Farm Mechanization

ग्रामीण भागातील ८०% पशुपालक हे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणावरती करतात परंतु त्यांच्याकडे शेतीतील कष्टाची कामे लक्षात घेता दुग्धव्यवसायासाठी फारसा वेळ शिल्लक राहत नाही. तरीही प्रत्येक शेतकऱ्याकडे एक दोन का होईना पशुधन उपलब्ध असतेच.

Updated on 04 February, 2023 7:28 PM IST

ग्रामीण भागातील ८०% पशुपालक हे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणावरती करतात परंतु त्यांच्याकडे शेतीतील कष्टाची कामे लक्षात घेता दुग्धव्यवसायासाठी फारसा वेळ शिल्लक राहत नाही. तरीही प्रत्येक शेतकऱ्याकडे एक दोन का होईना पशुधन उपलब्ध असतेच.

याच अनुषंगाने सामान्य शेतकऱ्यांना दुग्धव्यवसाय वाढीसाठी प्रेरणा मिळावी, शेतकऱ्यांना कमीत कमी कष्टामध्ये यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने दुग्धव्यवसाय करता यावा, या उद्देशाने सौरभ जैन व अमोल नलावडे यांनी काही संकल्प केला. त्याकरीता दोन्ही मित्रांनी प्रथमता एका कंपनीमध्ये नोकरी केली. नोकरी करत असतानाच मार्केटचा अभ्यास केला.

शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. सामान्य शेतकरी दुग्धव्यवसायात आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर का करत नाहीत यांची विविध कारणे त्यांनी जाणून घेतली. नवीन यंत्र खरेदीसाठी शेतकरी किती रुपयापर्यंत खर्च करू शकतात याचाही शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांनी अंदाज घेतला. मार्केट मधील विविध ब्रँडच्या मशिनरींचा मार्केटसर्वेही केला. या सर्व प्रक्रियेमध्ये विविध गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या. शेतकऱ्याला पाहिजे त्या किमतीचं आणि पाहिजे त्या क्षमतेचं मिल्किंग मशीन बनवण्याचा २०१९ साली त्या दोघांनी निर्धार केला.

आता मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करायचं म्हटलं की समोर आव्हानेही खूप होती. सुरुवातीला कच्चामाल खरेदी करण्यासाठी हवा तेवढा पैसाही उपलब्ध होत नव्हता. कमी मागणीमुळे उत्पादनावरील खर्चही जास्त वाढत होता. व्यवसायासाठी एखादा पार्टनर घ्यायचा ठरवलं तर पार्टनरही त्या विचारधारेचा सापडत नव्हता. परंतु शोधल्यावर काहीही सापडतं आणि ठरवल्यावर काहीही करता येत हा विचार लक्षात ठेवून त्यांनी वाटचाल सुरू केली.

डिजीटल इंडियाच्या नावाखाली विकासाचा डांगोरा पिटला गेला, त्यात जनतेच्या पदरात काय पडले?

अमोल नलावडे यांना मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस मधील २६ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव होता. आयुष्यभर नोकरीच करायची म्हटलं तर पुढच्या पिढीला आपण काहीच देऊ शकत नाही, नोकरी बंद तर पैसा येणं बंद हा विचार अमोल नलावडे यांच्या मनामध्ये सलत होता.

दोघेही एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होते, अनुभव जरी कमी जास्त प्रकारचा असला तरी दोघांचीही विचारसरणी सारखीच असल्याकारणाने त्या माध्यमातून नवीन स्टार्टअप जन्म घेऊ पाहत होती. शेवटी एक दिवस उजाडला आणि “पशुधन डेअरी इक्विपमेंट्स एल.एल.पी” या कंपनीचा जन्म झाला. कंपनीसाठी लागणारी मशिनरी, कच्चामाल, हळूहळू गोळा करून सुरुवातीला घरीच मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू केले. नंतर जसजशी ऑर्डर मिळत गेली तसतसं मॅन्युफॅक्चरिंग युनिटही सुरू केले.

