Farm Mechanization

जगातील वाहन आणि ट्रॅक्टर निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड ने 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिवसाच्या मुहूर्तावर साउथ आफ्रिका या ठिकाणी महिंद्रा ओजा 7 सोबत एक क्रांतिकारी असे हलक्या वजनाचे म्हणजेच लाईट वेट ट्रॅक्टर जागतिक स्तरावर लॉन्च केले. महिंद्रा आणि महिंद्रा या ट्रॅक्टर कंपनीने आज नेमकी महिंद्रा ओझा हे टेक्नॉलॉजी काय आहे हे सगळ्या जगासमोर आणले.

Updated on 16 August, 2023 3:56 PM IST

जगातील वाहन आणि ट्रॅक्टर निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने 15 ऑगस्ट 2023 रोजी म्हणजे स्वातंत्र्य दिवसाच्या मुहूर्तावर साउथ आफ्रिका या ठिकाणी महिंद्रा ओजाने 7 हलक्या वजनाच्या लाईट वेट ट्रॅक्टर जागतिक स्तरावर लॉन्च केले आहेत. यावेळी महिंद्रा आणि महिंद्रा ट्रॅक्टर कंपनी काय आहे आणि तीची टेक्नॉलॉजी नेमकी महिंद्रा ओझा हे टेक्नॉलॉजी काय आहे हे सगळ्या जगासमोर आणले.

महिंद्रा कंपनी या टेक्नॉलॉजीला किंवा या तंत्रज्ञानाला एक प्रगत असे जागतिक स्तरावरील ट्रॅक्टर प्लॅटफॉर्म संबोधित आहे. या झालेल्या भव्य दिव्य कार्यक्रमांमध्ये कृषी जागरणचे मुख्य संपादक एम.सी.डोमॅनिक, कंपनीच्या डायरेक्टर शायनी डोमॅनिक आणि समूहाच्या संपादक आणि सीएमओ ममता जैन या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

या सातही ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

कंपनीने हलके वजनाचे असलेल्या जागतिक ट्रॅक्टर प्लॅटफॉर्मवर चार उपट्रॅक्टर प्लॅटफॉर्म यामध्ये लॉन्च केलेत. हे चार उपट्रॅक्टर प्लॅटफॉर्म म्हणजे सब कॉम्पॅक्ट, कॉम्पॅक्ट, स्मॉल युटिलिटी आणि लार्ज युटीलिटी या चार उप ट्रॅक्टर प्लॅटफॉर्मचा समावेश केला आहे. एवढेच नाही तर या व्यतिरिक्त महिंद्रा ओझा ट्रॅक्टर प्लॅटफॉर्म  40 ट्रॅक्टर मॉडेल देखील तयार करणार आहे.

लॉन्च करण्यात आलेले ट्रॅक्टर हे 21 एचपी ते 70 एचपी पावर क्षमतेचे आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने साउथ आफ्रिकेतील ओजा ट्रॅक्टर प्लॅटफॉर्मला जागतिक स्तरावर लॉन्च केले. यामध्ये सात ट्रॅक्टर लॉन्च करण्यात आलेत. या ट्रॅक्टरांना ओजा 2121, ओजा 2124, ओजा 2127, ओजा 2130, ओजा 3132 आणि ओजा 3140 आणि इतर काही नावे देण्यात आलेले आहेत.

सर्व ट्रॅक्टर सिंगल सीटर असून फळबाग आणि शेती क्षेत्रातील कामांसाठी हे खूप महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणार आहेत. महिंद्रा ओजा 40 हे मजबूत ट्रॅक्टर रेंज असून या ट्रॅक्टर रेंजचे प्रायमरी मार्केट हे भारत, जापान, दक्षिण पूर्व आशिया आणि अमेरिका या देशात असणार आहे. यामध्ये जपान या देशातील मित्सुबिशी महिंद्रा अॅग्रीकल्चर मशीनरी आणि चेन्नई येथील महिंद्रा रिसर्च व्हॅली या ठिकाणच्या ज्या काही इंजिनिअरिंग टीम आहेत यांच्यामधील आपापसातील सहयोगाने हे ट्रॅक्टर विकसित करण्यात आलेले आहेत.

शेतकऱ्यांना मजबूत कामाच्या दृष्टिकोनातून कंपनीकडून हा प्रयत्न करण्यात आला असून या प्रयत्नातूनच 7 ट्रॅक्टर मॉडेल लॉन्च करण्यात आलेले आहेत. सगळे ट्रॅक्टर औद्योगिक सुविधांवर आधारित असून या तीन औद्योगिक पॅक म्हणजेच इंटेलिजन्स पॅक, उत्पादकता पॅक आणि ऑटोमेशन पॅक.

ट्रॅक्टरची किंमत काय असणार?

ओजा 2127 ट्रॅक्टरची किंमत 5 लाख 64 हजार पाचशे रुपये सांगण्यात आली आहे. तर ओजा 3140 या ट्रॅक्टरची किंमत सात लाख 35 हजार रुपये आहे.

English Summary: Mahindra launched 7 powerful tractors Read the price and specifications of this tractor
Published on: 15 August 2023, 08:40 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)