Farm Mechanization

पुणे : भारत जगातील सर्वात मोठा कृषिप्रधान देश आहे. भारतात शेती व्यवसायाचे झपाट्याने यांत्रिकीकरण होत आहे. शेतीची सर्वच कामे आता यंत्राच्या साहाय्याने केली जात आहेत. मशागतीपासून ते कापणीपर्यंतच्या कामांसाठी यंत्राचा वापर वाढला आहे.

Updated on 24 July, 2020 1:07 PM IST


पुणे : भारत जगातील सर्वात मोठा कृषिप्रधान देश आहे. भारतात शेती  व्यवसायाचे झपाट्याने यांत्रिकीकरण होत आहे. शेतीची सर्वच कामे आता यंत्राच्या साहाय्याने केली जात आहेत. मशागतीपासून ते कापणीपर्यंतच्या कामांसाठी यंत्राचा वापर वाढला आहे. यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचा ओढा आता यांत्रिकीकरणाकडे आहे. याचा परिणाम म्हणून बाजारात शेती अवजारांची मागणी वाढताना दिसू लागली आहे. भारतातील बाजारात या अवजारांची मागणी दिवसेंदिवस वाढत असून पुढील काही वर्षात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणे अपेक्षित आहे.

फिक्की अर्थ फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेने  नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात याविषयी भाकित केले आहे. अहवालानुसार, देशातील कृषी अवजारांची बाजारपेठ सध्याच्या १३ अब्ज अमेरिकन डॉलरवरून २०२५ पर्यंत १८ अब्ज अमेरिकन डॉलर होणार असल्याचे म्हटले आहे.

 

भारतात आता कुठे शेतीच्या यांत्रिकीकरणाला सुरुवात झाली आहे. फिक्कीच्या दाव्यानुसार भारतात केवळ ४०% शेतीचे यांत्रिकीकरण  झाले असून हे विकसित देशाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. या आवाहवालानुसार भारतातील कृषी अवजारांचे मार्केट जागाच्या  तुलनेत केवळ ७% आहे.

भारतात जेवढे शेतीचे यांत्रिकीकरण झाले आहेत त्यामध्ये एकट्या ट्रॅक्टरचा वाटा ८०% आहे. भारतात शेतीचा आकार लहान असल्याने यांत्रिकीकरणाचा मर्यादा आहेत. त्यामुळे येथून पुढच्या काळात देशातील स्थानिक कंपन्यांना शेतीची गरज ओळखून नवीन अवजारे बनवण्याचे आव्हान असणार आहे. भारतातील रस्त्यांचा आकार  लक्षात घेऊन कंपन्यांनी वाहनांची निर्मिती केली. त्याचप्रमाणे छोटी यंत्रे निर्माण करण्याचे आव्हान आहे.

 

English Summary: market for agricultural implements in India will grow Still 2025
Published on: 24 July 2020, 01:07 IST