Farm Mechanization

सध्या कांदा काढणीचे कामे सुरू होतील. कांदा काढणी करताना कांद्याची पात आणि खालील मूळे कापावे लागतात. हे आपल्याला माहिती आहे.

Updated on 24 March, 2022 1:06 PM IST

 सध्या कांदा काढणीचे कामे सुरू होतील. कांदा काढणी करताना कांद्याची पात आणि खालील मूळे कापावे लागतात. हे आपल्याला माहिती आहे.

परंतु कांद्याचे पिकाबद्दल  बोलायचे झाले म्हणजे कांदा लागवडीला आणि काढणीला खूप प्रमाणात मजुरांची आवश्यकता भासते. परंतु सद्यस्थितीचा विचार केला तर मजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत असल्याने लागवड करताना देखील लागवड वेळेवर होत नाही आणि मजुरांअभावी काढणी देखील वेळेवर करता येत नाही. त्यातच या सगळ्या कामांमध्ये खूप जास्त वेळ आणि पैसा खर्च होतो. अशा वेळेस वाटते की जर कांदा काढणी साठी एखादे यंत्र असले तर? या पार्श्वभूमीवरकांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कांदा पात कापण्यासाठी एक यंत्र विकसित करण्यात आले आहे. या यंत्राबद्दल या लेखात माहिती घेऊ.

 कांदापात कापणी यंत्र                       

 कांदा कापणी सयंत्र हे पुणे येथील प्रसन्न परदेशी त्यांनी विकसित केले आहे. जर आपण हे यंत्र विकसित करण्यामागची पार्श्वभूमी पाहिली तर  प्रसन्न परदेशी यांनी इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका ऑईल कंपनीत नोकरी केली. या  निमित्ताने त्यांचा अनेक विदेश दौरे झाले.

त्यानंतर त्यांना शेती  मध्ये काहीतरी करण्याची इच्छा झाली. त्यांचे वडील डॉक्टर होते परंतु त्यांनाही खूप प्रमाणात शेतीची आवड होती व ते त्यांच्या शेतात अनेक प्रकारचे प्रयोग करत असत. याचेच अनुकरण करून प्रसन्न यांनी नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील शेती घेतली व सुरू केला पुढचा प्रवास. तेव्हा त्यांनी पाहिले की नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होते. परंतु त्याची काढणी करताना मजुरांची उपलब्धता खूपच लागते. मजूर हे कांदा पात कापण्यासाठी विळ्याचा किंवा तत्सम धारदार वस्तूचा वापर करतात. यामध्ये खूपच फरक वेळ जातो. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी  एक वेगवान आणि अगदी सहजतेने हाताळता येईल अशा प्रकारचे यंत्र तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले व आक्टोबर 2020 मध्ये मोटार आणि बॅटरी तसेच ब्लेड यांच्या साहाय्याने एक यंत्र विकसित केले. हे यंत्र विकसित केल्यानंतर त्यांनी चाचणी घेण्यासाठी काही शेतकऱ्यांना ते दिले. या यंत्रात शेतकऱ्यांकडून मिळालेल्या सूचनेनुसार त्यांनी काही योग्य ते बदल व सुधारणा करत ते व्यावसायिक स्तरावर आता उपलब्ध केले.

 या यंत्राची वैशिष्ट्ये

1- या यंत्रामध्ये स्टीलच्या टॉप आणि ब्लेड यांचा वापर करण्यात आला आहे. जेणेकरून ओली पात कापताना तिच्या ओलसरपणामुळे गंज येऊ नये.

2- या यंत्रामध्ये त्यांनी बारा व्होल्टची लीड अॅसिड बॅटरी वापरली आहे तसेच हाय स्पीड मोटर देखील जोडलेली आहे.

3- एकदा चार्जिंग केली तर आठ तास अगदी आरामात काम करते.

4- यंत्राच्या वापराला तुम्ही ट्रॅक्टरची बॅटरी देखील वापरू शकतात. या माध्यमातून एकापेक्षा अधिक यंत्रे अधिक काळासाठी वापरता येतात.

5- वीज उपलब्ध असेल तर एसी ते डीसी कन्वर्टर चा पर्याय उपलब्ध आहे.

6- बऱ्याच शेतकऱ्यांकडे बॅटरीवर चालणारे फवारणी यंत्र असते. असे शेतकरी या बॅटरीचा उपयोग हे यंत्र चालवण्यासाठी करू शकतात.

7- यंत्र चालू बंद करण्यासाठी एक स्विच देखील देण्यात आला आहे.

 यंत्राचा फायदा

कांदा खांडणी म्हणजेच काढणीसाठी एक एकर चा विचार केला तर जवळजवळ सहा हजाराच्या पुढे मजुरी लागते. वरून वेळ जातो तो वेगळाच. परंतु या यंत्राचा तर वापर केला तर  अगदी कमी वेळात कांदा काढण्याचे काम करता येऊ शकते. हे यंत्र अवघ्या तीन हजार रुपयांमध्ये खरेदी  केले तर दरवर्षी कांदा लागवडीत काढणीसाठी होणाऱ्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते. या यंत्रामध्ये ब्लेड दोन्ही बाजूस फिरते त्यामुळे दोन्ही बाजूंनी कांदापात कापण्याचे काम कमी अवधीत दोन व्यक्तींच्या मदतीने करता येते व दुप्पट काम शक्य होते.(स्रोत-ऍग्रोवन)

English Summary: machine develope for onion harvesting that so useful for farmer
Published on: 24 March 2022, 01:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)