Farm Mechanization

Soil Testing :- विविध पिकांच्या निकोप आणि दर्जेदार वाढीकरिता आणि भरपूर उत्पादन मिळावे याकरिता अनेक प्रकारच्या पोषक घटकांची आवश्यकता असते. त्यामुळे साहजिकच आपल्याला माहित आहे की असे पोषक घटक हे मातीच्या माध्यमातून पिकांना उपलब्ध होत असतात. त्यामुळे जमीन हे आवश्यक अशा पोषक घटकांनी समृद्ध असणे खूप गरजेचे आहे. त्याच दृष्टिकोनातून आपण रासायनिक खतांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या पोषक घटकांची पूर्तता पिकांसाठी करत असतो.

Updated on 09 August, 2023 11:24 AM IST

Soil Testing :- विविध पिकांच्या निकोप आणि दर्जेदार वाढीकरिता आणि भरपूर उत्पादन मिळावे याकरिता अनेक प्रकारच्या पोषक घटकांची आवश्यकता असते. त्यामुळे साहजिकच आपल्याला माहित आहे की असे पोषक घटक हे मातीच्या माध्यमातून पिकांना उपलब्ध होत असतात. त्यामुळे जमीन हे आवश्यक अशा पोषक घटकांनी समृद्ध असणे खूप गरजेचे आहे. त्याच दृष्टिकोनातून आपण रासायनिक खतांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या पोषक घटकांची पूर्तता पिकांसाठी करत असतो.

परंतु आपल्याला मातीमध्ये कोणत्या पोषक घटकांची कमतरता आहे किंवा कोणत्या पोषक घटकांचे अधिक्य आहे याबद्दल माहिती नसते. यावर एक महत्त्वाचा उपाय म्हणून माती परीक्षणाकडे पाहिले जाते. माती परीक्षणाच्या अहवालामध्ये तुम्हाला मातीमध्ये असलेल्या प्रमुख पोषक घटकांची कमतरता आणि कोणत्या घटकांचे अधिक्य आहे इत्यादीबद्दल माहिती झाल्याने तुम्हाला खतांचे नियोजन करताना खूप सोपे जाते व कितीही प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करण्याऐवजी नेमक्या खतांचा वापर केला जातो.

परंतु माती परीक्षणाची जर प्रक्रिया पाहिली तर ती जराशी गुंतागुंतीची व क्लिष्ट आहे. कारण माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये मातीचे परीक्षण करण्यासाठी सध्यातरी भरपूर वेळ लागतो. परंतु आता एक मशीन विकसित करण्यात आल्यामुळे अवघ्या अर्धा तासात तुम्हाला तुमच्या मोबाईलवर माती परीक्षणाचा रिझल्ट मिळू शकणार आहे.

 माती परीक्षणाचा निकाल मिळणार 30 मिनिटात

 त्याबद्दलचे सविस्तर वृत्त असे की, मातीचे परीक्षण हे झटपट करता यावे याकरिता एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक यंत्र विकसित करण्यात आले असून यामुळे आता माती परीक्षणाला जो काही वेळ लागायचा तो वाचणार आहे. या यंत्राच्या साह्याने आता मातीमधील  बारा प्रकारचे जे काही विविध पोषक घटक आहेत त्यांची तपासणी करता येणे शक्य होणार आहे.

तसेच या यंत्राचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या माती परीक्षणाचा निकाल अवघ्या तीस मिनिटांमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच मिळणार आहे. साधारणपणे या यंत्राच्या साह्याने तुम्हाला जमिनीतील आम्लता, फॉस्फरस, पोटॅशियम तसेच सेंद्रिय कर्ब, नायट्रोजन आणि इतर महत्त्वाच्या घटकांच्या प्रमाणाची नोंद या माध्यमातून मिळणार आहे.

तसेच हे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाणे देखील अगदी सोपे असून त्याचे वजन साडेबारा किलोच्या आसपास आहे. आयसीएआर अर्थात भारतीय कृषी संशोधन परिषद आणि कृषी तंत्र यांनी मिळून हे मशीन विकसित केले आहे. या यंत्राचे नाव भू व्हिजन असे असून ते बाजारामध्ये भूमीसेवा या नावाने विक्रीस उपलब्ध होणार आहे.

 किती आहे या मशीनची किंमत?

 या यंत्राची किंमत साधारणपणे 2 लाख 12 हजार रुपये इतकी आहे.

English Summary: Machine developed for soil testing! The result of soil test will be available in 30 minutes on mobile
Published on: 09 August 2023, 11:24 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)