भारतातील अग्रणी आणि जगातील तिसरी सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी महिंद्रा आणि महिंद्रा सर्व प्रकारची जमीन व शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे वैशिष्ट्यांनी युक्त ट्रॅक्टर निर्मिती करते. शेतकऱ्यांची गरज ओळखून महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टर चे उत्पादन करते. या लेखामध्ये आपण महिंद्रा ट्रॅक्टरच्या महिंद्रा युवो ट्रॅक्टर सिरीज बद्दल माहिती घेणार आहोत.
महिंद्रा युवो ट्रॅक्टर सिरीज
महिंद्रा युवो ट्रॅक्टर खास शेतकऱ्यांसाठी लॉन्च केली गेली आहे. या सीरिजमध्ये एकूण दहा ट्रॅक्टर चा समावेश करण्यात आला असून ते 35 एचपी पासून ते 49.3 एचपी रेंजमध्ये तयार करण्यात आले आहेत.
महिंद्रा युवो ट्रॅक्टर सिरीज दोन डब्ल्यूडी आणि चार डब्ल्यूडी अशा दोन्ही व्हेंरियन्टमध्ये आली आहेत.ही ट्रॅक्टर सिरीज शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देते.
ट्रॅक्टर प्रगत अशा कुशल हायड्रॉलिक्स, शक्तिशाली इंजिन आणि फिल्ड ऑपरेशनसाठी ट्रान्समिशनच्या सोबत आहेत. महिंद्रा युवो ट्रॅक्टर शेतातील काम अधिक जलद गतीने आणि उत्तम प्रकारे करते.
या सीरिजमध्ये बारा फारवर्ड व तीन रिव्हर्स गिअर, बॅक टॉर्क, ऍडजेस्ट टेबल डिलक्स सीट इत्यादी वैशिष्ट्य समाविष्ट आहेत. कंपनी महिंद्रा युवो ट्रॅक्टर सीरिजवर सहा वर्ष या सहा हजार तास आणि दोन वर्ष या 2000 तासांचे वारंटी देते.
भारतातील प्रसिद्ध काही महिंद्रा युवो ट्रॅक्टर मॉडेल आणि त्यांच्या किमती
1- महिंद्रा युवो 275 डीआय - इंजिन क्षमता 35 एचपी - किंमत 5 लाख 85 हजार ते सहा लाख पाच हजार रुपये
2- महिंद्रा युवो 415 डीआय- इंजिन क्षमता 39 एचपी - किंमत- सहा लाख 85 हजार ते सात लाख पंधरा हजार रुपये.
3- महिंद्रा युवो 575 डीआय- इंजिन क्षमता 45 एचपी- किंमत- सात लाख 45 हजार ते सात लाख 60 हजार रुपये.
4- महिंद्रा युवो टेकप्लस 415 डीआय- इंजिन क्षमता 42 एचपी- किंमत- सहा लाख 85 हजार ते सात लाख पंधरा हजार रुपये.
Published on: 17 July 2022, 04:49 IST