आज महाराष्ट्रासह इतर राज्यातही “पशुधन मिल्किंग मशीन” हा ब्रँड यशस्वीरित्या मार्गक्रमण करताना दिसून येत आहे. येत्या काही काळातच या मशीनवरती सबसिडी मिळवून अजून कमीत कमी किमतीत हे मशीन उपलब्ध करून देण्याचा व एक ते दोन जनावरांसाठी शेतकऱ्यांना मशीनद्वारे सुविधा पुरविण्याचा त्यांचा मानस आहे. “पशुधन डेअरी इक्विपमेंट्स” हा ब्रँड सर्वसामान्य शेतकरी व पशुपालकांचा आर्थिकदृष्ट्या विचार करून इतरही नवनवीन मशिनरी व डेअरी इक्विपमेंट्स बनवतो.

या कंपनीचे ध्येय आहे की, शेतकऱ्यांना कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त सेवा व सुविधा उपलब्ध करून देणे, तळागाळातील सामान्य शेतकऱ्यांचा आर्थिक दृष्ट्या विकास करणे. यांत्रिकीकरणांमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आर्थिक दृष्ट्या विचार केला जात नाही त्यामुळे यांत्रिकीकरणापासून शेतकरी वंचित राहतो. त्याला दुग्धव्यवसाय वाढीसाठी प्रेरणा मिळत नाही.

शेतकऱ्यांनो स्वच्छ दूध उत्पादनाची 'ही' आहेत सुत्र

यांत्रिकीकरणाच्या अभावामुळे दुग्धव्यवसायातील कष्ट अधिकच वाढत जाते. शेवटी दुग्धव्यवसाय परवडत नाही हेच उद्गार सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या सर्रास ऐकायला मिळतात. यांत्रिकीकरणामुळे कमीत कमी मजुरांमध्ये, कमीत कमी जागेमध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये दुग्धव्यवसाय यशस्वी करता येतो याची कित्येक उदाहरणे आपण पाहतो.

हेच धोरण लक्षात ठेवून ग्रामीण भागातील प्रत्येक सामान्य दूध उत्पादकांचे एकंदरीत कष्ट कसे कमी होतील, स्वच्छ आणि निर्भेळ दूध उत्पादन कसे मिळेल आणि शेतकरी माहिती व तंत्रज्ञानाच्या जगात सतत अपडेट कसा राहील हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून पशुधन डेअरी इक्विपमेंट्स ही कंपनी सध्या पशुपालक हितार्थ यशस्वीरित्या कार्य करत आहे.

पशुधन मिल्किंग मशीनची खास वैशिष्ट्ये-
कंपनी ते ग्राहक थेट विक्री.
मशीन वापरण्यास अगदी सुलभ
कमीत कमी मेंटेनन्स खर्च

होम डिलिव्हरीची सोय.
EMI ची सोय उपलब्ध.
कमीत कमी जनावरांसाठी उपलब्ध.
मार्केट पेक्षा अत्यंत माफक दरात उपलब्ध.
मटेरियल अगदी, मजबूत आणि टिकाऊ

उद्योजकाबद्दल थोडेसे -
श्री. सौरभ जैन
शिक्षण- बी.ई.मेकॅनिकल
अनुभव ४ वर्ष (मार्केटिंग)
कंपनीचे नाव- पशुधन डेअरी इक्विपमेंट्स एल.एल.पी
पद / हुद्दा- डायरेक्टर
मोबाईल नं- ८२०८५२०९४१
इमेल- sj2941993@gmail.com
वेबसाईट-pashudhanmilkingmachine.com

श्री. अमोल नलावडे
शिक्षण- बी.कॉम
अनुभव- २६ वर्ष (उत्पादन आणि सर्व्हिसेस)

टीप - पशुपालन व दुग्धव्यवसाय संबंधित अधिक माहिती व तंत्रज्ञानासाठी आजच प्ले स्टोअर वरून धेनू ॲप डाऊनलोड करा
लिंक- https://play.google.com/store/apps/details?id=com.dhenoo.tech&referrer=LLCRNX

लेखक,
श्री.नितीन पिसाळ
(डिजिटल बिजनेस मॅनेजर)
धेनू टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड भोसरी, पुणे

English Summary: Livestock Milking Machine: The first choice of dairy farmers
Published on: 04 February 2023, 07:28 IST