडेलवर चार हजार तास किंवा चार वर्षापर्यंतची वारंटी देते.

 किती आहे या ट्रॅक्टरची किंमत?

 या ट्रॅक्‍टरची किंमत शेतकरी बांधवांना परवडेल अशी असून भारतीय बाजारपेठेचा विचार केला तर या ट्रॅक्‍टरची किंमत सहा लाख 70 हजार रुपये ते सात लाख 20 हजार रुपयांपर्यंत आहे.

नक्की वाचा:Tractor News: शेतकऱ्यांच्या शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी परफेक्ट आहे 'हे'ट्रॅक्टर, वाचा वैशिष्ट्ये

English Summary: massy fergusion 241 di dynatrack tractor is so useful for farming work
Published on: 15 October 2022, 03:10 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)