Farm Mechanization

चांगल्या पिकासाठी जमीन सपाट असणेफार आवश्यक असते.जमिनीचे सपाटीकरण हा शेती मशागत येथील एक आवश्यक असे भाग आहे.खास करून जमीन सपाट असण्याचा फायदा हापिकांना पाणी देण्यासाठी होतो. जमिनीत जर एक समान असेल तर शेताच्या अगदी शेवटपर्यंत पाणी व्यवस्थित पोहोचू शकते.

Updated on 08 November, 2021 9:11 PM IST

चांगल्या पिकासाठी जमीन सपाट असणेफार आवश्यक असते.जमिनीचे सपाटीकरण हा शेती मशागत येथील एक आवश्यक असे भाग आहे.खास करून जमीन सपाट असण्याचा फायदा हापिकांना पाणी देण्यासाठी होतो. जमिनीत जर एक समान असेल तर शेताच्या अगदी शेवटपर्यंत पाणी व्यवस्थित पोहोचू शकते.

पाण्याचा अपव्यय होत नाही. जमिनीचे सपाटीकरण केल्यामुळे पाण्याच्या वापर कार्यक्षमतेत 50 टक्के वाढ होते. या लेखात आपण  लेझर लँड लेव्हलरया यंत्राची माहिती घेणार आहोत.त्याचा उपयोग जमिनीचे सपाटीकरण यासाठी केला जातो.

 ट्रॅक्टरचलीत लेझर मार्गदर्शक लेव्हलरचे फायदे

  • प्रभावी सपाटीकरणामुळे व्यवस्थापन करण्यासाठी लागणारे श्रम कमी होते तसेच धान्याची गुणवत्ता व उत्पादनात वाढ होते.
  • यामध्ये सपाटी करण्याचे काम स्वयंचलित पद्धतीने केले जाते. त्यामध्ये जमिनीच्या सपाटी करणाची अचूक  पातळी राखली जाते.
  • या तंत्रज्ञानामध्ये प्रकाश किरण उत्सर्जित करण्यासाठी एक ट्रान्समीटर युनिट वापरलेले असते त्याला लेसर ट्रान्समीटर म्हणतात. जे शेतामध्ये हजार मीटर व्यासापर्यंत वर्तुळाकारप्रकाशकिरण सोडते. लेझर ट्रान्समीटर हे वेगवेगळे क्षमतेचे असतात. एक किरण लेव्हलवर बसवलेले रिसिवर द्वारे प्राप्त केले जातात.  प्राप्त झालेले सिग्नल हे लेव्हलरब्लेडखालीवर करून जास्तीचे माती समपातळीत पसरली जाते.
  • लेव्हलर मधील हे कार्य स्वयंचलित पद्धतीने हायड्रोलिक नियंत्रण वोल्वद्वारेकेले जाते. अशाप्रकारे लेझर लेव्हलिंग, माते समपातळीत आणली जाते.
  • लेझर लँड लेव्हलवर वापरण्याआधी शेताची मशागत करून साधी फळी मारलीजाते.जेणेकरून यंत्रणेने माती काढणे सोपे होते.

लेझर लँड लेव्हलरचे फायदे

  • सिंचनासाठी वेळ आणि पाण्याची बचत होते.
  • पाण्याचे एक समान वितरण होते.
  • सपाटी करणामुळे पाणी वापर कार्यक्षमतेत 50 टक्के वाढ होते.

 

  • एकसमान पेरणीची खोली तसेच पिकांची एकसमान वाढहोते.
  • तणांची समस्या कमी होते.
  • एकसमान खत मात्रेमुळे पीक उत्पन्ना मध्ये दहा ते 15 टक्के सुधारणाहोते.
  • पिकांसाठी अधिक एकसमान मातीचा ओलसरपणा टिकून राहते.
  • एकसमान अंकुरण आणि पिकाचे जलद वाढ होते.
  • पिकाच्या परिपक्वते मध्ये एक सारखेपणा येतो.
  • जमिनीचे सपाटीकरण यामुळे पीक व्यवस्थापनाचे काम कमी होते.
  • यंत्र संपूर्णपणे स्वयंचलित असल्यामुळे ऑपरेटरवरकमी भार येतो.

( स्त्रोत- ॲग्रोवन)

English Summary: lazer land leveler is most useful for land leveling
Published on: 08 November 2021, 09:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)